मुलांमधील आत्मविश्वास दुपटीने वाढवतील `या` 5 सवयी, फक्त वयाच्या 16 वर्षांच्या आत शिकवा
Parenting Tips : तुमचं मुलं ही टीनएजमधअये प्रवेश करत असेल आणि तुम्हाला त्याला स्वावलंबी आणि आत्मविश्वासू बनवायचं असेल तर काही गोष्टी ठरवूनच करणे गरजेचे आहे. मुलांना शिकवा `या` 5 लाईफ टास्कच्या गोष्टी.
How To Boost Child Confidance : मुलांचे चांगले संगोपन करणे सोपे काम नाही. ही पालकांची जबाबदारी आहे. मुलांना यशस्वी होण्यामध्ये पालक मदत करु शकतात. पालकत्वातील थोडासा निष्काळजीपणा मुलांचे भविष्य बिघडवून त्यांना कमकुवत बनवू शकतो. अशा परिस्थितीत योग्य वयात मुलांना महत्त्वाच्या गोष्टी शिकवणे ही पालकांची जबाबदारी आहे. जर मुले किशोरवयात प्रवेश करत असतील तर त्यांना अशा काही गोष्टी शिकवल्या पाहिजेत, ज्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढेल आणि ते स्वतःवर विश्वास ठेवायला शिकतील. जर तुम्ही त्यांना वयाच्या 16 वर्षापूर्वी काही चांगले आणि महत्त्वाच्या सवयी लावल्यात तर ते स्वावलंबी तर होतातच शिवाय योग्य निर्णय घेण्याची समजही विकसित करतात. अशा परिस्थितीत आम्ही तुम्हाला तुमच्या वाढत्या मुलांना कोणत्या 5 गोष्टी शिकवल्या पाहिजेत ते सांगत आहोत.
मनी मॅनेजमेंट
जर तुमचे मूल 15 वर्षांचे झाले असेल, तर नक्कीच त्याच्यासाठी बँक खाते उघडा. त्यांना त्यांच्या शाळेचे बजेट कसे करायचे, खेळ आणि प्रवासासाठी बचत कशी करायची ते शिकवा. चेक लिहिणे आणि खर्चांची नोंद यासारख्या गोष्टी शिकवणे आवश्यक आहे.
कपडे स्वच्छ करणे
मुलांना त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे कपडे कसे स्वच्छ करावेत, उन्हात वाळवावेत, रंगीत कपडे आणि पांढरे कपडे स्वच्छ करताना काळजी घ्यावी, डाग कसे काढावेत इत्यादी शिकवणे फायदेशीर ठरते.
प्रथमोपचार माहिती
मुलांना आजार, दुखापत, खोकला, सर्दी इत्यादीच्या बाबतीत कोणते औषध द्यावे लागेल. प्रथमोपचार कसे करावे इत्यादीची माहिती द्या. एवढेच नाही तर कुटुंबातील एखादा सदस्य आजारी असेल तर त्याची काळजी कशी घ्यायची याची सर्व माहितीही द्यावी.
घरी एकटे राहणे
जेव्हा तुम्ही मुलांना काही तास घरी एकटे सोडता तेव्हा ते घराची काळजी घ्यायला शिकतात आणि जबाबदार बनतात. म्हणून, त्यांना कधीकधी घरी एकटे सोडणे सुरू करा. त्यांना सुरक्षा नियम देखील सांगा. कारण आताच्या काळात पालक दोघेही कामाला जातात. अशावेळी घराची जबाबदारी मुलांवर सोपवणे महत्त्वाचे आहे.
एकटा प्रवास
हे वय आहे जेव्हा त्यांना नवीन गोष्टी शिकण्याची आणि जबाबदार बनण्याची इच्छा असते. अशा परिस्थितीत घर ते शाळेत किंवा शाळेतून घरापर्यंत वाहतूक कशी करायची ते शिकवा. अशा प्रकारे ते स्वतःची जबाबदारी घ्यायला शिकतील. एवढंच नव्हे तर आजी-आजोबा जवळ राहत असतील तर त्यांच्याकडे जाताना कोणती काळजी घ्यावी हे देखील शिकवा.