Gram panchayat Election Result 2022 LIVE : ग्रामपंचायत निवडणूक अपडेट निकाल पाहा, कोणी मारली बाजी?

Surendra Gangan Tue, 20 Dec 2022-3:34 pm,

Gram panchayat Election Result 2022 LIVE : राज्यातील 7 हजार 135 ग्रामपंचायतींसाठी थोड्याच वेळात मतमोजणी. दिग्गजांची प्रतिष्ठापणाला. निकालाचे जलद आणि अचूक निकाल झी 24 तासवर

Gram Panchayat Election Result 2022 : राज्यात आज तब्बल 7 हजार 135 ग्रामपंचायतींचा निकाल हाती येणार आहेत. रविवारी या ग्रामपंचायतींसाठी मतदान पार पडलं. (Maharashtra Political News) यात सरासरी 74 टक्के मतदान झालं. 34 जिल्ह्यातल्या एकूण 7 हजार 682 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक जाहीर झाली. काही ठिकाणी बिनविरोध निवड झाल्यानं 7 हजार 135 ग्रामपंचायतीत रविवारी प्रत्यक्ष मतदान झालं. विशेष म्हणजे यावेळी ग्रामपंचायत सदस्यांसह थेट सरपंचपदासाठीही मतदान झालंय. त्यामुळं या ग्रामपंचायतीत कुणाचा झेंडा फ़डकतो, कुणाच्या नावानं गुलाल उधळला जातो हे बघणं महत्त्वाचं ठरेल. मतमोजणीदरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडून नये म्हणून पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आलाय.


 

Latest Updates

  • राष्ट्रवादीच्या गडाला मोठं खिंडार, शिंदें गटाचा विजय 
    Maharashtra Gram Panchayat Election Result 2022 : साताऱ्यातील कोरेगाव तालुक्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदें गटाचा विजय । साता-यातील राष्ट्रवादीच्या गडाला मोठं खिंडार । कोरेगाव तालुक्यात 51 पैकी34 जागांवर मिळाला आमदार महेश शिदेंच्या गटाचा मोठा विजय

  • जळगावमध्ये निवडणूक निकालाला गालबोट

    Maharashtra Gram Panchayat Election Result 2022 : जळगावच्या जामनेर तालुक्यातल्या टाकळीत दोन गटात झालेल्या दगडफेकीत भाजपच्या विजयी उमेदवाराचा मृत्यू झालाय. ग्रामपंचायतच्या निवडणुकीच्या निकालानंतर दोन गट भिडले.यात दोन गटात हाणामारी आणि दगडफेक झाल्याने 25 वर्षीय धनराज माळी या विजयी सदस्याचा मृत्यू झालाय. 

  • माजी मंत्री शंकरराव गडाख यांनी राखला गड 

    Maharashtra Gram Panchayat Election Result 2022 : अहमदनगर जिल्ह्यात माजी मंत्री शंकरराव गडाख यांनी गड राखला..नेवासा तालुक्यातील 13 ग्रामपंचायतवर ठाकरे गटाची सत्ता..नेवासा तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत गडाखांनी राखल्या..सर्व ग्रामपंचायतवर ठाकरे गटाचा वरचष्मा...

  • जवखेडा खुर्द ग्रामपंचायतवर दानवे गटाची सत्ता
    Maharashtra Gram Panchayat Election Result 2022 :  जालना जिल्ह्यातील जवखेडा खुर्द ग्रामपंचायतवर सत्ता अबाधित ठेवल्याने रावसाहेब दानवे यांच्या पत्नी निर्मला दानवे यांनी फुगडी खेळून व्यक्त केला आनंद

  • चिठ्ठी टाकून शिवसेनेचा सरपंच 

    Maharashtra Gram Panchayat Election Result 2022 :  सिंधुदूर्ग जिल्ह्यात कणकवली तालुक्यातील माईन गावात सरपंच पदाला समसमान मते । चिठ्ठी टाकून सरपंच पदाची निवड । शिवसेनेच्या उमेदवारांचे भाग्य फळफळले । माईन ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा सरपंच 

  • चिठ्ठी टाकून सरपंच निवड

    Maharashtra Gram Panchayat Election Result 2022 : सांगली- रसुलवाडी आणि सावळीमध्ये उमेदवारांना समान मते पडल्याने चिठ्ठी टाकून केली निवड. । रसूल वाडीमध्ये  ग्रामपंचायत सदस्यपदी संजय धोंडीराम जाधव विजयी.उत्तम काटकर  पराभूत । दोघांना 54 अशी समान मते पडली होती.लहान मुलांना चिठ्ठी उचलून निवडला विजयी उमेदवार । सावळी ग्रामपंचायत सदस्य पदी कल्पना रावसाहेब शिंदे हे विजयी. । अश्विनी शिंदे पराभूत । त्यांना 189 समान मते पडली होती. लहान मुलांना चिठ्ठी उचलून निवडला विजयी उमेदवार

  • Maharashtra Gram Panchayat Election Result 2022 : पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील एकूण 8 ग्रामपंचायतींचे निकाल - 
    भाजपा -5 
    राष्ट्रवादी काँग्रेस -1 
    अपक्ष -1 
    रिक्त -1 (परंतु भाजपाचा पॅनेल विजयी)

  •  20 ग्रामपंचायती राष्ट्रवादीकडे 

    Maharashtra Gram Panchayat Election Result 2022 :  सातारा जिल्ह्यात फलटणमध्ये 24 ग्रामपंचायतींपैकी 20 ग्रामपंचायती राष्ट्रवादीकडे गेल्या आहेत. साताऱ्यातील फलटणमध्ये राष्ट्रवादीने बालेकिल्ल्यातील गड कायम राखला आहे. 24 ग्रामपंचायतींपैकी 20 ग्रामपंचायती राष्ट्रवादीकडे गेल्या आहेत.  मात्र पंचवीस वर्षाची सत्ता असणाऱ्या राष्ट्रवादीच्या विडणी ग्रामपंचायतीवर भाजपचे वर्चस्व आहे. 

