आहेरच्या साड्या घेताना दिसल्या नीता अंबानी! Viral Photo मध्ये दिसणाऱ्या साडीची किंमत माहिती आहे का?
गडगंज श्रीमंत मुकेश अंबानी आणि त्यांची पत्नी नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी याचा विवाह सोहळा 12 जुलै रोजी पार पडणार आहे. या सोहळ्याच्या आहेरासाठी साड्यांची खरेदी करताना दिसल्या नीता अंबानी.
देशातील मोठे उद्योगपती मुकेश अंबानी आणि रिलायन्स फाऊंडेशनच्या संस्थापक आणि अध्यक्षा नीता अंबानी मुलगा अनंत अंबानीच्या लग्नाच्या तयारीत व्यस्त आहेत. पुढील महिन्यात 12 जुलै रोजी अनंत राधिका मर्चंटसोबत लग्नगाठ बांधली आहे. त्याकडे देश-विदेशाच्या नजरा खिळल्या आहेत. दरम्यान, नीता अंबानी आपल्या मुलाच्या लग्नाचे आमंत्रण घेऊन काशी विश्वनाथ मंदिरात पोहोचल्या. जिथे त्यांनी विश्वनाथाचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. तसेच नीता अंबानींसाठी काशी आणखी एका कारणासाठी खास आहे.
या लग्नाची खरेदी करताना वरमाई नीता अंबानी वाराणसीमध्ये दिसल्या. वाराणसीमध्ये गंगा आरती ते सांड्यांच्या खरेदीपर्यंत नीता अंबानी यांनी सगळ्या शॉपिंगचा आनंद लुटला. नीता अंबानी यांनी बल्कमध्ये म्हणजे मोठ्या प्रमाणात आहेरच्या साड्यांची खरेदी केली आहे.
सोन्या-चांदीची झालर
नीता अंबानी यांनी निवडलेल्या साड्यांवर 400 ग्रॅम सोनं-चांदीची झालर असल्याचं दिसून येत आहे.
नीता अंबानी यांनी पसंत केलेली साडी ही पारंपरिक कोनियाची 'लाख-बुटी साडी' आहे.
यावर खऱ्या सोन्या-चांदीच्या जरीने काम केले आहे.
या साडीमध्ये सोन्याची तार, बेस कटान थ्रेडचं काम केलेलं आहे. तर सिल्व्हर कोटिंग असल्याचं पाहायला मिळतं.
2-3 महिन्यांचा कालावधी
पारंपरिक कोनियाच्या लाख-बुटी साडी तयार करण्यासाठी जवळपास 2.5 ते 3 महिन्यांचा कालावधी लागतो.
लाख बुटी साडीही बंगलुरु सिल्कपासून तयार केली जाते. ज्यामध्ये 600 ग्रॅम जरी (गोटा-टिकी) वर्क करण्याच आसं आहे. यामध्ये 400 ग्रॅम सोने-चांदीचा वापर केला आहे.
साडीचं वेगळेपण
लाख बुटी साडीमध्ये पारंपरिक पदरासोबत मुगल इंस्प्रेशन देखील आहे. या साडीमध्ये फ्लोट्स देखील आहे.
महत्त्वाचं म्हणजे या साडीत बारीक काम करण्यात आलंय. या साडीची एका दिवसात जवळपास 3 इंच शिवणकाम आहे.
100 हून अधिक साड्यांची मागणी
उत्तर प्रदेश इंडस्ट्रियल कोऑपरेटिव्ह फेडरेशन (UPCF) चे अध्यक्ष असलेले तिचे वडील अमरेश कुशवाह म्हणाले, 'नीता अंबानी यांनी लग्न समारंभासाठी अनेक विणकरांकडून वेगवेगळ्या पॅटर्नच्या 100 हून अधिक साड्या मागवल्या होत्या.' 'रिलायन्स स्वदेश फाऊंडेशनच्या माध्यमातून बनारसी विणकाम जागतिक केले जाईल', असेही ते म्हणाले. पाचव्या पिढीतील विणकर विजय मौर्य यांचा मुलगा अनिकेत म्हणाला, 'त्याची साडी सोन्याच्या तारेने बनवली जात आहे.