Tips To Handle Argumentative Child: आजच्या काळात मुलं खूप जास्त स्मार्ट आहेत. मात्र, या गुणाबरोबरच मुलांना वाद घालण्याची आणि उद्धटपणाची सवयही लागली आहे. मुलांचे असे वागणे आई-वडिलांसाठी डोकेदुखी ठरते. खरंतर मुलं आई-वडिलांनी सांगितलेल्या सगळ्याच गोष्टीवर सहमत होत नाहीत. त्यामुळं ते त्यांच्या मनाविरुद्ध झालेल्या गोष्टी वाद-विवाद करुन व्यक्त करतात. याच कारणामुळं आई-वडिल आणि मुलांमध्ये वाद होतात. या वादामुळं घरातील वातावरण बिघडते तसंच, नात्यातही तणाव निर्माण होतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकदाका मुलांना वाद घालण्याची सवय लागली की तर ते कोणाचचं ऐकून घेत नाहीत. तर्क-वितर्क लढवणाऱ्या मुलांसमोर पालक जास्त वेळ त्यांचा रागावर नियंत्रण ठेवू शकत नाहीत. शेवटी पालकांचा आवाज वाढतो आणि नंतर मुलांना मारणे, त्यांच्यावर ओरडणे असे प्रकार केले जातात. त्याशिवाय मुलं शांत होतच नाहीत. मात्र पालकांचे असे वागणे यावर उत्तर ठरु शकत नाही. येथे आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत. ज्यामुळं तुम्ही मुलांसोबत बोलून त्यांचा स्वभाव बदलू शकता. 


मुलांचं ऐकून घ्या


जेव्हा आई-वडिल मुलांची प्रत्येक गोष्ट ऐकून न ऐकल्यासारखी करतात तेव्हा मुलं त्यांचं म्हणणं पटवून देण्यासाठी वाद विवाद करतात. त्यांच्या मनात हिच शंका असते की त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं जाईल की नाही. त्यामुळं तुमच्या मुलांची संपूर्ण गोष्ट आधी ऐकून घ्या. 


पर्याय द्या


अनेक पालक त्यांचे निर्णय मुलांवर थोपवतात. मात्र मुलांवर निर्णय थोपवणे हे योग्य नाहीये. अशावेळी मुलं मनमानी करण्यासाठी आवाज वाढवतात आणि वाद घालण्यास सुरुवात करतात. त्यामुळं त्यांचे म्हणणे टाळण्याऐवजी त्यांना दोन पर्याय द्या. ही मुलांची वाद घालण्याची सवय नियंत्रणात राहते. 


कारण सांगा


जर तुम्ही मुलांच्या म्हणण्यावर सहमत नसाल तर त्याला ओरडून शांत बसवण्याने काही होणार नाही. मुलं कधीच आई-वडिलांच्या निर्णयामागचं कारण समजून घेत नाहीत आणि भांडणांचा पवित्रा उगारतात. तुमच्या मुलाने कोणताही वाद न करता तुमचा निर्णय स्वीकारावा यासाठी, त्याला कारणाची जाणीव करून देणे महत्त्वाचे आहे.


तुम्ही वाद घालू नका


मुलांमधील वाद थांबवण्याचा सगळ्यात जास्त प्रभावी मार्ग म्हणजे मुलांसोबत तुम्ही वाद घालू नका. पालक जाणूनबुजून किंवा नकळत मुलाच्या वादाचा एक भाग बनतात, ज्यामुळे दोघांमध्ये तणाव निर्माण होतो. अशावेळी त्या परिस्थितीपासून लांब जाणे


नियम बनवा


मुलांचा स्वभाव बदलण्याचा एक मार्ग म्हणजे नियम तयार करणे. मुलाच्या वयानुसार नियम बनवा आणि ते मोडल्यास त्याचे परिणाम त्याला सांगा. लक्षात ठेवा की तुमचे मूल नियम मोडल्यानंतर नक्कीच वाद घालेल, या काळात त्याच्याशी बोलणे टाळणे चांगले.


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)