सध्या सगळीकडे ख्रिसमस, नाताळ या सणाचं मंगलमय आणि उत्साहाचं असं वातावरण आहे. संत येशू ख्रिस्ताचा जन्म म्हणून हा दिवस साजरा केला जातो. ख्रिसमसच्या या सणांमध्ये सँटाक्लॉजची संकल्पना आहे. यामध्ये सँटा येऊन सिक्रेटली गरजूंना गिफ्ट देऊन जातो, असं आख्यायिकेत सांगितलं आहे. यामागची भावना ही असते की, कुणालाही मदत करताना ती सिक्रेट असावी, कुणालाही न सांगता फक्त एकमेकांना मदत करण्याच्या दृष्टीकोनातून हा दिवस साजरा केला जातो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यामुळे अनेक ऑफिसमध्ये सिक्रेट सँटा खेळण्याची पद्धत आहे. तसेच लहान मुलांना देखील सिक्रेट सँटा येऊन गिफ्ट्स देतो अशी देखील संकल्पना आहे. ख्रिसमसमधील हा प्रकार देखील आनंदाने साजरा केला जातो. असं असताना ख्रिसमसच्या दिवशी सोशल मीडियावर हिंदू संस्कृती जपणाऱ्या वासुदेवाची देखील चर्चा होते. सिक्रेट सँटा खेळणाऱ्यांना हिंदू संस्कृतीमधील वासुदेवाची माहिती आहे का?  हा वासुदोव कोण आहे? या वासुदेवाच्या टोपी मागचं कारण काय?


वासुदेव कोण आहे? 
हिंदू संस्कृतीमध्ये वासुदेवाला अनन्य साधारण महत्त्व आहे. समाज प्रबोधन करणारी एक संस्था आहे. कायम आपल्या गीतातून तत्त्वज्ञान सांगितले जाते. चांगले काम करावे आणि चांगल्या वाईट अनुभवाचीची शिदोरी परमेश्वरावर सोपवावी हा दृष्टीकोन वासुदेव देतात. 


इतिहास काय सांगतो?
मुघल साम्राज्यात संत एकनाथ महाराजांनी वासुदेव हा धर्म उभारुन वासुदेव समाजाची स्थापना केली. यामधून धर्म प्रचारासाठी तयारी करुन घेतली. तसेच मुघल साम्राज्याविरुद्ध धर्मप्रचार करुन लढा उभारला असाही इतिहास सांगितला जातो. हजार-बाराशे वर्षे जुनी अशी ही परंपरा आहे. ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव यांच्यासह एकनाथ महाराजांनी वासुदेव यांना प्रकाशझोतात आणलं. 


सिक्रेट सँटा आणि वासुदेवाचा काय संबंध?


दरवर्षी सोशल मीडियावर सिक्रेट सँटा किंवा ख्रिसमस आलं की, एका विषयावर जोरदार चर्चा होते. तो विषय म्हणजे हिंदुंना आपल्या वासुदेवाचा विसर पडला. सोशल मीडियावर यावर जोरदार चर्चा, टीका, ट्रोलिंग असं सुरु असतं. असं असताना सिक्रेट संँटा आणि ख्रिसमसचा काही संबंध आहे का? अशी देखील चर्चा होते. 


सिक्रेट सँटा आणि ख्रिसमसचा काय संबंध?


सिक्रेट सँटा आणि ख्रिसमस याचा थेट असा काही संबंध नाही. तसेच सँटा हा कायम सिक्रेटच का असतो? अशी विचारणा देखील केली जाते. तर सँटा आपल्या कृतीतून एक शिकवण देत असतो ती म्हणजे कोणतंही कार्य करताना. मग ती मदत असो किंवा दान हे शांतपणे, सिक्रेटली करणे गरजेच असतं. हा विचार ख्रिसमस या नाताळाच्या सणाला प्रत्येकाने अंगीकारला पाहिजे. या दृष्टीकोनातून हा दिवस साजरा केला जातो.