लोकसभा निवडणुकीचा नागपुरचा निकाल जाहीर होताच भाजप उमेदवार नितीन गडकरी यांच्या घरी जल्लोष झाला. हॅट्रिक केलेल्या नितीन गडकरी यांनी यावेळी आपल्या विजयाचा आनंद नातवंडांसोबत साजरा केला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विजयाचा हा आनंद संपूूर्ण जगाने पाहिला. यावेळी नितीन गडकरी यांच्या नातवंडांच्या चेहऱ्यावर असलेला आनंद हा खास होता. आबा जिंकले... अशा शब्दात नितीन गडकरी यांच्या नातवंडांनी आपला आनंद व्यक्त केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नातवंडे आणि आजी-आजोबांचं नातं हे कायमच खास असतं. आजोबा आणि आजी यांच्यासाठी नातवंड म्हणजे दुधावरची साय असतात. नितीन गडकरींचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. नितीन गडकरींचा देखील या क्षणाचा आनंद नक्कीच खास असेल. कारण कार्यकर्ते नाहीत घरची इतर ज्येष्ठ मंडळी नाहीत तर चक्क नातवंडांसोबत आपल्या विजयाचा आनंद शेअर केला. 



आजी-आजोबा आणि नातवंड यांच्यात घट्ट नातं असल्याचे फायदे समजून घेऊया. 


मुले इतर नातेसंबंध अनुभवतात 


मुलं जन्माला आल्यावर तो फक्त पालकांचा अनुभव घेत असतो. त्यांच्या सवयी-प्रतिक्रियांचा अभ्यास करत असतो. पण जेव्हा आजी-आजोबा घरी असतात तेव्हा मुलांना आणखी एक नातेसंबंध अनुभवता येतं. आजी-आजोबांचं मुलांवर असलेलं प्रेम त्यांच्या नात्याची नवी ओळख निर्माण करुन देते. अशावेळी मुलांना उत्तम संस्कार देण्यासाठी आजी-आजोबांची खूप मदत होते. 


आयुष्याबद्दल मुलं शिकतात 


मुलांना आपला कौंटुबिक इतिहास, संस्कृती याबद्दल माहिती असणे गरजेची असते. अशावेळी आजी-आजोबा ती महत्त्वाची भूमिका बजावतात. तसेच नातवंड आजी-आजोबांसोबत काळानुरुप बदलत गेलेली परिस्थिती देखील समजून घेण्यास शिकतात. तसेच कृतज्ञतेचा विचार याच नात्यातून नातवंडांकडे पोहोचतो. 


आजी-आजोबांची मदत होते 


लहान मुलांना कुणाकडे हक्काने आणि विश्वासाने सोपवू शकतो तर ते आजी-आजोबा असतात. आता पालक दोघेही वर्किंग आहेत. अशावेळी मुलांना जर आजी-आजोबांकडे ठेवलं तर ते नातं उत्तम राहतं. मुलं त्या ठिकाणी अतिशय सुरक्षित असतात. अशावेळी पालकांना देखील आजी-आजोबांची साथ महत्त्वाची असते. 


मुलं होतात स्ट्राँग


पालकांपेक्षा आजी-आजोबांनी मुलांचा अभ्यास घेतला तर त्याचा खूप फायदा होतो. तसेच आजी-आजोबांसोबत मुलांना कायमच जबाबदार वाटतं. आपल्या आजी-आजोबांची काळजी घेणे ही आपली जबाबदारी असल्याचं मुलांना वाटतं. 


मिळणारं प्रेम


आजी-आजोबांकडून मुलांना मिळणारं प्रेम हे वेगळंच असतं. याची तुलना कुणाशीच केली जाऊ शकत नाही. आजी-आजोबा आणि पालकांचं नातं मुलं अनुभवत असतात. अशावेळी त्यांच्यात नातेसंबंधांबद्दल सकारात्मक विचार निर्माण होतो.