Rose Day 2024: शाहजानने त्याच्या बायकोच्या आठवणींनिमित्त बांधलेला ताजमहाल हा प्रेमाचं प्रतिक म्हणून ओळखला जातो. तसंच गुलाबाच्या फुलाला ही प्रेमाचं प्रतिक म्हटलं जातं. पूर्वीच्या काळी प्रेम व्यक्त करण्यासाठी किंवा कोणत्याही नात्याची सुरुवात करण्यासाठी गुलाबाची फुलं भेट म्हणून दिली जायची. पण तुम्हाला माहितेय का  गुलाब देताना त्याच्या रंगानुसार गुलाब देण्याचा अर्थ ही बदलतो. जर या रोज डेला किंवा व्हॅलेंटाईन डेला (Valentine Day 2024) तुम्हाला तुमच्या आवडीच्या व्यक्तीला गुलाबाचं फुल द्यायचे असेल तर ही माहिती खास तुमच्यासाठी आहे. फेब्रुवारी महिन्यात प्रेमाचा आठवडा साजरा केला जातो. आवडीच्या व्यक्तीला गुलाब देताना त्या गुलाबाचा रंग ही तितकाच महत्त्वाचा ठरतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लाल रंगाचं गुलाब




जर तुम्ही रीलेशनशिपमध्ये आहात किंवा कोणाला प्रपोज करायचे असल्यास रोज डे किंवा व्हॅलेंटाईन डेला  तुम्ही लाल रंगाचे फुल देऊन प्रेम व्यक्त करु शकता. लाल रंगाला प्रेमाचा रंग मानला जातो. तसंच तो सौंदर्य आणि रोमान्स व्यक्त करतो.  जेव्हा तुम्ही कोणाला  लाल रंगाचं गुलाब देता तेव्हा तुम्ही तुमचे प्रेम व्यक्त करत आहात असं मानलं जातं.  


गुलाबी रंगाचं गुलाब 



गुलाबी रंग हा आनंद , जिव्हाळा, निरागसता आणि नम्रपणा दर्शवतो. असं म्हटलं जातं की, लहान मुलं जशी निरागस असतात तशीच आपल्यावर प्रेम करणारी माणसं निरागस असतात. त्यामुळे मैत्रीसाठी किंवा आनंद व्यक्त करण्यासाठी गुलाबी रंगाचं गुलाब दिलं जातं.  


पिवळ्या रंगाचं गुलाब 



पिवळ्या रंगाचा गुलाब हा मैत्रीचं प्रतिक म्हणून ओळखलं जातं. पिवळा रंग हा ऊर्जा आणि आत्मविश्वास दर्शवतो. जर तुम्ही कोणाशी मैत्री करू ईच्छित असाल तर तुम्ही पिवळ्या रंगाचं गुलाब देऊ शकता. असं मानलं जातं की,जर तुम्ही पिवळ्या रंगाचं गुलाब देत कोणाला देत असाल तर तो तुमच्या मैत्रीत विश्वास व्यत्त करत असतो. 


नारंगी रंगाचं गुलाब 



नारंगी रंग हा तुमच्यात तेज आणि उत्साह निर्माण करत असतो. तुमच्या जवळची व्यक्ती जर मानसिक तणावाखाली असेल तर तुम्ही नारंगी रंगाचं गुलाब देऊ शकता. नारंगी रंगाच्या गुलाबाने नैराश्य दूर होते आणि सकारात्मकता निर्माण होते.   


पांढऱ्या  रंगाचं गुलाब 


 
पांढरा रंग हा शांतता आणि नम्रपणा व्यक्त करतो. जर तुमचं तुमच्या पार्टनरशी भांडण झालं असेल तर  भांडण मिटवण्याकरीता तुम्ही पांढऱ्या  रंगाचं गुलाब तुमच्या तुमच्या पार्टनरला देऊ शकता. जर तुम्ही रीलेशनशिपमध्ये असाल तर तुम्ही तुमच्या पार्टनरला फुलं भेट दिल्याने तुमच्या नात्यातलं प्रेम वाढतं.