Women's Jeans Small Pocket : आजकाल मोठ्या प्रमाणात लोक हे जीन्स घातल्याचे आपण पाहतो. त्यातही जीन्सचे वेगवेगळे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. जीन्सची फॅशन हळू हळू जुनी होते असे अनेक लोक म्हणतं असले तरी देखील जीन्सला कॅरी करणं आणि त्यामुळे मिळणाऱ्या कम्फर्टमुळे लोक जीन्स परिधान करतात. पण अनेकदा मुलींना प्रश्न पडलो की आमच्या जीन्सचे पॉकेट हे नेहमीच छोटे का असतात? आणि पुरुषांच्या जीन्सचे पॉकेट नेहमी मोठे का असतात? तर स्त्रीयांच्या जीन्सचे पॉकेट छोटे असण्याची तीन कारण आहेत. चला ते जाणून घेऊया...


स्त्रीयांच्या जीन्सचे पॉकेट छोटे का असतात? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जीन्स बनवण्याची पद्धत
खरंतर महिला आणि पुरुष या दोघांच्या जीन्समध्ये खूप फरक असतो. महिलाची कंबर ही पुरुषांच्या तुलनेत कर्वी असते. अनेक जीन्समध्ये लायक्रा स्ट्रेच नावाचं फॅब्रेक वापरण्यात येतं. त्याला पॉकेट लावले तर हे फॅब्रिक स्ट्रेच होऊ शकतं आणि त्यामुळे जीन्स लवकर फाटू शकते. 


स्वस्त जीन्स
हे थोडं ऐकायला वेगळं वाटतं पण जीन्सला पॉकेट लावण्यासाठी थोडा खर्च जास्त असतो. त्याला तुम्ही फॅशन स्कॅम देखील बोलू शकतात. अनेकदा मोठ्या कंपन्या या छोटं पॉकेट किंवा पॉकेट न लावता जीन्स विकतात. कारण पॉकेट लावण्याचा खर्च हा कमी होतो. एस्थेटिक आणि ट्रेंडी लूक जीन्सला देत ते कमी किंमतीत बनवण्यासाठी कंपनी त्यांना छोटे पॉकेट देतात. 


बॉडी शेप 
मोठ्या प्रमाणात महिलाच्या जीन्स या बॉडी फिट असल्याचे आपण पाहतो. बॅगी किंवा वाईड लेग जीन्स देखील कंबरेच्या इथे फिटिंगमध्ये असतात. महिलांचं बॉडी शेप विचित्र दिलायला नको म्हणून त्यांच्या जीन्सचे पॉकेट हे छोटे ठेवण्यात येतात. मोठ्या पॉकेटसाठी कपड्याची मोठी लेयर लागते आणि त्यामुळे बॉडी शेप खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे काही ब्रॅंड्स जीन्सचे पॉकेट हे छोटे ठेवतात. 


महिलांच्या जीन्सला कधी पासून येऊ लागले पॉकेट्स काय आहे त्याचा इतिहास?


1. काही काळापूर्वी कोणाच्याही कपड्यांना पॉकेट्स नसायचे आणि लोक त्यांच्यासोबत सगळीकडे बॅग घेऊन फिरायचे. 


2. 17 व्या शतकात सगळ्यात आधी पुरुषांच्या कपड्यांना पॉकेट्स लावण्यात आले. त्या पॉकेट्समध्ये पुरुष त्यांना लागणाऱ्या छोट्या-मोठ्या गोष्टी ठेवायचे. 


3. फ्रांसीसी क्रांती आल्यापासून महिलांच्या कपड्यांमध्ये खूप बदल झाला. 


4. 1820 मध्ये महिला अशी बॅग वापरू लागल्या जी बेल्टनं त्या कंबरेवर घालायच्या. 


5. तर 1891 मध्ये सगळ्यात आधी रॅशनल ड्रेस सोसाइटीनं महिलांच्या कपड्यांमध्ये पॉकेट दिले. 


6. आजकालच्या काळात प्रोडक्शन कॉस्ट वाचवण्यासाठी अनेक ब्रॅंड्स हे पॉकेट्स छोट्या देतात.