अंघोळीच्या आधी चुकूनही करू नका `या` चूका! होऊ शकतो Geyser चा स्फोट
Water Heater Geyser Most Common Mistakes : तुमच्याही घरी आहे गिझर आणि ते चालू करण्याआधी तुम्हीही करता का या चुका? आजच वाचा ही बातमी
Water Heater Geyser Most Common Mistakes : आज प्रत्येकाच्या घरी गिझर असतं. त्याचं कारण म्हणजे आपल्याला हवं तेव्हा आपल्याला अंघोळीसाठी लगेच गरम पाणी मिळू शकतं. त्यातही आता तर हिवाळा आहे अशात आपल्याला सकाळी तर गरम पाणी हवंच. त्यातही आपल्याला एका मिनिटात पाणी गरम आणि हवं त्या तापमानात मिळतं. आता तुमच्याही घरात गिझर असेल तर आज एक महत्त्वाची गोष्ट जाणून घेणं गरजेचं आहे आणि ते म्हणजे अनेकदा आपण ऐकत असतो की गिझरचा स्फोट झाला. अशात तुम्हाला ही भीती असेल तर तुम्ही काय करायला हवं हे जाणून घेऊया.
पाण्याशिवाय वापर
जर तुमच्या घरातील गिझर थेट पाण्याच्या टाकीशी जोडलेलं असेल आणि अशा वेळी जर पाण्याची टाकी ही रिकामी झाली तर गिझर जास्त गरम होऊ शकतं. असं का तर जर पाणी नसेल आणि गिझर सुरु राहिलं तर ते नक्कीच तापणार आहे आणि अशामुळे स्फोट होतो. त्यामुळे गिझर ऑन करण्याआधी नेहमची हे लक्ष ठेवा की तुमच्या पाण्याच्या टाकीत पाणी आहे की नाही हे तपासा आणि पाणी नसेल तर बटन चालू करू नका. बटन चालू करण्याआधी पाण्याच्या टाकित पाणी घाला.
योग्य प्रकारे वायरिंग केली नसेल
गिझरची वायरिंग खराब झाली असेल किंवा तुम्हाला कधी शॉट सर्किट झाल्याचे कळत असेल तर तुम्ही लगेच ते दुरुस्त करण्याचा विचार केला पाहिजे. कारण अनेकवेळा गिझरमुळे वायरिंग खूप गरम होते आणि त्यामुळेही स्फोट होण्याची शक्यता वाढते. याशिवाय गरझचा दाब जास्त प्रमाणात वाढतो. त्यामुळे जर वायरिंग ठीक नाही हे तुमच्या लक्षात आले तर लगेच त्याकडे लक्ष द्या.
काम झाल्यानंतर गिझर बंद करा
अनेकदा लोक ही काम झाल्यानंतर गिझरचं बटन बंद करणं विसरतात. असं केल्यानं तुम्ही नळ जरी बंद केला असेल तर गिझर हे पूर्णवेळ गरम होत असतं. त्यामुळे एकतर तुमचं विजेचं बिल वाढतं, पाण्याची क्वालिटी खराब होऊ शकते आणि त्यासोबतच गिझर खराब होण्याच्या देखील शक्यता आहे. इककंच नाही तर जर गिझर खूप वेळ सुरु राहिला तर स्फोट होण्याची देखील शक्यता आहे.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. ते अवलंबण्यापूर्वी, नक्कीच वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)