Relationship News : (husband wife) पती आणि पत्नीच्या नात्याचे एक ना अनेक पैलू असतात. प्रत्येकासाठी हे पैलू तितकेच वेगळे असल्याचंही आतापर्यंत सिद्ध झालं आहे. किंबहुना अनेकांनीच ते अनुभवलंही आहे. अशा या नात्यात लहानशी चूकही मोठे परिणाम करून जाते. कधी जोडीदाराचं वागणं खुपतं, तर कधी त्यांची एखादी कृती दु:ख देऊन जाते. बऱ्याचदा दुर्दैवानं वाद विकोपास जातात, विषयांना फाटे फुटतात आणि मग काही जोडपी घटस्फोटाचा (Divorce) निर्णय घेतात. अर्थात विभक्त पद्धतीनं आयुष्य जगण्याच्या निर्णयावर पोहोचतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पती पत्नीच्या नात्यातील अशाच काही तक्रारी आणि त्यांना घटस्फोटापर्यंत पोहोचवणारी कारणं यासंदर्भात एका सोशल मीडिया रीलच्या माध्यमातून भाष्य करण्यात आलं आहे. मुंबईस्थित वकील आणि कंटेंट क्रिएटर Tanya Appachu Kaul यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. जिथं त्यांनी हल्लीच्या जोडप्यांची बदललेली मानसिकता जगासमोर आणली आहे. 


घटस्फोटाची आधुनिक काळातील कारणं... 


खरंतर घटस्फोट किंवा कोणाच्याही वैवाहिक नात्यात आलेलं वादळ ही गंभीर बाब. पण, हल्लीच्या दिवसांमध्ये हे गांभीर्यच कुठेतरी हरवल्याचं दिसू लागलं आहे. तान्या कौल यांचा व्हिडीओ पाहून हेच लक्षात येतंय. अनेकदा जोडप्यांमध्ये संवादाचा अभाव असला की एकमेकांना समजून घेण्यासाठी पुरेसा वेळ दिला जात नाही आणि यातूनच एकमेकांसदर्भातील तक्रारी डोकं वर काढू लागतात. 


Tanya Appachu Kaul यांच्याकडे आतापर्यंत आलेल्या जोड्यांपैकी काहींनी याच घटस्फोटासाठी विचित्र कारणं पुढे केली. पत्नीनं हनीमूनला जास्तच विचित्र (अश्लील) कपडे घातले होते हे त्यातलं एक कारण. 


हेसुद्धा पाहा : नासानं टीपले अवकाशातील 'शोला और शबनम'; ही किमया पाहून Photo वारंवार Zoom करून पाहाल 


 


इतकंच नव्हे, 'पती माझ्यावर फारच प्रेम करतो, माझ्यावर प्रमाणाहून जास्त लक्ष ठेवतो अजिबातच भांडत नाही', हेसुद्धा कारण पुढे करत काहींनी घटस्फोटासाठी अर्ज केल्याचं तिनं सांगितलं. घटस्फोटासाठी अर्ज करणाऱ्यांची इतर कारणं म्हणजे, 'पती स्पर्धा परीक्षेची तयारी करत असल्यामुळं पत्नीला वेळच देत नाही', 'पत्नी पतीच्या पाया पडत नाही', 'पत्नी नाश्ता न बनवताच सकाळी कामावर निघून जाते'. घटस्फोटाचा अर्ज करण्यासाठीची ही कारणं वकिलांनाही भांडावून सोडतात. 




नेटकऱ्यांच्या दाव्यानुसार इथं या महिला वकील 2020 मधील एका घटनेला प्रकाशात आणत आहेत. जिथं उत्तर प्रदेशातील एका महिलेनं पती जास्तच प्रेम करतो, लग्नानंतर 18 महिन्यांमध्ये आपण भांडलोच नाही म्हणून घटस्फोटासाठीचा अर्ज केला होता. इथं फक्त त्यातील काणाचा संदर्भ असला तरीही लग्नाविषयी जोडप्यांची मानसिकता पाहता '...मग तुम्हाला लग्न तरी का करायचंय?' असाच प्रश्न या वकिलांनाही पडतो. इथंही तान्याचं असंच काहीसं झालंय....