  •  माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर गटाची सरशी

    Maharashtra Gram Panchayat Election Result 2022 :   बीड आणि शिरूर तालुक्यातील 20 ग्रामपंचायत माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर गटाकडे गेल्या आहेत. बीड तालुक्यात इट, साक्षाळ पिंपरी, पारगाव ,शिरस, कुकडगाव, काठोडा, बराणपुर , काळेवाडी, आंबेसावळी, जुजगव्हाण , काळेगाव, हवेली, जरूर, सांडरवण , पिंपळादेवी, ग्रामपंचायत वर माजी मंत्री क्षीरसागर गटाचे वर्चस्व प्रस्थापित झाले आहेत

  •  सिंधुदुर्गात भाजपची सरशी
    Maharashtra Gram Panchayat Election Result 2022 :   सिंधुदुर्गात जिल्ह्यात भाजपची  घौडदौड कायम. आमदार नितेश राणे यांचा करिष्मा ही कायम दिसून आलाय. मात्र सर्वांना उत्सुकता कणकवली तालुक्यातील नांदगाव ग्रामपंचायत निकालाची.याच ग्रामपंचायत निवडणूक प्रचारादरम्यान आमदार नितेश राणेंनी मतदारांना धमकी दिल्याचा व्हिडिओ वायरल झाला होता.नांदगाव हे शिवसेनेचे उपनेते गौरीशंकर खोत यांचे गाव असल्यामुळे खोत आणि आमदार वैभव नाईक यांनी प्रतिष्ठा केली होती.तर भाजपचे आमदार राणे यांच्या मतदारसंघातील नांदगाव हे गाव असल्यामुळे त्यांची ही प्रतिष्ठा पणाला लागली आहे. 

  •  खरोशी ग्रामपंचायतीवर भाजपाचे कमळ 
    Maharashtra Gram Panchayat Election Result 2022 :  रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील खरोशी ग्रामपंचायतीवर भाजपाचे कमळ फुलले । सरपंचासह सहा सदस्य विजयी । दशरथ गावंड सरपंच पदी विराजमान

  • बबनराव लोणीकर यांच्या पुतण्याचा दणदणीत विजय

    Maharashtra Gram Panchayat Election Result 2022 : जालना जिल्ह्यात धक्कादायक निकाल पाहायला मिळाला. बबनराव लोणीकर यांच्या पुतण्याचा लोणी ग्रामपंचायतीत दणदणीत विजय, राष्ट्वादीच्या माजी खासदाराचा नातू पराभूत झाला. राज्याचे माजी मंत्री आणि जालन्यातील परतुरचे आमदार बबनराव लोणीकर यांचं जन्म गाव असलेल्या लोणी गावात बबनराव लोणीकर यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती.अखेर या ग्रामपंचायतीवर लोणीकर यांनी आपली सत्ता अबाधीत ठेवलीय. लोणीकर यांचा पुतण्या गजानन लोणीकर यांनी  राष्ट्रवादीचे परभणीचे माजी खासदार रामराव लोणीकर यांचा नातू संग्राम  यादव यांचा पराभव  केलाय.त्यामुळे प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या लोणी ग्रामपंचायतीवर लोणीकर यांनी आपली सत्ता अबाधित ठेवत भाजपचा पुन्हा एकदा झेंडा रोवलाय.

  • पुणे जिल्ह्यात कोणाला किती जागा?

    Maharashtra Gram Panchayat Election Result 2022 :  पुणे जिल्ह्यात कोणाला किती जागा मिळाल्यात. (यात बिनविरोध सरपंच )
    राष्ट्रवादी काँग्रेस - 68
    भाजप - 19
    काँग्रेस - 15
    शिवसेना (शिंदे गट) - 1
    शिवसेना (ठाकरे गट) - 8
    स्थानिक आघाडी - 41
    एकूण 221 - 152

  • पालकमंत्री दादा भुसे यांना भाजपचा दे धक्का

    Maharashtra Gram Panchayat Election Result 2022 :   नाशिक मालेगावमध्ये पालकमंत्री दादा भुसे यांना स्वतःच्या मतदार संघातच पहिल्या फेरीत मोठा धक्का तीन ग्रामपंचायतीनमध्ये  भाजपचे वर्चस्व । करंजगव्हाण सह तीन गावांवर भाजपचे वर्चस्व। शिंदे गटाला 2 जागा 

  • Maharashtra Gram Panchayat Election Result 2022 :   जळगाव जिल्ह्यात एकूण 122 ग्रामपंचायत निवडणूक

