पुनावाला कुटुंबाप्रमाणेच मुलांना द्या पारंपरिक नावे, संस्कृती जपणारी अर्थपूर्ण नावं
Poonawala Tradtional Baby Names And Meaning : पुनावाला हे कुटूंब कायमच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतं. (Adar Poonawala and Natasha Poonawala Baby Names And Meaning) आपल्या मुलांमध्ये संस्कृती जपण्यामध्येही हे कुटूंब मागे राहिलेलं नाही. दोन्ही मुलाला दिली हटके नावं.
Traditional Baby Names And Meaning : Vaccine King म्हणून लोकप्रिय असलेले अदार पुनावाला आणि त्यांची पत्नी आणि लोकप्रिय बिझनेस वुमन म्हणून लोकप्रिय असलेल्या नताशा पुनावाला कायमच चर्चेत असतात. पुनावाला या कुंटुंबाने आपल्या मुलांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने संस्कृती जपली आहे. अगदी नवज्योत सोहळा करत या दोन्ही मुलांचा दीक्षा सोहळा पार पडला आहे.
कितीही मॉर्डन आणि मोकळ्या विचारांचे असले तरीही पुनावाला यांनी आपल्या मुलांना अतिशय पारंपरिक, पारसी संस्कृती जपणारी नावे दिली आहे. तुम्ही देखील मुलांकरिता अशीच नावे निवडू शकता.
पुनावाला यांच्या मुलांची नावे
अदार आणि नताशा पुनावाला यांच्या मुलांची नावे 'सायरस' आणि 'डेरियस' असे आहे. या नावाचा अर्थ अनुक्रमे 'सायरस' पर्शियन हे नाव असून त्याचा अर्थ ''सूर्य", "काळजी करणारा" असा आहे. तर 'डेरियस' या नावाचे "श्रीमंत आणि राजे" असे अर्थ आहेत.
पारंपरिक नावे
भद्राक्ष
हे नाव मुलांसाठी देखील आहे आणि ते एक अद्वितीय नाव आहे. भद्राक्ष नावाचा अर्थ "सुंदर डोळे असलेली व्यक्ती" असा आहे. तुम्ही तुमच्या मुलाचे नाव भद्राक्ष ठेवू शकता. हे नाव पारंपारिक नावांच्या यादीत येते जे ऐकूनही वेगळीच अनुभूती देते.
इंद्रनील
इंद्र नील नावाचा अर्थ "सुंदर आणि सुंदर डोळे असलेली व्यक्ती" असा आहे. म्हणूनच तुम्हाला हे नाव मुलासाठी आवडू शकते.
जयदीप
जयदीप हे चार अक्षरी नावे असून विजेता असा त्याचा अर्थ आहे. प्रकाश विजय असा देखील या नावाचा अर्थ आहे.
आर्य
आर्य या नावाचा अर्थ पूर्वज असा आहे. आपल्या पूर्वजांची आठवण आणि संस्कृत शब्दावरून दोन अक्षरी अत्यंत सोपं आणि वेगळं नाव तुम्ही तुमच्या मुलासाठी निवडू शकता.
अर्शिव
शिवाचे रूप, शिवाचे दुसरे नाव किंवा संस्कृतमधील नाव असा 'अर्शिव' या नावाचा अर्थ आहे. युनिक असलेले नाव तुम्ही जर शिवभक्त असाल तर आपल्या मुलासाठी निवडू शकता.
दैविक
देवाची शक्ती, देवाचा चमत्कार असा या नावाचा अर्थ आहे. नुकताच बाळाचा जन्म झाला असेल तर त्याचे नाव दैविक असे तुम्ही ठेऊ शकता.
कृषिव
भगवान शिव आणि कृष्ण देवता या दोघांचे समीकरण असणारा व्यक्ती म्हणजे कृषिव. संस्कृतमधील हे नाव घरात जर शिव आणि कृष्णाचे भक्त असतील तर त्यांच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो.