आजकाल अनेक गोष्टी फ्रिजमध्ये ठेवल्या जातात. अगदी मसाले ते भाजी सगळ्याच गोष्टी फ्रिजमध्ये ठेवल्या जातात. आले आणि लसूण सहजपणे खराब होत नाहीत, म्हणून लोक ते मोठ्या प्रमाणात विकत घेतात. यामुळे यांना स्टोअर कसं करायचं हा प्रश्न पडतो. मग अशावेळी अनेक लोक आले आणि लसूण फ्रिजमध्येच ठेवतात. पण अद्रक लसूण फ्रीजमध्ये ठेवणे योग्य आहे की नाही? लसूण खराब होण्यापासून वाचवण्यासाठी काय करायचे? हे जाणून घेऊयात.  


आले फ्रिजमध्ये ठेवावे की नाही?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आले फ्रिजमध्ये ठेवता येऊ शकते. पण जास्त काळ स्टोअर करण्यासाठी आणि खराब होण्यापासून रोखण्यासाठी योग्यरीत्या आले स्टोअर करणे गरजेचे आहे. यासाठी आले नीट धुवा, वाळवा आणि हवाबंद कंटेनरमध्ये ठेवा. आले जास्त वेळ उघडे ठेवल्यास सुकून जाते. काही लोक ओले आले फ्रीजमध्ये ठेवतात त्यामुळेही आले खराब होऊ लागते. नीट स्टोअर करण्यासाठी आले पूर्णपणे धुवा. आता आल्याचे पाणी कोरडे होऊ द्या. ज्या बॉक्समध्ये तुम्ही ते ठेवत आहात त्या बॉक्समध्ये कागद ठेवा आणि नंतर आले ठेवा. यामुळे आले महिनाभर खराब होणार नाही.


लसूण फ्रिजमध्ये ठेवावे की नाही?


लसूण फ्रिजमध्ये ठेवण्याची चूक अजिबात करू नका. लसूण फ्रिजमध्ये ठेवल्यास रबर सारखा होतो. याशिवाय त्याला बुरशी येऊ शकते.  इतर गोष्टींनाही  लसणाचा वास येऊ शकतो. सोललेला लसूण तर कधीही फ्रिजमध्ये उघडा ठेवू नका. सोललेला लसूण फ्रीजमध्ये ठेवायचा असेल तर तो एअर टाईट बॉक्समध्ये बंद करून ठेवा. पण लक्षात घ्या की लसूण जास्त वेळ फ्रिजमध्ये ठेवल्याने कोंब फुटू शकतात. लसूण बारीक करून त्याची पेस्ट बनवून स्टोअर करणे चांगले.



(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)