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    सरपंच

    भाजप :- 23

    शिंदे गट :- 6

    राष्ट्रवादी :- 19

    काँग्रेस :- 2

    इतर :- 5

  • Maharashtra Gram Panchayat Election Result 2022 :  अहमदनगर

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    शेवगाव:-12 ग्रामपंचायत
    1)जोहरापुर - राष्ट्रवादी
    2)भयगांव- राष्ट्रवादी
    3)खामगांव- राष्ट्रवादी
    4)दहीगांव ने :- राष्ट्रवादी
    5)रांजणी- राष्ट्रवादी
    6)प्राभुवाडगाव- राष्ट्रवादी
    7)वाघोली- भाजप
    8)अमरापूर- भाजप
    9)सुलतानपुर खुर्द - भाजप
    10)अखेगाव ति- अपक्ष- जनशक्ती
    11)खानापूर- राष्ट्रवादी
    12)कुरुडगाव(रावतळे)- भाजप

    पाथर्डी:- 11 ग्रामपंचायत 
    1)मोहरी- भाजप
    2)वडगाव- अपक्ष
    3)सोनोशी- भाजप
    4)कोळसांगवी- भाजप
    5)निवडुंगे- भाजप
    6)भालगाव-  भाजप
    7)वैजूबाभूळगाव- राष्ट्रवादी
    8)कोरडगाव- वंचित बहुजन
    9)कोल्हार- ठाकरे गड
    10)तिसगाव- भाजप
    11)जिरेवाडी- अपक्ष- जण शक्ती

    जामखेड:-3
    1)शिऊर- भाजप
    2)राजुरी- राष्ट्रवादी
    3)रत्नापुर- राष्ट्रवादी

    कर्जत:-8
    1)कापरेवाडी- भाजप
    2) माळंगी- भाजप
    3)बहिरोबावाडी- भाजप
    4)मुळेवाडी- भाजप 
    5)कोपर्डी- राष्ट्रवादी
    6)कौडाणे- भाजप
    7)निंबे- राष्ट्रवादी
    8)आळसुंदे- भाजप

    श्रीगोंदा:-10
    1)घोगरगाव- राष्ट्रवादी
    2)माठ- भाजप
    3)तरडगव्हाण- भाजप
    4)कष्टी-
    5)बनपिंप्री- राष्ट्रवादी
    6)पारगाव-  राष्ट्रवादी
    7)चवर सांगावी- काँग्रेस
    8)थिटे सांगावी- काँग्रेस
    9)बेलवंडी- राष्ट्रवादी
    10)तांदळी दुमाला- राष्ट्रवादी

    पारनेर:-16
    1)भोंद्रे-
    2)पिंपळगांव तुर्क-
    3)पळशी-
    4)वनकुटे- राष्ट्रवादी
    5)करंदी-
    6)हत्तलखिंडी-
    7)पुणेवाडी-
    8)सिध्देश्‍वरवाडी-
    9)भाळवणी- शिंदे गट
    10)ढवळपूरी -  राष्ट्रवादी
    11)पाडळीतर्फे कान्हूर
    12)गोरेगांव- ठाकरे गट
    13)चोेंभूत- 
    14)गुणोरे--
    15)म्हस्केवाडी-
    16)कोहकडी-

    नगर तालुका:- 27
    1)आठवड- 
    2)खातगाव -- 
    ३)टाकळी - -
    4)पिंपळगाव लांडगा - भाजप
    5)राळेगण(म्हसोबा)
    6)रांजणी  - भाजप
    7),बाबुर्डीबेंद- 
    8)पिंपळगाव कौडा -
    9)दहीगाव - 
    10)कापूरवाडी - 
    11)सारोळा कासार -
    12) शेंडी -
    13)सोनेवाडी पि.ला.
    14)आगडगाव - भाजप
    15 )सोनेवाडी (चास),- 
    16 ) वडगाव तांदळी - भाजप
    17 )मदडगाव -
    18 )पांगरमल-  
    19 )उक्कडगाव-
    20 )वाळकी- 
    21 )जखणगाव -
    22 )कौडगाव / जांब
    23 )नारायणडोहो- भाजप
    24 ) .नादगाव -
    25 )नेप्ती -
    26 )साकत खुर्द -
    27 )सारोळाबद्दी - भाजप

  • विखे आणि थोरात गटाला शह, इंदुरीकर महाराजांच्या सासू सरपंच 

    Maharashtra Gram Panchayat Election Result 2022 :  अहमदनगर जिल्ह्यात संगमनेरमध्ये किर्तनकार इंदुरीकर महाराजांच्या सासू सरपंचपदी । संगमनेर तालुक्यातील निळवंडे ग्रामपंचायत निवडणुकीत मिळवला विजय ।अपक्ष उमेदवारी करत निवडणूक रिंगणात । शशिकला शिवाजी पवार यांचा सरपंच पदावर विजय । विखे आणि थोरात गटाला शह देत इंदोरीकर महाराजांच्या सासुबाई सरपंचपदी

  • महविकास आघाडीचा झेंडा, शिंदे गटाचा धुव्वा

    Maharashtra Gram Panchayat Election Result 2022 :  रायगड जिल्ह्यात गोरेगाव ग्रामपंचायतीवर महविकास आघाडीचा झेंडा । शिंदे गटाचा उडवला धुव्वा गोरेगावही रायगडमधील महत्वाची ग्रामपंचायत । झुबेर अब्बासी पुन्हा सरपंचपदी विराजमान । सदस्य पदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला 13 जागा शिंदे गटाला केवळ 2 जागा

