डिसेंबर महिन्यातच का साजरा केला जातो Christmas नाताळ? कारण अतिशय खास
Christmas Facts : वर्षाच्या शेवटच्या महिन्यात साजरा होणार ख्रिसमस हा सण जगभरात अतिशय आनंदात आणि उत्साहात साजरा केला जातो. जाणून घेऊया, ख्रिसमस म्हणजेच नाताळ हा सण डिसेंबर महिन्यातच साजरा करण्याच कारण काय?
Christmas Facts: भारतातही आता ख्रिसमस हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. परदेशाप्रमाणेच भारतातही सण वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की, नाताळचा सण डिसेंबरमध्येच का साजरा केला जातो? जाणून घेऊया या मागचे मनोरंजक कारण, जे अतिशय वेगळे आहे.
का साजरा केला जातो नाताळ?
ख्रिसमस साजरा करण्याची अनेक कारणे आहेत. असे म्हटले जाते की, येशू ख्रिस्ताचा जन्म 25 डिसेंबर रोजी झाला होता. येशू ख्रिस्ताचे मुलांवर खूप प्रेम होते. यामुळेच नाताळच्या दिवशी मुलांसाठी खास भेटवस्तू खरेदी केल्या जातात.
नाताळ डिसेंबरमध्येच का साजरा केला जातो?
ख्रिसमसच्या उत्सवाशी संबंधित एक कथा सांगितली जाते. असे मानले जाते की, येशूची आई मेरीने आधीच भाकीत केले होते की ती 25 डिसेंबर रोजी 9 महिन्यांनंतर आई होईल. नऊ महिन्यांनंतर नेमके तेच घडले. यामुळेच दरवर्षी 25 डिसेंबरला ख्रिसमस साजरा केला जातो. प्रभू येशूचा जन्म २५ डिसेंबर रोजी झाला. म्हणूनच हा दिवस ख्रिसमस म्हणून साजरा केला जातो. येशू ख्रिस्ताचा जन्म मदर मेरीच्या पोटी झाला.असे मानले जाते की मेरी (मदर मेरी) हिला एक स्वप्न पडले होते ज्यामध्ये तिने प्रभुचा पुत्र येशूला जन्म देण्याची भविष्यवाणी केली होती. या स्वप्नानंतर, मेरी गर्भवती झाली आणि तिच्या गरोदरपणात तिला बेथलेहेममध्ये राहावे लागले.
नाताळ या शब्दाचा इतिहास
नाताळ हा शब्द लॅटिन भाषेचा नातूय या शब्दापासून तयार झालेला आहे. त्याच्या अर्थ 'जन्म' असा होतो. इंग्रजी भाषेत त्याला 'ख्रिसमस' असे म्हणतात. येशु ख्रिस्ताचा जन्म जगाचा इतिहासातील सर्वात मोठी ब्राह्मणडनीय घटना होती.
ख्रिसमस ट्री खूप खास
ख्रिसमस ट्रीला पाइन आणि फर ट्री देखील म्हणतात. या झाडाचा आकार त्रिकोणी आहे, ज्यामुळे तो विशेष आहे. ख्रिसमसच्या सणामध्ये हे झाड घरात केवळ सजावटीसाठी लावले जात नाही. या दिवशी ख्रिसमस ट्री लावणे खूप शुभ मानले जाते.ख्रिसमसची ट्री ची एक आख्यायिका आहे. त्या दिवशी या झाडाची सजावट कशी सुरू झाली.ख्रिसमसच्या दिवशी सदाहरित वृक्ष सजवून उत्सव साजरा केला जातो. ही परंपरा जर्मनीपासून सुरू झाली, ज्यामध्ये एका आजारी मुलास संतुष्ट करण्यासाठी त्याच्या वडिलांनी सदाहरित वृक्ष सुंदरपणे तयार केला आणि त्याला एक भेट दिली. तसेच जेव्हा येशूचा जन्म झाला तेव्हा सर्व देवतांनी आनंद व्यक्त करण्यासाठी सदाहरित वृक्ष सजविला, तेव्हापासून हे झाड ख्रिसमसच्या झाडाचे प्रतीक मानले गेले आणि ही परंपरा लोकप्रिय झाली.
ख्रिसमस कसा साजरा करायचा
ख्रिसमसला खूप खर्च करून घर सजवलं पाहिजे असं नाही. घरातील टाकाऊ वस्तू तुम्ही सजावटीसाठी वापरू शकता. यासोबतच तुम्ही तुमच्या घराच्या आजूबाजूला बनवलेल्या मॉल्सला भेट देण्याची योजनाही बनवू शकता, जे ख्रिसमसच्या वेळी खास पद्धतीने सजवले जातात.
सांताक्लॉजचे महत्त्व
बरेच लोक सांता क्लॉजला येशू ख्रिस्ताचा पिता मानतात. तसेच, बर्याच कथांनुसार, चौथे शतकात तुर्कस्तानमधील एका शहरात बिशप सेंट निकोलस नावाची व्यक्ती असायची, ज्याच्या नंतर सांता क्लॉजची परंपरा सुरू झाली. हे संत गरीब मुलांना भेटवस्तू वाटप करत असतात.