Live निकाल अपडेट : जिल्हा परिषदेचा रणसंग्राम
जिल्हा परिषदेचा रणसंग्राम
Live निकाल अपडेट : जिल्हा परिषदेचा रणसंग्राम
Latest Updates
स्वबळावर लढण्याच्या घोषणेपासून आता माघार नाही, शिवसेना खासदार अरविंद सावंतांची भूमिका
रत्नागिरी : जिल्हा परिषद निवडणुकीत एकूण 55 पैंकी शिवसेना 39, राष्ट्रवादी 15, काँग्रेस 1, भाजप 0 जागांवर विजय
कोल्हापूर : जिल्हा परिषदेत कुणालाही बहुमत नाही...
काँग्रेस - 11, राष्ट्रवादी - 10, शिवसेना - 10, भाजप - 12, जनसुराज्य - 06, स्वाभिमानी - 02, ताराराणी आघाडी - 02, युवक क्रांती आघाडी - 2, शाहू विकास आघाडी -2, विकास आघाडी - 1, अपक्ष - 1मालेगाव तालुक्यातील पराभवाची नैतिक जबाबदारी स्विकारून ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठविला मंत्रीपदाचा राजीनामा
लातूर : जिल्हा परिषद निवडणुकीत झालेला पराभव मान्य... चुकांचा शोध घेऊन नव्या उमेदीने जिल्ह्यात काम करू - अमित देशमुख
रत्नागिरी : जिल्हा परिषदेत सेनेचं वर्चस्व.... एकूण जागा 55 पैंकी 39 जागा शिवसेनेकडे तर 16 राष्ट्रवादीकडे...
परभणी : गंगाखेड तालुक्यातील कोद्री गटातून अपक्ष भगवान सानप विजयी... उद्योगपती रत्नाकर गुट्टे यांच्या जावयांचा दारूण पराभव... 32 कोटींच्या संपत्तीमुळे गुट्टे यांचे जावई आले होते चर्चेत
बीड : पंकजा मुंडे मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा सोपवणार... बीड, परळीतल्या पराभवाची जबाबदारी स्वीकारणार...
औरंगबाद जिल्हा परिषद : एकूण 62 गट : काँग्रेस 16, सेना 18, भाजपा 23, राष्ट्रवादी 3, मनसे 1, आरपीआय 1
औरंगाबाद जिल्हा परिषद त्रिशंकू; सत्तेसाठी भाजपाला शिवसेनेची किंवा काँग्रेसची मदत घ्यावी लागणार
नांदेड : येवती गटातून काँग्रेसच्या शंकुतला विनायक कोलमवाड या 5618 मतानी विजयी
पुणे : पुरंदरमध्ये शिवसेनेचा दणदणीत विजय... जिल्हा परिषदेच्या 4 पैंकी 3 जागांवर शिवसेना तर एका जागेवर काँग्रेस... पंचायत समितीच्या 8 पैंकी 6 जागांवर शिवसेना विजयी... २ जागांवर काँग्रस विजयी
सातारा : राष्ट्रवादीचे आमदार प्रभाकर घार्गे यांच्या पत्नी इंदिरा घार्गे पराभूत... काँग्रेस नेते धैर्यशील कदमांच्या पत्नी सुनीता कदम यांनी केला पराभव... इंदिरा या खटावचे माजी आमदार कै. केशवराव पाटलांच्या कन्या
सांगली : बागणीमधून अपक्ष संभाजी कचरे 120 मतांनी विजयी... रयत विकास आघाडीचे सागर सदाभाऊ खोत पराभूत
पुणे : जिल्हा परीषद निवडणुकीत महानंदा डेअरीच्या माजी अध्यक्ष वैशाली नागवडे यांचा पराभव... राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का