  • आमचं पहिल्यांदाच ठरलं होतं : पंकजा मुंडे

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Maharashtra Gram Panchayat Election Result 2022 :   बीड नाथरा ग्रामपंचायतमध्ये आमचं पहिल्यांदाच ठरलं होतं : भाजप नेत्या पंकजा मुंडे  

    नाथरा ग्रामपंचायत तिचा निकाल हाती आलेला आहे. यामध्ये अभय मुंडे यांचा विजय झालेला आहे तर या अगोदरच आम्ही ठरवूनच अभय मुंडे यांना बिनविरोध देण्याचा ठरवलं होतं. त्यांचा सरपंच आमचा उपसरपंच असेल असं पहिल्यांदाच ठरलं होतं मात्र तिथे निवडणूक लागली आणि पुन्हा अभय मुंडे निवडून आले हे आमचे पहिल्यांदाच ठरल्याचं पंकजा मुंडे म्हणाल्या.

  • मालेगाव ग्रामपंचायत कोणी मारली बाजी?

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Maharashtra Gram Panchayat Election Result 2022 :  मालेगाव ग्रामपंचायत निवडणुकीत कोणी बाजी मारली?

    निंबायती - माळी ताईबाई बापू 
    चौकटपाडे - निर्मला पवार (अपक्ष ) 
    रोंझे -सुमन गायकवाड ( बिनलविरोध )
    शिरसोडी -सोनाली पवार ( भाजप )
    मोहपाडे - सदाशिव बोरकर ( अपक्ष )
    सौदाणे - शितल पवार ( शिंदे गट )
    जाटपाडे  - भागचंद तेजा ( पक्ष )
    वजीरखेड - सुनीता बोरसे ( शिंदे गट )
    माल्हणगाव - बाबाजी सूर्यवंशी ( भाजप )
    करंजगव्हाण - कविता सोनवणे ( भाजप )

  • कडेगाव तालुक्यात काँग्रेसचा तिरंगा

    Maharashtra Gram Panchayat Election Result 2022 :  सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यात 19 पैकी  16 गावात काँग्रेसचे सरपंच विजयी तर 3 गावात भाजप सरपंच विजयी

  • राष्ट्रवादीला मोठा धक्का, शिंदे गट-भाजप विजयी

    Maharashtra GramPanchayat Election Result 2022 :  कोल्हापूर ग्रामपंचायत निवडणुकीत आजरा तालुक्यात खेडे मुंगुसवाडी ग्रामपंचायतीमध्ये  शिंदे गट व भाजपचा उमेदवार विजयी । सरपंच पदी डॉ.संदीप देशपांडे विजयी । राष्ट्रवादी प्रणित स्थानिक आघाडी सुनील पाटील पराभूत

  • शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे आणि भारतीय जनता पक्षाची सत्ता

    Maharashtra GramPanchayat Election Result 2022 : पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील पहिला निकाल हाती । मांडवगण फराटा येथील ग्रामपंचायतवर  शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरेआणि भारतीय जनता पक्षाची सत्ता । राज्यात बिघाडी असली तरी स्थानिक पातळीवरती दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते लढले होते एकत्र

  • कोल्हापुरात या गटाला धक्का आणि सत्तांतर

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Maharashtra GramPanchayat Election Result 2022 :  कोल्हापूर ग्रामपंचायत निवडणूक । हातकणंगले तालुक्यातील रूकडी गावात शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने यांच्या चुलत भावाचा पराभव । माजी उपसरपंच मोहन माने यांचा पराभव । रुकडी गावात सत्ता राखण्यात खासदार धैर्यशील माने यांना यश, पण चुलत भावाचा पराभव

    शिरोली गावात सत्तांतर

    महाडिक गटाने काँग्रेस आमदार सतेज पाटील गटाचा केला दारुण पराभव । शिरोली गावात सतेज पाटील गटाची असणारी  सत्ता उलथवून लावण्यात महाडिक यांना यश । महाडिक गटाच्या पद्मजा करपे याची सरपंच पदी निवड. । 18 पैकी 17 जागा पटकावीत महाडिक गटाने केला सतेज पाटील गटाचा पराभव

  • औरंगाबाद जिल्ह्यात कोणाला किती जागा?

    Maharashtra GramPanchayat Election Result 2022 : औरंगाबाद जिल्ह्यात
    ठाकरे गट 4
    शिंदे गट  12
    भाजप 9
    काँग्रेस 01
    राष्ट्रवादी 3
    इतर  6
    216/ 35
    216 पैकी 35 निकाल आलेत

  • सतेज पाटील गटाला मोठा धक्का

    Maharashtra GramPanchayat Election Result 2022 : कोल्हापूर जिल्ह्यात गांधीनगर भाजपची सत्ता कायम राखण्यात महाडिक गटाला यश । आमदार सतेज पाटील यांचा सत्तातराचा प्रयत्न अयशस्वी । सतेज पाटील गटाला धक्का

  • कासेगाव गावात राष्ट्रवादीची सत्ता

    Maharashtra GramPanchayat Election Result 2022 : सांगली जिल्ह्यात वाळवा तालुक्यात जयंत पाटील यांच्या कासेगाव गावात राष्ट्रवादीची सत्ता. । राष्ट्रवादीच्या 17 जागा निवडुन आल्या  । येवलेवाडी , शेणे, येडेमच्छीद  गावातही राष्ट्रवादीचा सरपंच

