White bread: व्हाइट ब्रेड आपल्या न्याहारीचा आणि मुलांच्या टिफिनचा महत्त्वाचा भाग बनला आहे. हे सहज उपलब्ध होते त्यासोबतच व्हाइट ब्रेडपासून आनेक पदार्थ पटकन तयार करता येतात. चवीसह पोषण देणारा, सोयीचा आणि सहज उपलब्ध होणारा पदार्थ म्हणून जगभर ब्रेड खाल्ला जातो. भारतातदेखील याचा खप अतिशय वाढला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण तुम्हला माहित आहे का? दररोज व्हाइट ब्रेड खाल्ल्याने आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. व्हाइट ब्रेडचा जास्त वापर आरोग्यासाठी अनेक अडचणी निर्माण करू शकते. व्हाईट ब्रेडसारखे जास्त प्रमाणात कार्बोहायड्रेट्स असलेले पदार्थ शरिरावर अनेक दुष्परिणाक करु शकतात. आताच जाणून घ्या व्हाइट ब्रेडचे दुष्परिणाम.


व्हाइट ब्रेड बनवण्याची प्रक्रिया


सहसा व्हाइट ब्रेड गव्हच्या पिठापासून बनवले जाते, पण ब्रेड बनवताना त्याचे कणीक खूप बारीक केले जाते आणि या प्रक्रियेद्वारे सर्व जीवनसत्त्वे आणि पोषक तत्व पूर्णपणे काढून टाकले जातात. असे केल्याने ब्रेडसारखे उत्पादन दीर्घकाळ ताजे आणि खाण्यायोग्य ठेवता येतात. 


व्हाइट ब्रेड खाण्यचे दुष्परिणाम


1. लठ्ठपणा


व्हाइट ब्रेडमध्ये रिफाइंड मैदा असतो.  या रिफाइंड मद्यामध्ये फायबरची कमतरता असते. हे लवकर पचते आणि शरीरातील शुगरची पातळी पटकन वाढवते. त्यामुळे वारंवार भूक लागते आणि वजन वाढण्याचा धोका वाढतो. लक्षात ठेवा, लठ्ठपणा अनेक आजारांचा मूळ आहे.


2. रक्तदाबतील असंतुलन


व्हाइट ब्रेडमध्ये ग्लायसेमिक इंडेक्स (GI) जास्त असतो. GI शरिरातील रक्तदाबाची पातळी पटकन वाढवतो. हे  डायबिटीज असलेल्या किंवा कुटुंबात अनुवांशिक रक्तदाबाची समस्या असलेल्या लोकांसाठी धोकादायक ठरू शकते.


3. पचनाच्या तक्रारी


व्हाइट ब्रेडमध्ये फायबर नसल्यामुळे पचनतंत्र कमजोर होऊ शकते. दररोज व्हाइट ब्रेड खाल्ल्याने बद्धकोष्ठता, गॅस आणि पोटदुखीसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. एकंदरीत, हा पोटाच्या आरोग्यासाठी खूप घातक आहे.


हे ही वाचा: अस्वच्छ फ्रिज चकाचक करणे आता अगदी सोपे, 'या' टिप्सचा करा वापर


आरोग्यदायी जीवनशैली कशी ठेवावी?


व्हाइट ब्रेड फक्त क्वचितच खा, शक्यतो टाळा. याऐवजी, पौष्टीक पदार्थांचा आहारात समावेश करा. पांढऱ्या ब्रेडऐवजी मल्टी ग्रेन ब्रेड खा, हे आरोग्यासाठी फायदेशीर आहे.


(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)