लातूर : काँग्रेसच्या गडाला भाजपचा सुरुंग, जिल्हा परिषदेत भाजपला स्पष्ट बहुमत... 30 जागा जिंकून भाजपची आघाडी
इंदापूर : बावडा - लाखेवाडी जिल्हा परिषद गटातून रत्नप्रभादेवी शहाजीराव पाटील विजयी... रत्नप्रभादेवी पाटील या माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या मातोश्री
रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या एकूण 55 पैंकी 39 जागांवर शिवसेना आणि 15 जागांवर राष्ट्रवादी विजयी
नांदेड : कलंबर गटातून काँग्रेसच्या मालनबाई भुजबळ विजयी
हिंगोली : वसमत तालुक्यात शिवसेनेला धक्का... जिल्हा परिषद गटाच्या 12 पैंकी 6 जागा भाजपकडे तर 6 राष्ट्रवादीकडे ... पंचायत समिती भाजपच्या एकहाती ताब्यात... सेनेचे आमदार जयप्रकाश मुंदडा यांना दणका
लातूर : काँग्रेसच्या गडाला भाजपचा सुरुंग, जिल्हा परिषदेत भाजपला स्पष्ट बहुमत... 30 जागा जिंकून भाजपची आघाडी
औरंगबाद : शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव यांची पत्नी, रावसाहेब दानवे यांची मुलगी संजना जाधव पराभूत... शिवसेना उमेदवार शुभांगी काजे यांनी केला पराभव... शिवसेनेत बंडखोरी करत हर्षवर्धन यांनी संजना यांना निवडणूकमध्ये उतरवलं होतं
पुणे जिल्हा परिषदेसाठी एकूण 5 जागा, भाजप 2, राष्ट्रवादी 2, अपक्ष 1... पंचायत समितीच्या एका आणि जिल्हा परिषदेच्या एका जागेवर फेरमतमोजणी ची भाजपची मागणी
मावळ : तालुका पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेचे सर्व निकाल जाहीर... भाजपचं निर्विवाद वर्चस्व : एकूण जागा 10, भाजपा 6, राष्ट्रवादी 4
माण : काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या आमदार जयकुमार गोरे यांना धक्का... राष्ट्रवादीने माण पंचायत समितीवर फडवला झेंडा... 10 पैंकी 6 जागांवर राष्ट्रवादी, काँग्रेस २ जागा, भाजपा 2 जागा
सांगली : तासगाव आणि कवठेमहांकाळ ताल्युक्यात भाजपा आणि खासदार संजय काका पाटील यांना मोठा धक्का... तासगावमध्ये राष्ट्रवादी 4 तर भाजपा 2 जागांवर विजयी... तर कवठेमहाकाळमध्ये 2 राष्ट्रवादी तर 2 अजितराव घोरपडे यांच्या विकास आघाडीचे उमेदवार विजयी
सातारा : एकुण जागा - 64 : राष्ट्रवादी 28, काँग्रेस 8, भाजपा 3, शिवसेना 2, इतर 3
सातारा : राष्ट्वादीची बालेकिल्ल्यात दमदार कामगिरी... काँग्रेस, शिवसेना, भाजपाला शह देत एकतर्फी विजयाकडे वाटचाल
सातारा : उदयनराजे गटाच्या सातारा विकास आघाडीला पहिली जागा... शाहुपुरी गटातून अनिता कारंडे विजयी
रायगड : रोहा वरसे गटात आदिती तटकरे मोठ्या फरकाने विजयी... आदिती सुनील तटकरे यांच्या कन्या