  • पुणे जिल्ह्यात तीन ठिकाणी काँग्रेसचे सरपंच 

    Maharashtra GramPanchayat Election Result 2022 : पुणे जिल्ह्यातीलभोर ग्रामपंचायत निवडणुकीचा पहिल्या तीन ग्रामपंचायतींचे निकाल हाती तिन्ही ठिकाणी काँग्रेसचा सरपंच । कर्नावाड, अंगसुळे, ब्राम्हणघर ग्रामपंचायतीवर काँग्रेसचे सरपंच विजयी । ब्राह्मणघर ग्रामपंचायत रंजना धुमाळ सरपंच विजयी अंगसुळे ग्रामपंचायत राणी किरवे सरपंच । कर्नावाड ग्रामपंचायत सोनाली राजीवडे सरपंच

  • सिंधुदुर्गात भाजपने खाते खोलले 

    Maharashtra GramPanchayat Election Result 2022 :  सिंधुदुर्गातला पहिला निकाल हाती । भाजपने देवगडमध्ये खाते खोलले । आमदार नितेश राणेंचा मतदारसंघात करिष्मा कायम । पेंढरी आणि दहीबाव दोन ग्रामपंचायती भाजपकडे.

  • जल्लोष करणाऱ्या नागरिकांवर पोलिसांचा लाठीचार्ज

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Maharashtra GramPanchayat Election Result 2022 :  जालना जिल्ह्यात परतूरमध्ये जल्लोष करणार्यांवर पोलिसांचा लाठीचार्ज । विजय झाल्यानंतर जल्लोष करताना पोलिसांचा लाठीचार्ज  । परतूरमध्ये मतमोजणी केंद्राबाहेर जल्लोष करताना पोलिसांचा लाठीचार्ज  । परतूर मतमोजणी केंद्राबाहेर नागरिकांनी तुफान गर्दी केली । जसा पहिला निकाल हाती आला आणि त्यानंतर गुलाल उधळीत नागरिकांनी जल्लोष केला.  

  • पालोती ग्रामपंचायतवर अपक्षांची बाजी

    Maharashtra GramPanchayat Election Result 2022 :  वर्धा तालुक्याच्या पालोती ग्रामपंचायतवर अपक्षाचा कब्जा । सरपंचपदी आनंद खंडागळे विजयी । सरपंचासह सहा सदस्य अपक्ष विजयी । युवा ग्राम विकास आघाडीचा विजय

  • रत्नागिरी मतदार संघातून ठाकरे गटाला दुसरा धक्का

    Maharashtra GramPanchayat Election Result 2022 :  रत्नागिरी तालुक्यातील गणेशगुळे ग्रामपंचायतीवर शिंदे गटाचा विजय । श्रावणी रांगणकर शिंदे गटाच्या सरपंच विजयी । रत्नागिरी मतदार संघातून ठाकरे गटाला दुसरा धक्का । उद्योग मंत्री उदय सामंत यांचे वर्चस्व कायम

  • सोलापुरातील करमाळ्यात शिंदे गटाची बाजी

    Maharashtra GramPanchayat Election Result 2022 : तालुका करमाळा ग्रामपंचायत सरपंच  निकाल 
    मोरवड - शिंदे गट
    पोंधवडी - शिंदे गट
    विहाळ  - शिंदे गट
    वरकटणे -शिंदे गट 
    पोमलवाडी - राष्ट्रवादी काँग्रेस

  • अकोल्यानंतर पालघर जिल्ह्यात मनसेने खात उघडलं 

    Maharashtra GramPanchayat Election Result 2022 :  पालघर जिल्ह्यात मनसेने खात उघडलं. पालघरमधील गुंदले ग्रामपंचायतीवर मनसेच इंजिन. गुंदले ग्रामपंचायतवर सरपंचपदी मनसेचे जयेश आहडी विजयी.

  • रत्नागिरीत ठाकरे गटाचा दबदबा, शिंदे गटाला पहिला विजय

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Maharashtra GramPanchayat Election Result 2022 :  रत्नागिरी जिल्ह्यातल्या ग्रामपंचायत निवडणुकीत शिंदे गटाने उघडले खाते । रत्नागिरी तालुक्यातील केळ्ये ग्रामपंचायतीवर शिंदे गटाचा विजय । सरपंच सौरवी पाचकुडे शिंदे गटाच्या सरपंच विजयी । उद्योग मंत्री उदय सामंत यांचा मतदार संघ

    एकुण ग्रामपंचायत- 222
    बिनविरोध - 66
    शिवसेना - 37
    शिंदे गट - 09
    भाजप- 05
    राष्ट्रवादी- 02
    काँग्रेस- 00
    इतर-13
    एक ग्रामपंचायतीसाठी कोणीही अर्ज केला नाही 

  • धाराशिव ग्रामपंचायत निकाल

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Maharashtra GramPanchayat Election Result 2022 : धाराशिव ग्रामपंचायत निकाल - 166 जागा

    शिवसेना - 05
    शिंदे गट - 01
    भाजप - 11
    राष्ट्रवादी - 01
    काँग्रेस - 02
    इतर - 09 

