Sidharth - Kiara Relationship : सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि वरुण धवन करण जोहरच्या 'कॉफी विथ करण 8' या शोच्या आगामी भागात दिसणार आहेत. या दरम्यान सिद्धार्थ मल्होत्राने आपल्या लग्नाबाबत खूप खास अशा गो्ष्टी शेअर केल्या आहेत. ज्यामुळे या दोघांचं नातं किती वेगळं आहे. हे समजतं. या नात्यातून प्रत्येक कपलने शिकण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत. सिद्धार्थने पत्नी कियारा आडवाणीबद्दल शेअर केलेल्या गोष्टीतून तो किती प्रेम करतो हे कळतं. नातं अधिक घट्ट होण्यासाठी या 3 गोष्टी नक्कीच मदत करतील यात शंकाच नाही.  


लग्नानंतर बदलंल आयुष्य 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावर्षी फेब्रुवारीमध्ये सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी यांनी राजस्थानचे सात फेरे घेतले. या जोडप्याच्या लग्नाला 8 महिने पूर्ण झाले आहेत. लग्नानंतर आता सिद्धार्थ मल्होत्राने करणच्या शोमध्ये सांगितले आहे की, त्याच्यात आणि त्याची पत्नी कियारामध्ये खूप प्रेम आहे आणि आता त्याला पूर्वीपेक्षा जास्त जबाबदार वाटत आहे. सिद्धार्थ म्हणतोय त्याप्रमाणे प्रत्येक दाम्पत्याला लग्नानंतर जबाबदारीची जाणीव असणे अत्यंत गरजेचे असते. 


मला आता अधिक जबाबदार वाटतं


 'मी 16 वर्षांपूर्वी मुंबईत आलो आणि सुरुवातीपासून मित्रांसोबत एकटाच राहायचो. मी मित्रांसह खोल्या आणि अपार्टमेंट शेअर केले आहेत. आता माझ्याकडे कोणीतरी आहे ज्याला मी डेट केले आहे आणि हे स्पष्ट आहे की, मला आता जास्त जबाबदार वाटत आहे. मला असे वाटते की माझ्याकडे आणखी एक व्यक्ती आहे ज्याची मला काळजी घ्यावी लागेल.
नवऱ्याला बायकोबद्दल असं जबाबदारीने वाटण अत्यंत महत्त्वाचं आहे. यामुळे त्यांचं नातं अधिकच चांगल खुलतं. 


प्रेमाने कियारा या नावाने मारतो हाक 


या शोचा प्रोमो व्हिडिओ देखील समोर आला आहे, ज्यामध्ये करण सिद्धार्थला कियारा अडवाणीबद्दल विचारतो की, तू कोणत्या तीन गोष्टींनी कियाराला हाक मारतोस? यावर सिद्धार्थने उत्तर दिले, "लव्ह, की आणि बे". कियारा अडवाणीचे कौतुक करताना तो म्हणाला की, ती मला अधिकाधिक मेहनत करायला सांगते. ती मुंबईत वाढली असली तरी ती खूप वेगळी आहे.
आपल्या जोडीदाराबद्दल इतकं मोकळेपणे मत आणि भावना व्यक्त करता येणे अत्यंत गरजेचे आहे.


सिद्धार्थचा खास व्हिडीओ


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Karan Johar (@karanjohar)


सिद्धार्थ कियाराच लग्न


सबॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​​यांनी एकमेकांना डेट केल्यानंतर राजस्थानमधील जैसलमेरमध्ये लग्न केले. या सुंदर जोडप्याच्या शाही लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अभिनेत्री कियारा अडवाणीने 7 फेब्रुवारी 2023 रोजी इंस्टाग्रामवर तिच्या लग्नाचे फोटो चाहत्यांसह शेअर केले. सिद्धार्थ मल्होत्रासोबत लग्न केल्यानंतर कियारा अडवाणीने तिचा आनंद चाहत्यांसोबत शेअर केला, त्यानंतर चाहत्यांनी या जोडप्यावर प्रेमाचा वर्षाव सुरू केला. सिड-कियाराने सोशल मीडियावर लाईक्सच्या शर्यतीत आलिया-रणबीरला मागे टाकले आहे.