नांदेड : एकूण जागा 63... काँग्रेस 18, राष्ट्रवादी 9, सेना 7, भाजपा 7, रासप 1, एकूण 43, इतर 1
सांगली : एकूण जागा 60... राष्ट्रवादी 8, काँग्रेस 4, भाजपा 10, शिवसेना 3, रयत विकास आघाडी - 0, विकास आघाडी (अजितराव घोरपडे गट) 2, इतर 2
जळगाव : एकूण जागा 67 जागांपैंकी 60 जागांचा निकाल... भाजप 29, सेना 14, राष्ट्रवादी 13, काँग्रेस 4 जागांवर विजयी
रत्नागिरी- भाजप जिल्हाध्यक्ष बाळ माने यांच्या पत्नी माधवी माने यांचा अवघ्या 70 मतांनी पराभव... शिवसेनेचे भाई सावंत यांच्या पत्नी स्नेहा सावंत विजयी
रत्नागिरी : जिल्हा परिषद शिवसेनेच्या ताब्यात... एकहाती सत्ता
रागयड : रोहा वरसे गटात आदिती तटकरे पहिल्या फेरीत 2306 मतांनी आघाडीवर... आदिती सुनील तटकरे यांच्या कन्या
खेड : फुरुस जिल्हा परिषद गटात रामदास कदम यांचे बंधू आन्ना कदम (शिवसेना) विजयी... सुनील तटकरे यांचे मेव्हणे अजय बिरवटकर पराभूत
जालना : खोराड सावंगी ता. मंठा गटातून भाजपा - शिवसेना दोघांना सारखेच मतदान... चिठ्ठी काढल्यानंतर रेणुका शिवदास हनवते (भाजपा) विजयी
नांदेड : मरखेल गटातून (भाजप) व्यंकट गोजेगावकर, धर्माबाद तालुक्यातील येताळा गटातून सेनेच्या पद्मा रेड्डी, कुंटुर गटातून राष्ट्रवादीच्या मधुमती कुंटुरकर विजयी
मालवण पंचायत समितीवर काँग्रेसचे वर्चस्व... 12 पैंकी 7 जागा काँग्रेसकडे... तर एका जागेवर शिवसेना
सांगली : माजीमंत्री पतंगराव कदम यांचे जावई महेंद्र लाड (काँग्रेस) पराभूत... कुंडलमधून राष्ट्रवादीचे शरद लाड विजयी, शरद लाड हे माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे यांचे जावई
जालना : रोहिलागड गटातून काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष भीमराव डोंगरे पराभूत, भाजपचे तालुकाध्यक्ष अवधूत खड़के विजयी
सातारा : राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांचे बंधु ऋषीकांत शिंदे यांचा पराभव... कुडाळ जिप गटातून भाजपाचे दीपक पवार यांनी केला पराभव
जालना : परतुरमधील आष्टी गटातून भाजपचे राहुल लोनिकर विजयी.. राष्ट्रवादीच्या बळीराम कडपेंना केलं चारी मुंडया चित, राहुल लोनीकर मंत्री बबनराव लोनिकर यांचे सुपुत्र... राहुल लोनिकर 5 हजारांपेक्षा अधिक मताधिक्याने विजयी
शिरूर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजेंद्र जगदाळे यांनी भाजपचे राहूल पाचर्णे यांचा 2340 मतांनी केला पराभव... शिरूर तालुक्यात भाजपला जोरदार धक्का... आमदार बाबूराव पाचर्णे यांच्या मुलाचा झाला पराभव...