    ग्रामपंचायत – क्षेत्र माऊली (कोरेगाव)
    सरपंच-भाजप शिंदे गट
    एकूण सदस्य - 13
    10 जागा भाजप-शिंदे गट 
    3 जागा राष्ट्रवादी

  • औरंगाबाद जिल्ह्यात शिंदे गटाने खाते खोलले

    Maharashtra GramPanchayat Election Result 2022 : औरंगाबाद जिल्ह्यात शिंदे गटाने खाते खोलले । सिल्लोड तालुक्यात दोन ग्रामपंचायत शिंदे गटाच्या ताब्यात । सारोळा आणि कासोड ग्रामपंचायत शिंदे गट विजयी

  •  मोठी बातमी । सत्ताधारी सरपंच यांचा 1 मताने पराभूत

    Maharashtra GramPanchayat Election Result 2022 : कोल्हापूर दक्षिणमधील पहिला निकाल । दिंडणेर्ली गावात स्थानिक आघाडीची सत्ता । आजरा तालुका - वडकशिवाले ग्रामपंचायत निवडणूक । विद्यमान सरपंच संतोष बेलवाडे यांचा एक मताने पराभव । राष्ट्रवादीचे जयवत शिंदे  1 मताने विजयी । शिंदे यांना 168 मते तर भाजप विद्यमान सरपंच संतोष बेलवाडे याना 167 मते । सत्ताधारी सरपंच यांचा 1 मताने पराभव

  • अकोल्यात मनसेने खाते खोलले

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Maharashtra GramPanchayat Election Result 2022 :  अकोला ग्रामपंचायत सरपंच पदाचे निकाल खालील प्रमाणे

    एकुण ग्रामपंचायत 265

    07 अविरोध निवडून आलेले आहे..

    वंचित बहुजन आघाडी : 03
    शिवसेना उद्धव : 03
    शिवसेना शिंदे गट : ..
    भाजप : 01
    राष्ट्रवादी : ..
    काँग्रेस : 01
    मनसे : 01
    इतर : 02

  • उरण तालुक्यातील निकाल हाती

    Maharashtra GramPanchayat Election Result 2022 :  रायगड जिल्ह्यात  उरण तालुक्यातील एकूण ग्रामपंचायत - 17 । उरण येथे तीन ग्रामपंचायतवर भाजप विजयी । डोंगरी , सारडे, रानसई येथे भाजप । नविनशेवा येथे ठाकरे गट सेना सरपंच , सदस्य विजयी । पुनाडे येथे काँग्रेस - सेना सरपंच विजयी

  • नागपूर जिल्ह्यात पहिला निकाल हाती

    Maharashtra GramPanchayat Election Result 2022 :  नागपूर जिल्ह्यात गुमथळा ग्रामपंचायत पहिला निकाल हाती । ग्रामविकास एकता पॅनल विजयी । 8 पैकी 6 जागा (भाजप - काँग्रेस समर्थन होते)

  • औरंगाबाद जिल्ह्यातील पहिला निकाल भाजपला, पुण्यात ठाकरे गट

    Maharashtra GramPanchayat Election Result 2022 :  औरंगाबाद जिल्ह्यात बनगाव ग्रामपंचायत फुलंब्रीमध्ये भाजप विजयी,  उशाबाई मुरमे सरपंचपदी विजयी,  तर पुणे जिल्ह्यात हवेली तालुक्यात पहिला निकाल ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या बाजुने. आव्हाळवाडीतील वार्ड क्रमांक 1 मधून सेनेचे प्रशांत रघुनाथ सातव, सोनाली दाभाडे विजयी

  • राधानगरी तालुक्यातदेखील शिंदे गटाने खाते खोललं 

    Maharashtra GramPanchayat Election Result 2022 : कोल्हापूर ग्रामपंचायत निवडणूक निकाल. राधानगरी तालुक्यातदेखील शिंदे गटाने खाते खोललं । हसणे गावामध्ये शिंदे गटाची सत्ता । आजरा तालुक्यातील सरबळवाडी राष्ट्रवादीचा झेंडा । सरपंच उमेदवार सुनीता कांबळे विजयी । तर पन्हाळा तालुक्यात तांदुळवाडी ग्रामपंचायत सरपंच  पदाच्या निवडणूकित ठाकरे गटाच्या सुनीता सरदार पाटील सरपंचपदी विजयी । वेतवडे ग्रामपंचायतीवर स्थानिक आघाडीची सत्ता. सरपंच पदी रेखा पोवार विजयी । आजरा तालुक्यातील पहिला निकाल भाजपच्या बाजूने. चितळे ग्रामपंचायतवर भाजपचा झेंडा. सरपंच उमेदवार रत्नप्रभा भुतुले विजयी

  • पालकमंत्री शंभुराज देसाईंना मोठा धक्का, सरपंच राष्ट्रवादीचा

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Maharashtra GramPanchayat Election Result 2022 : सातारा जिल्ह्यात कराड तालुक्यात पालकमंत्री शंभुराज देसाईंना धक्का, सत्ता आली पण सरपंच राष्ट्रवादीचा झाल्याने राष्ट्रवादीत मोठा जल्लोष करण्यात येत आहे.

    कराड तालुक्यातील पश्चिम सुपने ग्रामपंचायत निकाल पहिला हाती. पालकमंत्री शंभूराज देसाई आणि उदयसिंह पाटील उंडाळकर यांच्या गटांना 4 जागांवर विजय. विरोधी राष्ट्रवादीला 2 जागा. सरपंच पदावर राष्ट्रवादी गटानं 2 मतानं मिळवला विजय.

