आईने जोक मारल्यावर, 5 वर्षांपासून कोमात असलेली मुलगी अचानक हसू लागली
Jennifer Flewellen Wakes Up From Coma: कधी कधी आपण कुणा आजारी व्यक्तीच्या जगण्याची आशा सोडतो. पण असा काही चमत्कार होतो की, सगळेच बघत राहतात. असाच एक चमत्कार आई-मुलीच्या नात्यात पाहायला मिळत आहे.
US Woman Wakes Up After 5 Year Of Coma: जेव्हा एखादी व्यक्ती गंभीर अपघातानंतर कोमात जाते, तेव्हा त्याला शुद्धीवर येणे खूप कठीण वाटते, परंतु आईचे आशीर्वाद आणि तिचा पाठिंबा कधीकधी अशक्य गोष्टी देखील शक्य करतात. असाच एक चमत्कार अमेरिकेत घडला, जो ऐकल्यानंतर प्रत्येकाचा विश्वास बसेल की उपचारासोबतच भावनिक स्पर्श किती महत्त्वाचा आहे.
अमेरिकेतील मिशिगनमधील जेनिफर फ्लेवेलन या महिलेचा सप्टेंबर 2017 मध्ये कार अपघात झाला होता. त्यानंतर ती कोमात गेली होती. तिची बरी होण्याची शक्यता फारच कमी होती, पण 5 वर्षांनी असा चमत्कार घडला की सर्वजण थक्क झाले. 25 ऑगस्ट 2022 रोजी, जेनिफर अचानक जागी झाली जेव्हा तिच्या आईने एक मजेदार विनोद सांगितला आणि ती हसायला लागली.
'स्वप्न सत्यात अवतरले'
पीपल मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत जेनिफर फ्लेवेलनची आई पेगी मीन्स म्हणाली, 'जेव्हा ती उठली तेव्हा मला पहिल्यांदा भीती वाटली, कारण ती हसत होती, जे तिने यापूर्वी कधीही केले नव्हते. प्रत्येक स्वप्न सत्यात उतरले. ही गोष्ट कधी घडेल अशी आशाच मी सोडली होती. ती गोष्ट सत्यात उतरली होती. पाच वर्षे कोमात असलेली माझी मुलगी उठली होती.
जेनिफर अजूनही पलंगावरच
जेनिफर फ्लेव्हलीला तिच्या कोमातून शुद्ध आलेली आहे. परंतु ती अजूनही बोलण्यासाठी आणि चालण्यासाठी खूप कठोर मेहनत करत आहे. तिच्यासाठी व्हॅन मिळवण्यासाठी मोहीम चालवली जात आहे. जेनिफरची आई म्हणाली, 'ती उठली आहे, पण पूर्णपणे नाही. तिला बोलता येत नाही, पण ती मान हलवत आहे. कदाचित ती बहुतेक वेळा झोपलेली असेल, परंतु जसजसे महिने निघून जातील तसतसे ती अधिक मजबूत आणि जागृत होईल.
प्रगतीची आशा
मिशिगन शहरातील मेरी फ्री बेड रिहॅबिलिटेशन हॉस्पिटलचे फिजिशियन डॉ. राल्फ वांग म्हणाले, 'ती कोमातून फक्त बाहेर आला नाही, तर तिच्या तब्बेतीत सकारात्मक परिणाम पाहायला मिळत आहे. हे शक्य आहे की, केवळ 1 ते 2 टक्के रुग्णांना पुन्हा बरे झाल्यानंतर त्यांच्या तब्बेतीमध्ये सुधारणा होते. शुद्धीवर आल्यानंतर, जेनिफर फ्लेवेलन तिचा मुलगा ज्युलियनचा फुटबॉल सामना पाहण्यासाठी आली. ज्युलियन म्हणाली, 'ती माझी सर्वात मोठी समर्थक आहे, तिने मला चिअर केल्यामुळे सगळ्यात जास्त आनंद झाला.