शिरूर : टाकळी हाजी पंचायत गणातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अरूणाताई दामू घोडे 4 हजार 542 मतांनी विजयी
औरंगाबाद : कन्नड, हतनूर जिल्हा परिषद गटात मंत्री बबनराव लोणीकर यांचे जावई किशोर पवार 300 मतांनी पिछाडीवर
सांगली : शिराळा तालुक्यात 4 पैंकी 2 राष्ट्रवादी तर 2 जागेवर काँग्रेस विजयी... भाजपा सुपडासाफ... भाजपा आमदार शिवाजीराव नाईक यांना धक्का
सांगली : कोकरुड मधून काँग्रेसचे सत्यजित देशमुख विजयी
जिल्हा परिषद गट : सेना - 24 जागांवर विजयी, संगमेश्वर 7 पैंकी 7, रत्नागिरी 10 पैंकी 10, लांजा 4 पैंकी 4, दापोली 1, चिपळूण 2, राष्ट्रवादी 2
शिरूर : तळेगाव ढमढेरे पंचायत समिती गणातून लोकशाही क्रांती आघाडीचे विजय रणसिंग विजयी 736 मतांनी विजय
नांदेड : मांडवी (भाजप) संध्या प्रभू राठौड 200 मतांनी विजयी
औरंगाबाद : मनसेनं उघडलं खातं, बिडकीनमधून मनसे विजय चव्हाण विजयी
जालना : मौजपूरी गटातून माजी आमदार अरविंद चव्हाण यांच्या पत्नी भाजपच्या उमेदवार 450 मतांनी पुष्पा चव्हाण विजयी
औरंगाबाद : कन्नडमधून रावसाहेब दानवे यांची मुलगी आणि आमदार हर्षवर्धन जाधव यांची पत्नी संजना जाधव 130 मतांनी पिछड़ीवार
बीड : परळी मतदार संघातील अंबेजोगाई पंचायत समितीवर धनंजय मुंडे यांचा झेंडा12 पैंकी 7 जागा राष्ट्रवादीनं जिंकल्या
बारामती : शरद पवारांचे नातू रोहित पवार पाच हजार मतांनी आघाडीवर
कोल्हापूर : शित्तूर जिल्हा परिषद मतदारसंघात माजी खासदार उदयसिंहराव गायकवाड यांचा नातू रणवीर गायकवाड यांचा पराभव... जनसुराज्य पक्ष्याचे उमेदवार सर्जेराव बंडू पाटील – पेरीडकर यांनी केला पराभव
सांगली : कुंडलमधून राष्ट्रवादीचे शरद लाड आघाडीवर... काँग्रेसचे महेंद्र लाड पिछाडीवर... महेंद्र लाड हे माजीमंत्री पतंगराव कदम यांचे जावई
सातारा : जावळी पंचायत समितीवर राष्ट्रवादी विजय - आमदार शिवेंद्रसिह राजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली सर्व ६ जागेवर विजय - खासदार उदयनराजे भोसले व भाजपाचा पराभव
सिंधुदुर्ग : काँग्रेस 16, शिवसेना 5, भाजप 1, राष्ट्वादी 1 जागांवर आघाडीवर
रत्नागिरी : शिवसेना 24, राष्ट्रवादी 14, भाजप 1 जागांवर आघाडीवर
रायगड : शिवसेना 3, राष्ट्रवादी 3, शेकाप 9, भाजप 2 जागांवर आघाडीवर
कोकणात शिवसेना सर्वात मोठा पक्ष... राष्ट्रवादी आणि काँग्रेसला प्रत्येकी 17 जागा
परभणी : रेणापूर जि.प गटातून विद्यमान शिक्षण सभापती, राष्ट्रवादीचे उमेदवार दादासाहेब टेंगसे विजयी
बीड : परळीमध्ये पंकजा मुंडेंना मोठा धक्का... धनंजय मुंडेंचे 7 उमेदवार आघाडीवर
सातारा : शिरवळ गटात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नितीन भरगुडे-पाटील यांचा 4500 मतांनी पराभव
परभणी : राष्ट्रवादीचे विद्यमान जिल्हा परिषद अध्यक्ष राजेश विटेकर यांच्या मातोश्री शेळगाव जिल्हा परिषद गटातून 3000 मत्ताधिक्यानं विजयी