  • रत्नागिरी जिल्ह्यात पहिला ठाकरे गटाचा सरपंच विजयी

    Maharashtra GramPanchayat Election Result 2022 : रत्नागिरी जिल्ह्यातील पहिला निकाल जाहीर । गुहागर  आबलोली पहिला निकाल जाहीर । ठाकरे गटाने खाते खोलले । आबलोली इथं ठाकरे गटाचा सरपंच विजयी । वैष्णवी नेटके विजयी, आमदार भास्कर जाधव यांचा मतदार संघ

  •  शिवसेना शिंदे गटाचा झेंडा

    Maharashtra GramPanchayat Election Result 2022 : रायगड जिल्ह्यात पाहिले 8 निकाल जाहीर । महाड तालुक्यात शिवसेना शिंदे गटाची आघाडी. 8 पैकी 6 ग्राम पंचायतीवर शिवसेना शिंदे गटाचा झेंडा. 2 ग्राम पंचायती महाविकास आघाडीकडे

  • पृथ्वीराज चव्हाण यांच्या गटाला धक्का

    Maharashtra GramPanchayat Election Result 2022 : सातारा जिल्ह्यात कराड अंतवडी ग्रामपंचायतीत सत्तांतर. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या गटाला धक्का. माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांचा पॅनेलचा दणदणीत विजय

  • आजरात पहिला निकाल भाजपच्या बाजूने

    Maharashtra GramPanchayat Election Result 2022 :  कोल्हापूर ग्रामपंचायत निवडणूक निकाल. आजरा तालुक्यातील पहिला निकाल भाजपच्या बाजूने. चितळे ग्रामपंचायतवर भाजपचा झेंडा. सरपंच उमेदवार रत्नप्रभा भुतुले विजयी

  • राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला यश

    Maharashtra GramPanchayat Election Result 2022 :   कोल्हापूरमध्ये राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने खोलले खाते. हेरवाड  ग्रामपंचायतीवर स्वाभिमानी आणि काँग्रेस आघाडीची सत्ता.  रेखा अर्जुन जाधव सरपंचपदी विजयी

  • कोल्हापुरात भाजप - शिंदे गटाची बाजी, मुश्रीफ यांना दे धक्का

    Maharashtra GramPanchayat Election Result 2022 :  कोल्हापूर जिल्ह्यात आत्तापर्यंत जाहीर झालेला निकाल. येथे राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांना मोठा धक्का बसला आहे.
    भाजप – 5
    ठाकरे गट – 2
    शिंदे गट – 4
    राष्ट्रवादी - 1
    काँग्रेस - 1 
    एकूण – 430/ 13

  • कोल्हापुरात भाजप - शिंदे गटाची बाजी, मुश्रीफ यांना दे धक्का

    Maharashtra GramPanchayat Election Result 2022 :  कोल्हापूर जिल्ह्यात आत्तापर्यंत जाहीर झालेला निकाल. येथे राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांना मोठा धक्का बसला आहे.
    भाजप – 5
    ठाकरे गट – 2
    शिंदे गट – 4
    राष्ट्रवादी - 1
    काँग्रेस - 1 
    एकूण – 430/ 13

  • पन्हाळा तालुक्यात स्थानिक आघाडी 

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Maharashtra GramPanchayat Election Result 2022 :  कोल्हापूर पन्हाळा तालुक्यात स्थानिक आघाडी. गोटे गावात दीपाली विजय पाटील सरपंचपदी विजयी तर मोरेवाडी गावात रणजीत तांदळे  सरपंचपदी विजयी 

    तर दुसरीकडे शिरोळ तालुक्यातील चौथी ग्रामपंचायत शिंदे गटाच्या ताब्यात. संभाजीपूरमधूनही सरपंच पदाचे शिंदे गटाचे सचिन कुडे उमेदवार विजयी

  • शिरोळ तालुक्यात शिंदे गटाची घोडदौड 

    Maharashtra GramPanchayat Election Result 2022 :  कोल्हापुरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानंतर आता  शिरोळ तालुक्यात शिंदे गटाची घोडदौड ( आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर ) अकिवाटमधून सरपंचपदाच्या सौ. वंदना सुहास पाटील उमेदवार विजयी. खिद्रापूरमधून सरपंच पदाचे उमेदवार सौ. सारिका कुलदीप कदम विजयी. तर टाकवडेमधून सरपंच पदाचे उमेदवार सौ. सविता मनोज चौगुले विजयी. 

