Secret Sleep Divorce म्हणजे काय? एकत्र राहूनही झोपतात मात्र वेगवेगळे
Relationship Tips : लग्नानंतर वेगवेगळ्या खोलीत झोपणे हे समाजाच्या दृष्टीकोनातून चुकीचे आहे. मात्र एका अभ्यासानुसार, जोडीदारांमध्ये नातं चांगल राहण्यासाठी हे फायदेशीर ठरत आहे.
पती-पत्नीचं नातं हे फक्त एकत्र झोपण्यापूर्ती मर्यादेत नसतं. प्रत्यक्षात एका छताखाली दोन व्यक्ती एकमेकांसोबत प्रेम, आपुलकीने राहतात, हेच अपेक्षित आहे. कारण पती-पत्नीचं नातं आणि त्यामधील अनेक पैलू समजून घेणे गरजेचे आहे. पण यामध्ये कपल एकत्र झोपत नाहीत, मेडिकल टर्ममध्ये याला 'स्लीप डिवोर्स' नावाने ओळखलं जातं. महत्त्वाच म्हणजे यामध्ये पार्टनर रात्री एकमेकांसोबत झोपण्याऐवजी वेगवेगळे झोपणे पसंत करतात. हे तुम्हाला वाचून, ऐकून विचित्र वाटत असेल पण याची रिलेशनशिपसोबतच आरोग्याचेही असंख्य फायदे आहेत.
या लेखात आपण 'स्लीप डिव्होर्स' पती-पत्नीमधील नातेसंबंध कसे सुधारते तर ते त्यांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठीही फायदेशीर ठरते. यासाठी तज्ज्ञांनी दिलेली प्रतिक्रिया अत्यंत महत्त्वाची ठरते. तज्ज्ञ सांगतात की, अशा नात्यामध्ये पर्सनल स्पेस देखील अतिशय महत्त्वाची आहे. कायम एकमेकांसोबत राहणाऱ्या दोघांमध्ये इतका दूरावा महत्त्वाचा आहे. कारण यामुळे प्रत्येकाला मिळणारी शांतता महत्त्वाची ठरणार आहे. कारण प्रत्येकाला हवा असलेला एकांत या रुपात मिळेल.
चांगली झोप येण्यास मदत होते
चांगली झोप प्रत्येक व्यक्तीसाठी खूप महत्त्वाची असते आणि कधीकधी जोडीदारासोबत झोपल्याने झोपेचा त्रास होतो. जोडीदाराच्या वारंवार बाजू बदलण्याच्या किंवा घोरण्याच्या सवयीमुळे लोकांची झोप अनेकदा पूर्ण होत नाही. अशा परिस्थितीत जोडीदारापासून वेगळे झोपून पूर्ण झोप घेण्यास काही नुकसान नाही कारण पूर्ण झोप घेतल्याने सर्व प्रकारच्या शारीरिक समस्या आपोआप दूर होतात.
मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर
पती-पत्नीसाठी स्वतंत्रपणे झोपणे दोघांच्या मानसिक आरोग्यासाठी सर्वात फायदेशीर ठरते. जेव्हा तुम्हाला शांत झोप मिळते तेव्हा ती तुम्हाला मानसिक ऊर्जा देते आणि ही मानसिक ऊर्जा तुम्हाला तणाव, चिंता आणि इतर मानसिक नैराश्यापासून वाचवते. त्यामुळे जेव्हा जेव्हा तुम्हाला तणाव किंवा मानसिक खच्चीकरण वाटत असेल तेव्हा तुम्ही तुमच्या जोडीदाराकडून काही दिवसांसाठी 'स्लीप डिव्होर्स' नक्कीच घ्यावा.
हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर
तुमच्या जोडीदाराशी तुमचे नाते जोडलेल्या हृदयाच्या आरोग्याची काळजी घेणे देखील तुमची जबाबदारी आहे. तुमच्या जोडीदारासोबत झोपताना अंतर राखणे तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. वास्तविक, झोपेच्या कमतरतेमुळे उच्च रक्तदाबाचा धोका वाढतो आणि उच्च रक्तदाब हृदयासाठी हानिकारक असतो. अशा स्थितीत पुरेशी झोप घेतल्याने हृदयविकाराचा धोका बऱ्याच अंशी कमी होतो.
त्वचा निरोगी ठेवण्यास मदत
चांगली झोप आणि मानसिक शांती तुमची त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करते. झोपेच्या कमतरतेमुळे चेहऱ्यावर मुरुमांची समस्या सतावते आणि यामुळे डोळ्यांखाली काळी वर्तुळे दिसू लागतात. अशा परिस्थितीत चेहऱ्याचे सौंदर्य टिकवण्यासाठी एकांतात पुरेशी झोप घेणे गरजेचे आहे. यासाठी तुम्ही तुमच्या जोडीदाराकडून ठराविक अंतराने 'स्लीप डिव्होर्स' घेऊ शकता.
व्यक्तिमत्व विकास
‘स्लीप डिव्होर्स’ देखील तुमच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी उपयुक्त ठरू शकतो. जेव्हा तुम्ही एकटे झोपता तेव्हा तुम्ही स्वतःसोबत वेळ घालवू शकता. हा एकांत तुम्हाला केवळ शांतीच देत नाही तर तुम्हाला स्वतःसाठी विचार करण्याची संधी देखील देतो. झोपण्यापूर्वी तुम्ही स्वतःबद्दल विचार करता आणि निरीक्षण देखील करता. ही विचारसरणी तुमच्या व्यक्तिमत्त्वाच्या विकासासाठी उपयुक्त ठरू शकते.