जालना : परतुरमधील सातोना गटातुन काँग्रेसचे इंद्रजीत घनवट विजयी
सिंधुदुर्ग : जिल्हा परिषदेत काँग्रेस 16, शिवसेना 5, भाजप 1, राष्ट्रवादी 1 आघाडीवर
सिंधुदुर्ग : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणेंचा दबदबा कायम... शिवसेना - भाजप युतीला फटका
सिंधुदुर्ग : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणेंचा दबदबा कायम... शिवसेना - भाजप युतीचा फटका
बारामती : पुणे जिल्हा परिषद सुपा गटात 2314 मतांधिक्यानी राष्ट्रवादीचे भरत खैरे विजयी.. पुणे प्रादेशिक बाजार समितीचे मुख्य प्रशासक भाजपाचे दिलीप खैरे यांचा धक्कादायक पराभव
बीड : राष्ट्रवादी 4, भाजप 2, सेना 3, काँग्रेस 1 जागेवर आघाडीवर
नांदेड : काँग्रेस 4, सेना 1, भाजपा 3, राष्ट्रवादी 2, इतर 0 जागांवर आघाडीवर
जालना : सेना 5, भाजप 7, राष्ट्रवादी 4, इतर 1 जागांवर आघाडीवर
औरंगाबाद जिल्हा परिषद : काँग्रेस 1, शिवसेना 2, भाजपा 2, राष्ट्रवादी 1, इतर 0 जागांवर आघाडीवर
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद : काँग्रेस 14, शिवसेना 3, भाजप 1 जागांवर आघाडीवर
रायगड जिल्हा परिषद : शिवसेना 1 , राष्ट्रवादी 1, शेकाप 4, भाजप 2 आघाडीवर
नाशिक : नाशिकमध्ये शिवसेनेचे दादा भुसेंना मोठा धक्का... सात पैंकी पाच जागांवर भाजपचा विजय
सातारा : तरडगाव गटातून राष्टवादी काँग्रेसचे संजीवराजे नाईक निंबाळकर 7079 मतांनी विजयी
सातारा : जिल्ह्यात राष्ट्रवादी 18, काँग्रेस 6, भाजपा 3, शिवसेना 0, इतर 0 जागांवर विजयी
भिगवण जिल्हा परिषदेत हनुमंत बंडगर (राष्ट्रवादी) ६७१ मतांनी विजयी, शीतल वणवे (राष्ट्रवादी) पंचायत समिती गणातून विजयी, भिगवण पंचायत समिती गणातून संजय देहाडे (काँग्रेस) विजयी
नांदेड : सुनयना विशाल जाधव - किनवट उमरी गट - राष्ट्रवादी काँग्रेस विजयी
नांदेड : गोरठा गटातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या संगीता बालाजी जाधव विजयी
उस्मानाबाद : शिवसेनेला जिल्ह्यात मोठा धक्का... खासदार रवींद्र गायकवाड यांचे पुत्र किरण गायकवाड कुन्हाळी (उमरगा) जि.प. गटातून पराभूत
नांदेड : भोकर पाळज गटातून भाजपाचे दिवाकर रेड्डी सुरकुंठवाड 579 मतांनी विजयी... बहादरपुरा गटातून संध्या धोंडगे भाजपा 4200 मतांनी विजयी
हिंगोली : फाळेगांव गटातून काँग्रेसच्या भिसे सागराबाई गौतम विजयी तर येहळेगांव गटातुन राष्ट्रवादीचे मनीष आखरे विजयी
परभणी : पालम तालुक्यात रावराजूर गटातून राष्ट्रवादीचे शंकर वाघमारे विजयी
नांदेड : वाडी गटातून काँग्रेसच्या शिला निखाते विजयी
रायगड : श्रीवर्धन इथं सेनेने खाते उघडले... बार्लीत सेनेच्या सायली तोंडलेकर 814 मतांनी विजयी
मालवण : आडवली-मालडी जिल्हा परिषद मतदार संघात काँग्रेसचे महेंद्र चव्हाण आघाडीवर
परभणी : राष्ट्रवादी काँग्रेस महिला जिल्हा अध्यक्ष भावना अनिलराव नखाते यांचा हदगाव गटातून 104 मतांनी विजयी
