IND vs NZ 2nd T20 Live: टीम इंडियाचा न्य़ुझीलंडवर दणदणीत विजय

Sun, 20 Nov 2022-4:04 pm,

India vs New Zealand 2nd T20 Live Cricket Score : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसरा सामना आज खेळल्या जात आहे.

IND vs NZ Live Update : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसरा सामना आज खेळल्या जात आहे. पहिला सामना पावसाने खराब केला होता. त्या सामन्यात नाणेफेकही होऊ शकली नाही. मात्र आता  न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संभाव्य प्लेइंग इलेव्हन
भारतीय संघ : इशान किशन, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, हार्दिक पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, भुवनेश्वर कुमार आणि उमरान मलिक.


न्यूझीलंड संघ : फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे, केन विल्यमसन, ग्लेन फिलिप्स, डॅरिल मिशेल, जिमी नीशम, मिचेल सँटनर, इश सोधी, टिम साउदी, लॉकी फर्ग्युसन आणि अॅडम मिल्ने.

Latest Updates

  • IND vs NZ Live update : टीम इंडियाने न्य़ुझीलंडवर दणदणीत विजय मिळवला आहे. 65 धावांनी टीम इंडियाने हा सामना जिंकला आहे. या विजयानंतर टीम इंडियाने मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. 

  • IND vs NZ Live update : न्यूझीलंडला 48 चेंडूत 107 धावांची गरज आहे. तर टीम इंडियाला पाय रोवून उभा असलेल्या विलियम्सनला बाद करणे गरजेचे आहे.

  • न्यूझीलंडला तिसरा धक्का बसला असून ग्लेन फिलिप्स 12 धावा करून बाद झाला. त्याला युजवेंद्र चहलने त्रिफळाचीत केले. न्यूझीलंड 75-3

     

  • IND vs NZ Live update : न्यूझीलंडचा डावखुरा घातक गोलंदाज डेव्हॉन कॉनवे 25 धावा करून बाद झाला. फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदरने त्याला अर्शदीपकरवी झेलबाद केले. न्यूझीलंड 63-2

  • IND vs NZ Live update : भारतीय संघाने आतापर्यंतच्या या सामन्यात कसून गोलंदाजी केली आहे. पॉवर प्लेच्या चार षटकात चौकार-षटकार मारता आले नाहीत. न्यूझीलंड 30-1

  • IND vs NZ Live update :  न्यूझीलंड संघाला शून्यावर पहिला धक्का बसला. सलामीवीर फिन ऍलन भोपळाही न फोडता माघारी परतला.

  • IND vs NZ Live update :  सूर्याचं अवघ्या 49 चेंडूंत वादळी शतक, न्यूझीलंडला 192 धावांचं आव्हान

  • IND vs NZ Live update : टीम इंडियाचा न्यूझीलंड दौऱ्यावरील कर्णधार हार्दिक पांड्या 13 धावा करून बाद झाला.

  • IND vs NZ Live update : 18 ओव्हर्सचा खेळ पूर्ण झाला आहे. भारताच्या 3 बाद 164 धावा झाल्या आहेत. सूर्यकुमार यादव 45 चेंडूत 89 धावांवर खेळतोय.

     

  • IND vs NZ Live update : सूर्यकुमार यादवच्या खेळात सातत्य कायम आहे. 2022 या वर्षात आतापर्यंतच्या खेळीत सूर्यकुमार यादवने त्याने 100 चौकार मारले. सूर्यकुमार यादवच शतक

  • IND vs NZ Live update : भारताचा फलंदाज सूर्यकुमार यादवने शानदार अर्धशतक ठोकले. त्याने ३२ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. अजूनही तो खेळपट्टीवर टिकून आहे. भारत 147-3

  • IND vs NZ Live update : श्रेयस अय्यर 13 धावा करून हिट-विकेट बाद झाला. ऑनसाइडला फटका मारताना त्याचा उजवा पाय यष्टीला लागला. भारत 108-3

  • IND vs NZ Live update : भारताच्या दोन बाद 97 धावा झाल्या आहेत. सूर्यकुमार आणि श्रेयस अय्यरने सोढीच्या ओव्हरमध्ये 15 धावा, भारत 97-2

  • IND vs NZ Live update : भारताचे पहिले दहा षटके पूर्ण झाले असून टीम इंडियाच्या पहिल्या १० षटकात सलामीवीरांनी चांगली सुरुवात करून दिली. आता सध्या श्रेयस अय्यर- सूर्यकुमार यादव खेळत आहेत. भारत 72-2

  • IND vs NZ Live update : भारताला दुसरा धक्का, ईशान किशन बाद 

  • IND vs NZ Live update : माउंट मांउगानुईमध्ये पावसाने विश्रांती घेतली असून सामना पुन्हा सुरु झाला आहे. 51-1

  • IND vs NZ Live update : भारत-न्यूझीलंड सामन्यात पावसाचा पुन्हा सुरूवात, सामना थांबविण्यात आला आहे. भारत 50-1  

  • IND vs NZ Live update : ईशान किशन आणि ऋषभ पंत चांगली सुरुवात करून दिली होती. मात्र मोठा फटका मारण्याच्या नादात पंत बाद झाला. पण पॉवर प्ले मध्ये किशनने शानदार फटकेबाजी केली. भारत 50-1

  • IND vs NZ Live update : टी 20 सामन्यात सलामीवीर ईशान किशन आणि ऋषभ पंत यांनी चांगली सुरुवात केली होती मात्र सहाव्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर त्याने आपली विकेट गमावली. पंतने 13 चेंडूत 6 धावा केल्या. त्याला लॉकी फर्ग्युसनने झेलबाद केले. भारत 36-1

  • IND vs NZ Live update : भारताला पहिला धक्का, ऋषभ पंत बाद

  • IND vs NZ Live update : ईशान किशन आऊटसाइड लेगला धाव काढण्याच्या नादात थोडक्यात बचावला.

  • IND vs NZ Live update : 2 ओव्हर्सचा खेळ पूर्ण झाला आहे. इशान किशन आणि ऋषभ पंत ही सलामीची जोडी मैदानात आहे.भारताच्या दुसऱ्या षटकाअखेरीस बिनबाद 14 धावा झाल्या आहेत 

  • IND vs NZ Live update : या सामन्यात इशान किशन आणि ऋषभ पंत यांनी भारताच्या डावाची सुरुवात केली आहे. न्यूझीलंडसाठी टीम साऊदीने पहिले षटक टाकले. इशान किशन (18 धावा) आणि ऋषभ पंत (14 धावा) खेळत आहेत. 

  • IND vs NZ Live update : न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. अशा परिस्थितीत भारतीय क्रिकेट संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरेल.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link