Premanand Maharaj Quotes in Marathi: पालक हेच मुलाचे पहिले मित्र असतात. कारण त्याच्या अगदी जवळचे आणि विश्वासाचे तेच असतात. पण अशावेळी पालकांची एक लहान चूक मुलांसाठी खूप महागात पडू शकते. अशावेळी स्वामी प्रेमानंद महाराज यांनी पालकांसाठी एक खास सल्ला दिला आहे. पालक जर मुलांच्या कायम जवळ असतील तर त्यांची वाढ योग्य प्रकारे होत असते. कारण त्यांचा मानसिक आणि शारीरिक संगोपनात एक सकारात्मक असते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपल्या सगळ्यांना माहितच आहे की, विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे दोघेही प्रेमानंद महाराजांना फॉलो करतात. त्यांचे विचार त्यांना सकारात्मक वाटतात. अशावेळी पालकांनी प्रेमानंद महाराज यांचे विचार जीवनात फॉलो करावेत. यामुळे मुलं अगदी विराट कोहलीसारखीच आत्मविश्वासू बनतील. 


काय म्हणाले स्वामीजी? 




स्वामीजींचा पालकांना सल्ला?


स्वामीजी म्हणतात की, पालकांनी आपल्या मुलांवर इतके प्रेम केले पाहिजे की कोणतीही अडचण आली तर ते थेट त्यांच्या पालकांकडे यायला पाहिजे. मुलांनी असा विश्वास ठेवला पाहिजे की, त्यांना कितीही त्रास झाला तरीही आई-वडील प्रत्येक परिस्थितीत त्यांच्यासोबत असतात. यामुळे मुलाला त्याचे आईवडील आपल्यासोबत असल्याची जाणीव होते आणि त्याला सुरक्षित वाटते. मुलाला घाबरवून ठेवणे योग्य नाही.


पुढे जाणून घ्या की, पालकांनी आपल्या मुलावर प्रेम कसे दाखवावे जेणेकरून त्यांच्यातील नाते अधिक घट्ट होऊ शकेल.


पालकांचा वेळ मुलांसाठी खास गिफ्ट 


मुलांसोबत वेळ घालवल्याने त्यांना जाणीव होते की तुम्ही त्यांच्या आयुष्यात किती महत्त्वाचे आहात. गोष्ट सांगणे असो, गेम खेळणे असो किंवा त्यांच्यासोबत बसून बोलणे असो, मुलांना पालकांनी असा वेळ दिल्याने त्यांच्या मनात हा विश्वास दृढ होतो. मुले ही वेळ लक्षात ठेवतात आणि त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होते. उदाहरणार्थ, दररोज रात्री झोपण्यापूर्वी त्यांच्यासोबत थोडा वेळ घालवून, त्यांच्या दिवसाविषयी त्यांचे बोलणे ऐकून आणि त्यांना मिठी मारून तुम्ही तुमचे प्रेम व्यक्त करू शकता.


स्पर्श महत्त्वाचं


मिठी मारणे, थोपटणे किंवा हात पकडणे यासारखे जवळचे स्पर्श मुलाला सुरक्षित आणि प्रिय वाटतात. यामुळे त्यांचा आत्मसन्मान वाढतो आणि ते तुमच्यासाठी महत्त्वाचे आहेत असा विश्वास निर्माण करतात. शारीरिक स्पर्शामुळे मुलांना मानसिक आणि भावनिक संतुलन राखण्यास मदत होते.


प्रोत्साहन करणे 


मुलांना प्रोत्साहन आणि प्रशंसा दिल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढतो. जेव्हा ते काही चांगले करतात किंवा प्रयत्न करतात तेव्हा त्यांची प्रशंसा करा. पालकांच्या या कृती मुलांना त्यांच्या कामात अधिक चांगले बनण्यास प्रोत्साहन देतात.. मुलांना असे वाटते की, त्यांचे पालक त्यांच्या परिश्रमांना समजून घेतात आणि त्यांचे कौतुक करतात, ज्यामुळे त्यांचे मनोबल वाढते.


मुलांचे बोलणे ऐकणे आणि समजून घेणे 


मुले काय बोलतात ते ऐकणे आणि समजून घेणे हे अतिशय महत्त्वाचं असतं. कारण यामुळे मुलांच पालकांसोबत असलेलं नातं अधिक दृढ होतं. जेव्हा तुम्ही मुलांचे विचार, भावना आणि समस्या काळजीपूर्वक ऐकता तेव्हा त्यांना कळते की, तुम्हाला त्यांची काळजी आहे. त्यांना त्यांच्या समस्या सोडविण्यात मदत करा आणि त्यांना मार्गदर्शन करा, यामुळे त्यांना विश्वास वाटतो की, पालक आपल्या खूप जवळ आहेत.