Happy Children's Day 2023: दरवर्षी 14 नोव्हेंबर हा राष्ट्रीय बालदिन म्हणून साजरा केला जातो. या तारखेला भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवसही साजरा केला जातो. जवाहरलाल नेहरूंना मुलांवर खूप प्रेम होते आणि मुलंही त्यांना प्रेमाने चाचा नेहरू म्हणत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेहरूजींचा विश्वास होता की, मुले हे देशाचे भविष्य आहेत आणि त्यांच्याद्वारेच चांगले भविष्य घडेल. यामुळेच दरवर्षी 14 नोव्हेंबर रोजी नेहरूंची जयंती बालदिन म्हणून साजरी केली जाते.


बालदिन हा मुलांचा दिवस आहे आणि या दिवसाबद्दल लहान मुले खूप उत्सुक असतात. या दिवशी शाळांमध्ये विशेष कार्यक्रम आयोजित केले जातात आणि मुलांना भेटवस्तू देखील दिल्या जातात. आज, बालदिनाच्या या विशेष प्रसंगी, आपण या सुंदर अभिनंदन संदेशांसह बालदिनाच्या शुभेच्छा देखील देऊ शकता.


मुलांवर संस्कार हे काही ठरवून किंवा बसून केले जात नाहीत. तर तुम्ही रोज त्यांच्यासोबत कळत नकळत वागत असतात त्यामधून संस्कार घडतो. अभिनेता रितेश देशमुख आणि जिनिलिया डिसोजा यांनी दोन्ही मुलांवर काही संस्कार करत असतात. जे प्रत्येक पालकांनी अंगिकारले पाहिजेत. जाणून घेऊया खास गोष्टी. 


घरचं जेवण 



मुलांकरिता घरचं जेवण अतिशय महत्त्वाचं असते. हा एक संस्कार आहे. रितेश देशमुख आपल्या दोन्ही मुलांवर हे संस्कार करताना दिसतात. घरचा आहार हा मुलांच्या सर्वांगिण विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. अशावेळी पालक म्हणून रितेश आणि जिनिलिया मुलांवर खास संस्कार करतात. मुलांच्या ताटात पोळी भाजी वरण आणि गोडाचा पदार्थ असे पदार्थ दिसतात. पालकांनी मुलांना संपूर्ण आहार देऊन त्यांची शारीरिक आणि मानसिक वाढ करणे अत्यंत गरजेचे आहे. 


एकत्र कुटूंब पद्धत 


रितेश देशमुख यांच्या घरी एकत्र कुटूंब पद्धत आहे. यामुळे मुलांवर कळत नकळत चांगले संस्कार घडतात. अशावेळी रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख यांनी केलेले संस्कार खूप अधोरेखित होतात. कायमच रितेश आजी-आजोबांच महत्त्व मुलांना पटवून देतात. 


मोठ्यांचा सन्मान 



रितेश देशमुख यांनी मुुलांवर केलेले संस्कार सार्वजनिक ठिकाणी देखील अधोरेखित होतात. सार्वजनिक ठिकाणी रितेश यांची मुलं सर्वांना नमस्कार करणे किंवा हात जोडून आभार मानतात. तसेच ही मुले सगळ्यांशी अतिशय प्रेमाने आणि सलोख्याने वागतात. यामुळे रितेश देशमुख आणि जिनिलिया यांचे संस्कार कायमच महत्त्वाची भूमिका बजावतात.