वजन कमी करण्याचा 2-2-2 फॉर्म्युला नेमका काय? काहीही कष्ट न घेता झटपट कमी होईल वजन
What Is 2-2-2 Method Of Weight Lose: तुम्ही सुद्धा वजन कमी करण्यासाठी 2-2-2 पद्धतीचा वापर करण्याचा विचार करत असाल तर नेमकी ही पद्धत काय आहे? त्याचे फायदे आणि तोटे काय आहेत हे समजून घेणं गरजेचं आहे.
What Is 2-2-2 Method Of Weight Lose: असंख्य डाएट्स, जेवणातील वेगवेगळे बदल आणि वेगवेगळ्या ट्रीक्स वापरुन वजन कमी करण्याचा प्रयत्न केले जातात. यापैकीच एक पद्धत म्हणजे 2-2-2 पद्धत! अन्नपदार्थांचे सेवन आणि व्यायाम या दोन्ही गोष्टी 2-2 च्या सेटमध्ये करण्याची ही अनोखी पद्धत आहे. "शरीराला सातत्याने हायड्रेशन मिळत रहावं आणि अन्नाच्या माध्यमातून आवश्यक तत्वांचा पुरवठा करणारी ही बॅलेन्स डाएट पद्धत आहे. यामध्ये सहभागी होणाऱ्या व्यक्तींनी फळं, भाज्य आणि पाण्याचे सेवन 2 भागांमध्ये करणं अपेक्षित असतं. 2 फलं, 2 भाज्या आणि 2 लीटर पाण्याबरोबरच दिवसभरात 2 वेळा चालायला जाणं असं समिकरणं अपेक्षित असतं," असं बंजारा हिल्स येथील केअर हॉस्पीटलमधील जीआय सर्जन असलेले डॉ. कृष्णमोहन सांगतात.
दोन मोठे फायदे
आपल्या शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण कायम राहणं फार महत्त्वाचं असतं. म्हणूनच दिवसातून दोन बाटल्या पाणी पिण्याचा सल्ला काही आहारतज्ज्ञ देतात. "रोज दोन बाटल्या पाणी प्यायल्याचे दोन मोठे फायदे आहेत. यामुळे ऊर्जा मिळते आणि भूकेवर नियंत्रणं राहते. तसेच दोन फळं आणि दोन भाज्या खाल्ल्यास आवश्यक ते सर्व घटक मिळतात. यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. दिवसातून दोनदा चालल्याने आवश्यक ती शारीरिक हलचाल होते. त्यामुळे हृदयाच्या क्रिया सुरळीत राहून आवश्यक तेवढ्या कॅलरीज वापरल्या जातात," असं बंगळुरुमधील अॅस्टर व्हाइटफिल्ड रुग्णालयातील आहारतज्ज्ञ वीणा व्ही. यांनी सांगितलं.
कशापद्धतीने सुरु करता येईल 2-2-2 डाएट?
दैनंदिन दिनक्रमामध्ये अवेळी खाल्ल्या जाणाऱ्या गोष्टींऐवजी फळं खावीत आणि पाणी प्यावं. या प्राथमिक बदलापासून 2-2-2 डाएटला सुरुवात करता येईल. "जेवणाचं नियोजन करताना त्यामध्ये 2 फळं आणि 2 भाज्यांचा समावेश असेल आणि पाणी भरपूर प्रमाणात प्यायला जाईल याची काळजी घ्यावी. जेवणात सॅलेडचा समावेश करावा. या माध्यमातून वजन कमी करणं शक्य आहे. 2-2-2 पद्धतीमुळे वजन कमी करण्याबरोबरच आरोग्यदायी जीवनशैली आणि आहारपद्धती अवलंबता येते," असं डॉ. कृष्णमोहन यांनी सांगितलं.
वाईट परिणामही होतात
मात्र या 2-2-2 पद्धतीचे काही वाईट परिणामही आहेत. वीणा यांनी दिलेल्या माहितीनुसार, मात्र वजन कमी करण्यासाठी ही आदर्श पद्धत नसल्याचं म्हटलं आहे. "आहाराच्या दर्जाचा विचार यात केला जात नाही. यामध्ये एकूण कॅलरीजचा विचार होत नाही. आहारासंदर्भातील निर्बंध आणि खासगी आरोग्य याकडे विशेष लक्ष दिलं जात नाही. आहारविषयक गोष्टी या वय, लिंग, शारीरिक हलचाली आणि अन्नावर प्रक्रिया करण्याचा वेगावर अवलंबून असतात. त्यामुळेच दिर्घकालीन विचार केल्यास प्रत्येक व्यक्तीनुसार आहाराचे नियोजन फायद्याचं ठरतं," असं वीण यांचं म्हणणं आहे.
हे फॉलो करावं का?
2-2-2 या पद्धतीमधील साधेपणा हा आकर्षित करणारा आहे. जेवणाच्या पद्धतीमध्ये सुधारणा करणं हाच यामागील मूळ हेतू दिसतो. पण केवळ एवढं करुन वजन कमी करणं शक्य होईलच असं नाही. किंवा सर्वांनाच हे मानवेल असं नाही. त्यामुळेच आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच यासंदर्भात योग्य तो निर्णय घेणं फायद्याचं ठरतं.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)