होळीच्या दिवशी जन्माला आलेल्या मुलांसाठी परफेक्ट नावे आणि अर्थ
Baby Names on Holi : होळी हा सण प्रत्येकाच्या आवडीचा सण आहे. रंगाची उधळण केल्या जाणाऱ्या या दिवशी जर तुमच्या घरी कृष्ण जन्माला, तर त्यासाठी पुढील नावांचा नक्की विचार करा.
Holi 2024 : रंग आणि उत्साहाची उधळण म्हणजे होळी, रंगपंचमीचा सण. 24 मार्च रोजी होलिका दहन असून 25 मार्च रोजी रंगपंचमीचा उत्सव साजरा केला आहे. देशभरात होळीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. तसेच हिंदू धर्मातही होळीच्या सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवशी तुमच्या घरी एक छोटासा पाहुणा आला तर काय म्हणावं? जर तुमच्या घरात होळीच्या दिवशी मुलगा झाला तर तुम्ही त्याला या सणाशी संबंधित नाव देऊ शकता.
यावेळी होळीचा सण 25 मार्च 2024 रोजी येत आहे. तुम्हाला मुलांसाठी होळीच्या रंगांशी संबंधित काही नावे सांगत आहोत. या नावांसोबतच त्यांचा अर्थही सांगितला जाईल ज्यामुळे तुम्हाला नाव निवडणे थोडे सोपे होईल.
आरन्य आणि अलानी
भारतीय मुलांच्या नावाकरिता वरील नावांचा विचार करु शकता. 'आरन्य' म्हणजे हिरवळ, याच्याशी मिळतं जुळतं हे नाव आहे. 'अलानी' हे देखील मुलांचं नाव आहे. नारंगी रंगाला अलानी असं म्हटलं जातं. हे नाव अतिशय युनिक नाव आहे.
अहमर आणि अर्जुन
'अहमर' हे नाव लाल रंगाशी जोडलेले आहे आणि लाल रंगाशिवाय होळीची मजा अपूर्ण राहते. जर आपण 'अर्जुन' नावाबद्दल बोललो तर या नावाचा अर्थ पांढरा आहे. ही दोन्ही नावे खूप चांगली आहेत. 'अर्जुन' नावाचा अर्थ आहे पांढऱ्या रंगाशी संबंधित नाव.
रोहित
'रोहित' या नावाचा अर्थ आहे लाल रंगाशी संबंधित नाव, संस्कृतमधून आलेले आणि याचा अर्थ "सूर्याची पहिली किरणे. त्यामुळे तुम्ही मुलासाठी या नावाचा नक्कीच विचार करु शकता.
अरुण आणि आस्वाद
'अरुण' हे नाव मुलांसाठी खूप लोकप्रिय आहे. उगवत्या सूर्याच्या लालसरपणाला 'अरुण' म्हणतात. 'आस्वाद' हे मराठमोळ नाव आहे जे काळ्या रंगाशी संबंधित आहे. 'अझ्राक' हे नाव देखील या यादीत आहे जे निळ्या रंगाशी संबंधित आहे. जर तुम्ही युनिक नावे शोधत असाल तर तुम्ही या नावांपैकी एकाचा विचार करू शकता.
धवल आणि हरित
ही दोन्ही नावे हिंदू मुलांसाठी आहेत. 'धवल' हे नाव पांढऱ्या रंगाशी आणि 'हरित' हे नाव हिरव्या रंगाशी जोडलेले आहे. तुम्ही तुमच्या बाळासाठी या दोनपैकी एक नाव निवडू शकता.
मुलांसाठी नावे आणि अर्थ
होळीशी संबंधित नावांच्या या यादीत 'लोहित', 'नील', 'पुष्कर' आणि 'रजत' यांचाही समावेश आहे. 'लोहित' हे नाव लाल रंगाशी, 'नील' हे निळ्या रंगाशी, 'पुष्कर' हे निळ्या कमळाशी आणि 'रजत' हे नाव चांदीच्या रंगाशी संबंधित आहे.