  • कोल्हापुरात ठाकरे गटाने खातं खोललं

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Maharashtra GramPanchayat Election Result 2022 :  कोल्हापुरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने खातं खोललं. व्हनाळी येथे संजय बाबा घाटगे गटाचे दिलीप कडवे सरपंचपदी विजयी

  • कागल आणि करवीरमध्ये भाजपची सत्ता

    Maharashtra GramPanchayat Election Result 2022 :  कोल्हापूर करवीर तालुक्यातील कावणे गावात भाजपची बाजी. कागल तालुक्यातील कसबा सांगावमध्ये  हसन मुश्रीफ गटाला पुन्हा धक्का. सरपंचपदी राजे- मंडलिक गटाची बाजी

  • पुणे जिल्हा ग्रामपंचायत निवडणूक निकाल
    Maharashtra GramPanchayat Election Result 2022 : 
    1) वेल्हे : 28 पैकी 3 बिनविरोध - 25 ठिकाणी मतमोजणी
    2) भोर : 54 पैकी 24 बिनविरोध - 30 ठिकाणी मतमोजणी
    3) जुन्नर : 17 पैकी 4 बिनविरोध - 13 ठिकाणी मतमोजणी
    4) आंबेगाव : 21 पैकी 5 बिनविरोध - 16 ठिकाणी मतमोजणी
    5) खेड : 23 पैकी 2 बिनविरोध - 21 ठिकाणी मतमोजणी
    6) मावळ : 9 पैकी 1 बिनविरोध - 8 ठिकाणी मतमोजणी
    7) शिरूर : 4 पैकी 0 बिनविरोध - 4 ठिकाणी मतमोजणी
    8) मुळशी : 11 पैकी 6 ठिकाणी बिनविरोध - 5 ठिकाणी मतमोजणी 
    9) हवेली : 7 पैकी 0 बिनविरोध - 7 ठिकाणी मतमोजणी
    10) दौंड : 8 पैकी 0 बिनविरोध - 8 ठिकाणी मतमोजणी
    11) बारामती : 13 पैकी 0 बिनविरोध - 13 ठिकाणी मतमोजणी
    12) इंदापूर : 26 पैकी 0 बिनविरोध - 26 ठिकाणी मतमोजणी

  • कोल्हापूर ग्रामपंचायत निवडणूक निकाल
    Maharashtra GramPanchayat Election Result 2022 : कोल्हापुरातील बामणी, निढोरी आणि रणदिवेवाडी या कागल तालुक्यातील तिन्ही गावात भाजपचा झेंडा तर कागल तालुक्यात भाजपची घोडदौड सुरु.

  • सांगली जिल्ह्यात 31 ग्रामपंचायती बिनविरोध 

    Maharashtra GramPanchayat Election Result 2022 : सांगली जिल्ह्यात 447 ग्रामपंचायत निवडणुकीत 31 ग्रामपंचायत हे बिनविरोध झाले आहेत.
    शिवसेना एकनाथ शिंदे गट -  9   (जत 3,खानापूर आटपाडी 5, वाळवा 1, भाजप -  7, राष्ट्रवादी - वाळवा तालुक्यासह जिल्ह्यात 10, शिवसेना ठाकरे गट -  एकही नाही, काँग्रेस पक्ष - 2,

  •  कोल्हापुरातून पहिला निकाल हाती

    Maharashtra GramPanchayat Election Result 2022 : कोल्हापुरातून पहिला निकाल हाती. कागल तालुक्यातील बामणीत पहिला गुलाल उधळला गेला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत सत्तांतर पाहायला मिळाले आहे. आमदार हसन मुश्रीफ गटाला मोठा धक्का बसला आहे. सरपंचासह राजे गटाची बाजी

  • Maharashtra GramPanchayat Election Result 2022 : कोल्हापूर एकूण 43 बिनविरोध ग्रामपंचायत 

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    स्थानिक विकास आघाडी  : 14
    जनसुराज्य शक्ती: 10
    काँग्रेस: 3
    राष्ट्रवादी काँग्रेस: 7
    शिवसेना ठाकरे गट: 3
    शिवसेना शिंदे गट: 6

  • Maharashtra GramPanchayat Election Result 2022 : पालघर जिल्ह्यात एकूण 63 ग्रामपंचायतीचा निकाल आज  

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    यामध्ये  पालघर तालुका -32 ग्रामपंचायती
    वसई तालुका -15 ग्रामपंचायती
    वाडा तालुका -15 ग्रामपंचायती
    तलासरी तालुका -1 ग्रामपंचायत आहेत.

    या  निवडणुकीत खरी लढत शिवसेना ठाकरे गट, शिवसेना शिंदे गट, भाजप आणि बहुजन विकास आघाडी या चार प्रमुख पक्षामध्ये आहे.

  •  थेट सरपंचपदासाठीही मतदान

    Maharashtra GramPanchayat Election Result 2022 : राज्यात उद्या तब्बल 7 हजार 135 ग्रामपंचायतींचा निकाल हाती येणार आहे. (Maharashtra Political News) रविवारी या ग्रामपंचायतींसाठी मतदान पार पडलं. यात सरासरी 74 टक्के मतदान झालं. यंदा मुंबई आणि उपनगर वगळता इतर 34  जिल्ह्यातल्या एकूण 7 हजार 682 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक जाहीर झाली. पण काही ठिकाणी बिनविरोध निवड झाल्यानं 7 हजार 135 ग्रामपंचायतीत रविवारी प्रत्यक्ष मतदान झालं.एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिंदे गटाचा पाठिंबा वाढला आहे. त्यामुळे शिंदे गटाला जास्त जागा मिळतात की ठाकरे गटाचा झेंडा सर्वाधिक ग्रामपंचायतींवर  लागतो हेसुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. थेट सरपंचाची निवड ही सुद्धा जनतेतून होणार आहे. अनेक दिगज्यांची प्रतिष्ठापना लागणार आहे. विशेष म्हणजे यावेळी ग्रामपंचायत सदस्यांसह थेट सरपंचपदासाठीही मतदान झालंय. 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link