नवरात्रीची सुरुवात झाली आहे. या नऊ दिवसात अनेक लोक कडक उपवास ठेवतात तर काही लोक एक वेळेचं जेवून उपवास करतात. नवरात्रीच्या उपवासात लोक अनेकदा फळेसुद्धा खाल्ली जातात. अशावेळी दिवसभराची धावपळ करण्यासाठी ऊर्जेची गरज असते. जर तुम्हालाही उपवासात गोड खायला आवडत असेल तर तुम्ही शिंगाड्याची बर्फी ची रेसिपी ट्राय करू शकता. शिंगाड्याची बर्फी बनवण्यासाठी तुम्हाला ना खूप फॅन्सी पदार्थांची गरज भासणार आहे आणि ना जास्त वेळ लागेल. ही बर्फी खाल्ल्यानंतर उपवासात जाणवणारा अशक्तपणा आणि थकवाही निघून जाईल. चला शिंगाड्याची बर्फी बनवण्याची सोपी पद्धत जाणून घेऊयात. 


लागणारे साहित्य 


  • COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    शिंगाड्याचे पीठ

  • तूप 

  • साखर

  • दूध 

  • चिरलेले काजू आणि बदाम

  • वेलची पूड


जाणून घ्या कृती 


  • सर्वप्रथम एका कढईत साधारण २-३ चमचे तूप टाकून ते मध्यम आचेवर गरम करा. तूप वितळल्यानंतर कढईमध्ये एक कप शिंगाड्याचे पीठ घालून चांगले परतून घ्या.

  • शिंगाड्याच्या पीठाचा रंग सोनेरी होईपर्यंत छान परतून घ्या. यानंतर कढईमध्ये एक कप दूध घाला. 

  • भाजलेल्या पिठात दूध एकावेळी न घालता हळू हळू थोडे-थोडे मिसळत राहा.

  •  हे मिश्रण थोडे घट्ट झाल्यावर त्यात तीन-चतुर्थांश वाटी साखर घालावी लागेल.

  • यानंतर तुम्ही या मिश्रणात बारीक चिरलेले काजू आणि बदाम चवीनुसार घाला.

  •  बर्फीची चव वाढवण्यासाठी तुम्हाला या मिश्रणात एक चतुर्थांश चमचे वेलची पूड घाला. 

  • आता एका प्लेटमध्ये देशी तूप लावून त्याला छान ग्रीस करा. 

  • तयार केलेलं हे मिश्रण प्लेटमध्ये एकसमान पसरवा.

  • हे मिश्रण थंड झाल्यावर बर्फीच्या आकारात कापू शकता. 

  • आता अशाप्रकारे तुमची शिंगाड्याची बर्फी खाण्यासाठी तयार आहे.


रेगुलर बर्फीपेक्षा या बर्फीची चव खूप वेगळी लागते. उपवासात ही बर्फी खाल्ल्याने तुम्हाला दिवसभर उत्साही वाटेल.