गौतम बुद्धाच्या नावावरुन प्रेरणा घेत ठेवा मुलाचे नाव, महापरिनिर्वाणाच्या दिवशी घ्या प्रेरणा
Indian Baby Names on Lord Buddha: आज महापरिनिर्वाण दिन... डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 67 व्या महापरिनिर्वाणानिमित्त जाऊन घेऊया गौतम बुद्धांच्या नावावरुन मुलांची नावे
Indian Baby Names on Lord Buddha : आज डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 67 वा महापरिनिर्वाण दिन. 6 डिसेंबर हा डॉ. भिमराव आंबेडकरांची पुण्यतिथी. गौतम बुद्धांचे विचार बाबासाहेबांनी जगभर पसरवले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्धांच्या विचारांप्रमाणेच बाळ असावे, असं वाटत असेल तर या नावांवरुन मुलांची नावे निश्चित करा.
असित
असित नावाचा अर्थ काळा दगड आहे, पांढरा नाही. अमर्यादित, गडद, शांत, स्वत: ची अडथळा दूर करणारा असा या नावाचा अर्थ आहे. तुमच्या मुलाचे नाव ठेवण्यापूर्वी तुम्हाला असित नावाचा अर्थ माहित असल्यास, ते तुमच्या मुलाचे जीवन चांगले बनवू शकते.
अश्वजित
व्याख्या करणे. गौरवशाली विजय असा अश्वजित नावाचा अर्थ आहे. अश्वजित हे चार अक्षरी अतिशय खास नाव आहे.
अभय
भय मुक्त असा अभय या नावाचा अर्थ आहे. ज्याला कशाचेच भय नाही असा 'अभय' या नावाचा अर्थ आहे.
आलोक
प्रकाश, तेज, ज्ञान असा 'आलोक' या नावाचा अर्थ आहे. 'अलोक' किंवा 'आलोक' असं नाव तुम्ही ठेवू शकता.
अबोध
'अबोध' या नावाचा अर्थ आहे समजून घेणे; ज्ञान. तुम्हाला तुमचा मुलगा ज्ञानयोगी व्हावा असा वाटत असेल तर या नावाचा नक्कीच विचार करा.
जीवक
'जीवक' या नावाचा अर्थ आहे जीवन, आयुष्य. तुमच्या मुलांच आयुष्य डॉ. बाबासाहेबांच्या आणि गौतम बुद्धांच्या विचारांनी प्रभावित व्हावे असे वाटत असेल तर या नावाचा नक्की विचार करा.
त्रिनेत्र
देवी दुर्गा, दुर्गेप्रमाणे तीन नयन असतील, हे विचारांचे त्रिनेत्र असतील तर मुलाला हे नाव नक्की ठेवा.
धिमन
अत्यंत हुशार आणि बुद्धिमान असा या धिमन नावाचा अर्थ होतो. गौतम बुद्ध हे अतिशय बुद्धिमान आणि हुशार असल्याचं सांगण्यात येतं. त्यांच्या नावावरुन ठेवा मुलाचे नाव
कनिष्क
कनिष्क या नावाचा अर्थ आहे अत्यंत स्वतंत्र व्यक्तिमत्वाचा आणि एखाद्या गोष्टीला स्वतःला वाहून घेतलेला असा व्यक्ती. मुलाला द्या हे हटके नाव.
अतिद
अतिद अर्थात सूर्य. नेहमी सूर्यासारखा तळपणारा असा व्यक्ती असाही याचा अर्थ आहे. गौतम बुद्धांसारख्या तेजस्वी ज्ञान सूर्याप्रमाणे 'अतिद' हे नाव.
स्वजय
'स्वजय' म्हणजे स्वतःवर नियंत्रण असणारा असा, गौतम बुद्धांचा जसे स्वतःच्या मनावर अत्यंत नियंत्रण होते तसाच असा या नावाचा अर्थ आहे.