जालना : परतुर तालुक्यातील वाटुर गटातून भाजपच्या छाया माने विजयी, जाफ्राबादमधील वरूड गटातून सेनेचे उत्तम वानखेडे विजयी... रांजणी गटातून राष्ट्रवादी उमेदवार विजयी
नांदेड - अंकीता मोरे कोंग्रेस सोनखेड गटातून 800 मतांनी विजयी
नांदेड : भाजपाचे खाते उघडले... आरळी गटातून भाजपाचे लक्ष्मण ठक्करवाड 1620 मतांनी विजयी
जालना : जिल्हा परिषदेत पहिला कौल सेनेच्या बाजुनं, वाघ्रुळ गटातून सेनेचे बबन खरात विजयी
सांगली : नागेवाडीमधून शिवसेनेचे सुहास बाबर विजयी... शिवसेनेची सलामी... सुहास हे शिवसेना आमदार अनिल बाबर यांचे पुत्र
सांगली : बागणीमधून रयत विकास आघाडी सागर सदाभाऊ खोत पिछाडीवर... अपक्ष संभाजी कचरे आघाडीवर
कोल्हापूर : दानोळी जिपमध्ये स्वाभिमानी संघटनेनं उघडलं खातं... शुभांगी शिंदे यांचा 800 मतांनी विजय
कोल्हापूर : जिल्हा परिषद निवडणुकीची टपाली मतमोजणी पूर्ण... काँग्रेसचे उमेदवार बहुतांश ठिकाणी आघाडीवर... झेडपीच्या 67 जागांसाठी मतमोजणी सुरु
पुणे : जिल्हा परीषदेच्या पहील्या फेरीअखेर पुरंदर तालुक्यातील 4 जागांपैकी 2 जागांवर काँग्रेस, एका जागेवारी राष्टवादी, एका जागेवर शिवसेना आघाडीवर
सोलापूर जिल्हा परिषद - बार्शी - उपळाई (ठो) गटात भाजपचे किरण मोरे 2000 मतांनी विजयी, बार्शीच्या इतिहासात पहिल्यांदाच कमळ फुलले
मावळमध्ये पंचायत समितीच्या 10 जागांपैंकी 7 ठिकाणी भाजपा आघाडीवर, तर 2 ठिकाणी राष्ट्रवादी, 1 ठिकाणी शिवसेना
जिल्हा परिषद निवडणुकीत मावळ तालुका पहिली फेरी... 5 जागा पैकी 4 ठिकाणी भाजपा आघाडीवर तर 1 ठिकाणी राष्ट्रवादी आघाडीवर
सिंधुदुर्ग : काँग्रेसचे 3, सेनेचे 2 तर भाजपचा एक उमेदवार आघाडीवर
रत्नागिरी : शिवसेनेचे 11 तर राष्ट्रवादीचे 8 उमेदवार आघाडीवर
नांदेड : जिल्हा परिषद निवडणूक... काँग्रेस - 12, शिवसेना - 3 तर भाजपा - 2 राष्ट्रवादी आणि अपक्ष एका जागी पुढे
कराड : रेठरे गटातून भाजपा उमेदवार शामबाला घोडके आघाडीवर... माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण गटाला धक्का
जालना : जिल्हा परिषदेच्या 56 गट आणि 8 पंचायत समित्यांच्या 112 गणांसाठी मतमोजणी सुरु
लातूर : जिल्हा परिषदेच्या ५८ जागा आणि पंचायत समिती ११६ गणांसाठी मतमोजणी सुरू
नांदेड : जिल्हा परिषदेच्या 63 गट आणि पंचायत समित्यांच्या 126 गणासाठी मोजणी सुरू... जिल्ह्यातील 16 तहसील कार्यालयात मतमोजणी
सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापुरात सुरुवातीला टपाल मतमोजणीला सुरूवात
कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या 67 तर पंचायत समितीच्या 134 जागांसाठीची मतमोजणी सुरू
रायगड : जिल्हा परिषद पंचायत समिती मतमोजणीला सुरुवात... 15 ठिकाणी मतमोजणी सुरु... सुरुवातीला टपाली मतं मोजण्यास सुरुवात
मुंबई : राज्यातील 25 जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल थोड्याच वेळात होणार जाहीर