लांसाठी त्यांचे पालकच हा सर्वात मोठा आदर्श असतात. पालक जसे वागतात तशीच मुलं देखील वागतात. अशावेळी पालकांना मुलांसमोर कोणत्याही गोष्टी बोलताना किंवा वागताना अलर्ट राहणे गरजेचे असते. पालकांनी मुलांसमोर चुकूनही 6 गोष्टी बोलू नये किंवा त्यांच्यासमोर या गोष्टींवर अजिबात चर्चा करु नये. कारण पालक जे बोलतात ते मुलांच्या कानावर पडत असतं. मुलं त्या सगळ्याचा एकांतात विचार करतात. या सगळ्याच्या त्यांच्या बालपणावर परिणाम होत असतो. 


आर्थिक स्थिती 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेकदा पालक मुलांसमोर त्यांच्या आर्थिक स्थितीबाबत चर्चा करतात. पण ही परिस्थिती कायम तशीच राहत नाही. पण मुलांवर या गोष्टींचा परिणाम होतो. आपल्या कुटुंबाकडे पैसे नाहीत किंवा आपले पालक पैशांच्या संकटांना सामोरे जात असल्याची भावना त्यांच्यात निर्माण होते. ही भावना चुकीची आहे. कारण यामुळे त्यांचा आत्मविश्वास की होऊ शकतो. आणि यामुळेच ते पालकांवरही विश्वास ठेवू शकत नाही. 


शाळा किंवा शिक्षक 


पालकांपाठोपाठ मुलं जर कशावर सर्वात जास्त विश्वास ठेवत असतील तर ते आहेत त्यांचे शिक्षक. विद्यार्थ्यांना आपल्या शिक्षकांबद्दल फार वाटत असतं. तसेच शाळेबद्दल मुलांना सर्वाधिक अभिमान असतो. पण पालक जर शाळा किंवा शिक्षकांबद्दल नकारात्मक बोलत असतील. तर त्याचा परिणाम मुलांवर होतो. मुलं या सगळ्या घटनेने नाराज होतात. नाराज झाल्यावर मुलं पालकांशी मोकळेपणाने बोलू शकत नाहीत. यामुळे त्यांच्यात एक दरी निर्माण होते. 



तुमच्यामधील मतभेद 


पालक हे मुलाचे आई-वडिल असले तरीही ते त्या अगोदर नवरा-बायको आहेत. एवढंच नव्हे तर त्यांच्यात मतभेद असणे ही सामान्य बाब आहे. पण पालकांनी या सगळ्या गोष्टी मुलांसमोर बोलू नयेत. कारण मुलांसमोर या गोष्टींवर चर्चा केल्यास त्यांना आपले पालक आनंदी नसल्याची भावना जाणवते. ही जाणीव अत्यंत चुकीची आहे. कारण पालकांचं आनंदी असणं मुलांसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. 


पाहुण्यांबद्दल नकारात्मक विचार 


अनेकदा एक कुटुंब म्हणून घरी चर्चा होते. जसे की, वेगवेगळ्या प्रसंगावर किंवा घटनेवर घरी चर्चा होती. कधी कधी ही चर्चा आत्मकेंद्री किंवा नातेवाईकांबद्दलही असू शकते. अशावेळी पालकांनी कुणाबद्दलही कमेंट करताना मुलं आजूबाजूला नाही ना याचं भान घ्यावं. अनेकदा ते मत त्या प्रसंगापूर्त असू शकतं पण मुलांचा या सगळ्यात गैरसमज होतो. तसेच पालकांनी घरात कुणाबद्दलही नकारात्मक न बोलण्याचा निर्णय घ्यावा. 


वाईट प्रसंगावर चर्चा 


अनेकदा पालक आपल्या ऑफिसमधील किंवा पाहिलेल्या अनुभवांवर घरी चर्चा करत असतात. यामध्ये एखादा अपघात किंवा वाईट प्रसंग असू शकतो. यासारख्या गोष्टी पालकांनी मुलांसमोर बोलू नयेत. कारण या सगळ्याचा मुलांच्या बालमनावर परिणाम होऊ शकतो. ही प्रसंग मुलांच्या बालमनावर कोरली जाऊ शकतात. 


पैशाचे महत्त्व 


पालकांनी मुलांना पैशाचे महत्त्व पटवून सांगावे. पण हे करत असताना पैसा किती महत्त्वाचा आहे हे सांगावे. पण पैशामुळे आपलं अडतं ही जाणीव त्यांच्यात निर्माण होणार नाही याची काळजी घ्या. मुलांना महिन्याचा खर्च कसा करावा किंवा पैशाला किती जबाबदारीने खर्च करावे यासारखे संस्कार त्यांच्यावर करावेत.