Baby Born in Pitru Paksha : पितृपक्षात जन्मलेल्या मुलांचा कसा असतो स्वभाव?
Pitru Paksha 2024 : पितृ पक्षात बाळाचा जन्म होणे शुभ की अशुभ, असा प्रश्न अनेकांना पडतो. तसेच या काळात जन्मलेल्या मुलांचा स्वभाव नेमका कसा असतो?
भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून पितृ पक्ष सुरू होतो. यंदा पितृ पक्षावर ग्रहणाची सावली आहे. अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या अमावस्येला पितृ पक्ष समाप्त होतो. पितृ पक्षाच्या काळात पितरं पृथ्वीवर वास करतात. यावेळी तृप्त किंवा अतृप्त अशा सर्व पितरांसाठी तर्पण, श्राद्ध, पिंडदान वगैरे केली जातात, यामुळे पितरांचा आत्मा शांत होतो. यंदा पितृ पक्षावर चंद्रग्रहणाचं सावट आहे.
कधी सुरु होतोय पितृपक्ष
17 सप्टेंबरपासून पितृ पक्ष सुरु होत आहे. तर 2 ऑक्टोबरला सर्वपित्री अमावस्येला पितृपक्ष समाप्त होणार आहे. या कालावधीत जर घरी बाळाचा जन्म झाला तर तो शुभ असतो की अशुभ. तसेच या काळात जन्मलेल्या मुलांचा स्वभाव कसा असतो?
बाळाचा जन्म शुभ की अशुभ
पितृ पक्षादरम्यान कोणतेही शुभ कार्य केले जात नाही, कारण शास्त्र आणि नक्षत्रानुसार हा काळ शुभ मानला जात नाही. पितृ पक्षात मूल जन्माला आले तर ते अशुभ मानतात. पण ही गोष्ट चुकीची आहे.
ज्योतिष शास्त्रानुसार, असं म्हटलं जातं की, पितृपक्षात जन्माला आलेले मुलं हे आपल्या पूर्वजांचा आशिर्वाद घेऊन जन्माला येतात. पितरांच्या आशिर्वादानुसार ही मुलं जीवनात यश संपादन करतात.
पितृपक्षात जन्मलेली मुलं कुटुंबासाठी देखील अतिशय शुभ मानली जातात. तसेच या मुलांवर परमेश्वराचा देखील विशेष आशिर्वाद राहतो.
पूर्वज पृथ्वीवर येतात
पितृपक्षात पितर पृथ्वीवर येतात असे मानले जाते. ते त्यांचे कुटुंब पाहतात आणि कधी कधी गाई, कावळे, गरजू लोकांच्या रूपात त्यांच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी घरी येतात. म्हणून, या काळात लोकांना खूप दान करण्यास सांगितले जाते आणि कोणालाही रिकाम्या हाताने फिरवू नका. तसेच या काळात पितरांच्या शांतीसाठी तर्पण, श्राद्ध आणि पिंडदान इत्यादी विधी केले जातात. याने पितर प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात आणि घरात सुख-समृद्धी येते. तसेच या महिन्यात जन्मलेली मुले देखील खूप खास असतात.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)