पार्टनर प्रत्येक कामात निरुत्साही आहे? सोडून द्याल की सुधारण्याची वाट पाहाल? थेरपिस्ट काय सांगतात?
आपला जोडीदार सगळ्याच गोष्टीला नकार देतो. कोणत्याच गोष्टीमध्ये त्याचा उत्साह दिसत नाही? असा अनुभव तुमचा देखील आहे. नात्यामध्ये काय बदल करणे गरजेचे.
कोणत्याच दिवशी तुमचा जोडीदार उत्साही वाटत नाही. एवढंच नाही तर अगदी विकेंडला देखील आनंदी नसतो. अशावेळी तुमचं नातं कठीण परिस्थितीतून जात आहे, हे समजून घ्या. अशा नातेसंबंधाबद्दल आम्ही नातेसंबंधातील थेरपिस्ट यांच्याशी संपर्क साधला. थोडी किचकट झालेल्या नात्याला कशा पद्धतीने हाताळाल. जर तुमचा पार्टनर प्रत्येक गोष्टीमध्ये निरुत्साही असेल, तर त्यामागची कारणे समजून घेणे आवश्यक आहे.
जोडीदार इंट्रोवर्ट असेल
अनेकदा जोडीदार हा इंट्रोवर्ट असतो. सोशल गोष्टींमध्ये या जोडीदाराचा सहभाग कमी असतो. एवढंच नव्हे तर ही व्यक्ती सगळ्याचबाबतीत फार निरुत्साही असतो. एकमेकांशी संवाद साधताना या व्यक्तीला अडथळे येतात. ते कमी बोलतात किंवा त्यांना बोलणे आवडत नाही.
तुमचा जोडीदार नाराज असेल
अनेकदा आपला पार्टनर आपल्या सोबत फार संवाद साधत नाही. अशावेळी तो डिप्रेस असेल हे देखील आपल्याला कळत नाही. त्यामुळे जोडीदाराला थोडा वेळ द्या. तो त्याच्या परिस्थितीसोबत झगडत असेल तर त्याला थोडा वेळ द्या.
जोडीदार टाळाटाळ करत असेल
अनेकदा तुमचा पार्टनर सगळ्या गोष्टींमध्ये टाळाटाळ करत असेल तर त्याला थोडा वेळ द्या. काही जोडीदार प्रवास करणे टाळतात. किंवा तुमच्यासोबत टाईम स्पेंड करताना कंटाळा करत असेल तर त्याला वेळ द्या.
तुम्ही काय म्हणता त्यात मला रस नाही
जर तुमच्या जोडीदाराला तुमचे बोलणे विचित्र वाटत असेल किंवा त्यांना त्यात रस नसेल तर तुम्ही समजून घ्या की कुठेतरी पार्टनर तुमच्या बोलण्याने कंटाळत आहे. अशा वेळी दोघांनी मिळून काही तरी प्लानिंग केले पाहिजे.सुरुवातीला तुम्हाला थोडे कष्ट करावे लागतील आणि तुमच्या जोडीदाराला स्वतःला समजावून सांगावे लागेल, परंतु काही काळानंतर संवादाची समस्या हळूहळू सुटू लागेल.
जोडीदाराला प्राधान्य देणे बंद करा
जर सुरुवातीला सर्वकाही बरोबर असेल आणि नंतर नात्यातील तुमची जागा कुठेतरी गेली तर ते नाते स्वतःच योग्य नाही. कधी कधी नात्यात छोटासा उपक्रमही खूप महत्त्वाचा ठरतो. जर तुम्हाला असे वाटू लागले असेल की, आता तुम्ही तुमच्या जोडीदाराची प्राथमिकता नाही, तर थोडे लक्ष द्या आणि समस्या कोठून सुरू झाली हे समजून घेण्याचा प्रयत्न करा.