तिशीनंतर महिलांवर इतकं दडपण? संसार, जबाबदाऱ्यांमुळं सेक्स लाईफवर `असा` होतोय परिणाम
Physical Intimacy : तिशीनंतर महिलांच्या शरीरासोबतच अनेक गोष्टींवर परिणाम. पण, या मुद्द्यावर मोकळेपणानं कधी बोललं जाणार? हा डावलण्यापेक्षा संवाद साधण्याचा विषय...
Physical Intimacy : मागील काही वर्षांमध्ये भारतात शारीरिक संबंध, जवळीक, स्त्री आणि पुरुषामध्ये असणारं शारीरिक नातं या सर्व गोष्टी फक्त न्यूनगंडाचा विषय राहिल्या नसून आता त्यावर मोकळेपणानं बोललं जात आहे. बऱ्याचदा हा विषय कलेच्या माध्यमातून चित्रपट, नाटक किंवा तत्सम रुपात आपल्यासमोरही येतो. पण, समाजा अद्यापही असे काही वर्ग आहेत जिथं या मुद्द्यांवर मोकळेपणानं बोलणं टाळलं जातं आणि हे वास्तव नाकारता येत नाही. बरं, त्यातही इंटिमसी, सेक्स, शरीरसंबंध या मुद्द्यांमध्ये महिलांच्या समस्या, त्यांचे प्रश्न इतकंच नव्हे तर त्यांच्या इच्छा आणि अपेक्षा यासंदर्भात बोलणं तर प्रकर्षानं टाळलं जातं.
महिलांच्या शरीरसुखासंदर्भातील इच्छा आणि अपेक्षा याबाबतच हल्लीच India Today कडून एक सर्वेक्षण करण्यात आलं. ज्यामधून समोर आलेल्या आकडेवारीनं अनेकांनाचच विचारात पाडलं. सदर सर्वेक्षणातून समोर आलेल्या आकडेवारीनुसार 57 टक्के व्यक्ती शारीरिक संबंधांमध्ये असंतुष्ट आहेत. इतकंच नव्हे, तर यामध्ये असंतुष्ट असणाऱ्यांचा आकडा गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत चार पटींनी वाढला आहे. 2018 मध्ये हा आकडा 5.5 टक्के इतका होता.
जोडीदाराशी शरीरसंबंधांविषयी संवाद साधता का?
तुम्ही जोडीदाकाशी शारीरिक संबंधांविषयी मोकळेपणानं संवाद साधता का? असा प्रश्न विचारला असता 72 टक्के पुरुषांनी होकारार्थी उत्तर दिलं तर, 27.4 टक्के पुरुषांनी नकारार्थी उत्तर दिलं. महिलांच्या बाबतीत होकारार्थी उत्तर देणाऱ्यांचा आकडा 65.4 टक्के तर, नकारार्थी उत्तर देणाऱ्यांचा आकडा 34 टक्के इतका होता. इतकंच नव्हे, तर 45 टक्के महिलांच्या उत्तरानुसार त्या आपल्या जोडीदारासोबतच्या Physical नात्यामध्ये संतुष्ट नाहीत.
तिशीमध्ये बदलते प्रेमाची व्याख्या
एका अहवालातून समोर आलेल्या वृत्तानुसार 30 वर्षांहून अधिक वय झाल्यानंतर महिला शरीरसुख, इंटिमसीपासून दूर होतात. यामागचं मुख्य कारण त्यांच्यावर असणारं जबाबदाऱ्यांचं ओझं. गावखेड्यांमध्ये राहणाऱ्या महिलांशी संवाद साधून मिळालेल्या उत्तरानुसार तिशीनंतर महिलांवर मुलं आणि कुटुंबाची जबाबदारी. पुढे जबाबदारी इतकी वाढते की महिला स्वत:पासूनच दुरावतात.
हेसुद्धा वाचा : इंग्लंडच्या राजाला आहेरात मिळालेलं भारतातील 'हे' शहर आज आहे सोन्याची खाण; माहितीये का त्याचं नाव?
शहरी महिला नोकरी, संसार, मुलंबाळं यांच्या जबाबदारीमध्येच दिशा भरकटतात. याचा थेट परिणाम महिलांच्या त्यांच्या जोडीदारासोबत असणाऱ्या शरीरसंबंधांवरही होतो. यामध्ये वाद होणं, चिडचीड होणं, शरीरसुखाची इच्छा न होणं किंवा जोडीदाराकडून कोणतीही अपेक्षा नसणं असे बहुविध अनुभव महिलांना येतात. नात्यांमध्ये काही गोष्टींबाबतचा मुक्त संवाद अतिशय महत्त्वाचा असतो आणि हा संवादच लुप्त झाला तर मात्र गोष्टींची घडी विस्कटू लागते हे वास्तव नाकारता येत नाही.