Oatzempic Weightloss Diet: सोशल मीडियावर वजन कमी करण्यासाठीच्या अनेक टिप्स आणि ट्रिक्स व्हायरल होत असतात. तसंच आता एक खास डाएट प्लॅन व्हायरल झाला आहे. बदललेल्या जीवनशैलीमुळे वाढलेले वजन ही एक मोठी समस्या बनली आहे. आजकालच्या धावपळीच्या जीवनात कामाचा ताण, व्यायामासाठी नसलेला वेळ, बैठे काम, चुकीचा आहार आणि जंकफूडचे अति सेवन यामुळे वजन कमी करणे हे प्रत्येकासाठी एक आव्हान बनले आहे. अशा परिस्थितीत लोक वजन कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न करतात. अनेक लोक तर वजन कमी व्हावे यासाठी काहीही करायला तयार असतात. त्यामुळे कमी वेळात जास्त वजन कमी व्हावे यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉडक्ट घेतले जातात, वेगवेगळे डाएट फॉलो केले जाते. अशातच सोशल मीडियावर आता एका डाएट ट्रेंड होत आहे. Oatzempic डाएट प्रकार सध्या चांगलाच चर्चेत आहे. पण हा व्हायरल डाएट प्रकार नेमका काय आहे? चला जाणून घेऊया..


वजन कमी करणारा ट्रेंडीग डाएट प्लॅन Oatzempic


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Oatzempic या नावावरूनच कळते की यात ओट्सचा वापर केला जातो. सोशल मीडियावर ट्रेंड होणाऱ्या या Oatzempic डाएच प्लॅनमध्ये दावा करण्यात आला आहे, की ओट्समध्ये काही पदार्थ मिसळून खाल्यास चांगल्या प्रमाणात वजन कमी होऊ शकते. यासाठी सांगितलेल्या प्रमाणानुसार साधारणपणे अर्धा कप रोल ओट्स 1 कप पाण्यात मिसळा. त्यात अर्ध्या लिंबाचा रस घाला आणि प्या. या पेयाला काहीच चव नसली तरी वजन कमी करणासाठी याचा खूपच चांगला परिणाम होतो असे सांगितले जात आहे. 


 


हेही वाचा: चहासोबत भजी खाताय? मग सावधान


 


Oatzempic मुळे 2 महिन्यात 18 किलो वजन कमी झाल्याचा दावा


सध्या सोशल मीडियावर ट्रेंड करणाऱ्या डाएट प्लॅनमुळे 2 महिन्यात 18 किलो वजन कमी होऊ शकते अशी चर्चा आहे. मधुमेहावरील औषध ओझेम्पिक आणि जेम्पिक यांना एकत्र करून या डाएटचे नाव ठेवण्यात आले आहे. पण यात ओझेम्पिक औषधही वापरले जाते. काही लोक वजन कमी करण्यासाठी या औषधाचा वापर करतात. 


वजन कमी करम्यासाठी ओट्स फायदेशीर


ओट्समध्ये असलेली पोषक तत्वे वजन कमी करण्यासाठी फायदेशार मानले जातात. ओट्स बार्लीपासून तयार केले जातात. त्यात फायबरचे प्रमाण जास्त असते आणि वजन कमी करण्यसाठी फायबर मदत करते. 


आरोग्य तज्ञ यावर काय म्हणतात?


तज्ञ Oatzempic सारख्या कोणत्याही डाएटमुळे एवढे वजान कमी होते आणि ते आरोग्यासाठी फायदेशार आहे याचे समर्थन करत नाहीत. ओट्स खाल्यामुळे पोट जास्त वेळ भरलेले राहते आणि त्यामुळे भूकही कमी लागते. पण वजन कमी करण्यासाठी फक्त जेम्पिकवर अवलंबून राहणे योग्य नाही. कोणतेही डाएट फॉलो करताना आधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.