LIVE : महाराष्ट्र बंदचे क्षणाक्षणाचे अपडेट

Shubhangi Palve Fri, 05 Jan 2018-8:41 am,

महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्रभर मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आलीय.

मुंबई : भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात सर्वत्र कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलाय. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन पोलिसांनी केलंय. भीमा-कोरेगावच्या घटनेबद्दल राग आहे, मात्र जनतेनं संयम बाळगावा असं आवाहनही आंबेडकर यांनी केलंय. 


'झी २४ तास' लाईव्ह स्ट्रिमिंग पाहण्यासाठी इथे क्लिक करा

Latest Updates

  • हर्बिन : चीनची हिमनगरी हर्बिनमध्ये आजपासून रंगणार बर्फाचा महोत्सव, बर्फामध्ये कलाकृती घडवणारे जगभरातले शिल्पकार महोत्सवासाठी दाखल

  • मुंबई : तब्बल साडे पाच तासानंतर ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील वाहतूक सुरू

  • पुणे : फक्त पुण्यात ५५ पीएमपीच्या बसेसची तोडफोड करण्यात आलीय, बंद मागे घेतल्याने हळूहळू सेवा सुरू करतोय : तुकाराम मुंडे यांची माहिती

  • मुंबई : गेल्या पाच तासांपासून वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरची वाहतूक ठप्प

  • मुंबई : आत्तापर्यंत ५२ बेस्ट बसेसची तोडफोड... चार बेस्ट ड्रायव्हर जखमी

  • मुंबई : घाटकोपर ते असल्फा मेट्रो रेल्वेची वाहतूक पुन्हा सुरळीतपणे सुरू 

  • मुंबई : मध्य रेल्वे, हार्बर रेल्वे मार्गावर वाहतूक पुन्हा सुरळीत सुरू तर पश्चिम रेल्वे मार्गावर वाहतूक उशिरानं 

  • मिलिंद एकबोटे, संभाजी भिडेंवर ३०२ चे खटले दाखल करा - प्रकाश आंबेडकर 

  • लोकांचा प्रतिसाद लक्षात घेता आरोपीवर सरकार कारवाई करेल अशी आशा आहे - आंबेडकर 

  • आमच्याच संपाचा आम्हाला फटका बसला, अनेक लोकं या ठिकाणी पोहचले नाहीत... आम्हाला पाठिंबा दिल्याबद्दल जनतेचे आभार - आंबेडकर 

  • मुंबई : जे न्याय याकूब मेमनला तोच संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटेंना लावावा - प्रकाश आंबेडकर

  • मुंबई : काही हिंदू संघटना केवळ अराजक माजवण्यासाठीच अस्तित्वात - आंबेडकर 

  •  मुंबई : 'महाराष्ट्र बंद'च्या प्रतिसादानंतर प्रकाश आंबेडकर यांची पत्रकार परिषद... 'महाराष्ट्र बंद' मागे घेत असल्याची घोषणा 

  • रायगड : मुंबई - गोवा महामार्गावरील वाहतूक रोखली, पनवेल - सायन मार्गावरही रास्ता रोका

  • मुंबई : मध्य रेल्वे मार्गावर कुर्ला ते सीएसटीएम विशेष लोकल तसेच ठाणे ते कर्जत विशेष लोकल सोडण्यात आली

  • मुंबई : हार्बर मार्गावर विशेष लोकल सोडण्यात येत आहेत, हार्बर मार्गावर कुर्ला ते सीएसटीएम लोकल धावत आहेत, मानखुर्द येथे दुपारी २ वाजता वडाळा लोकल रोखून धरण्यात आली होती, ही लोकल २० मिनिटे थांबविण्यात आली होती, पोलिसांनी आंदोलकांना पांगविल्यानंतर हार्बर सेवा सुरळीत

  • ठाणे : शहरात महाराष्ट्र बंदला सकाळी कमी प्रतिसाद मिळाला परंतु दुपारनंतर मात्र सर्वत्र कडकडीत बंद दिसून येतोय

  • ठाणे : ठाण्यातील नितीन कंपनीजवळ ईस्टर्न हायवेवर गेल्या एक तासापासून रास्ता रोको... दोन्ही बाजुंवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी

  • मुंबई : दुपारी १.०० वाजेपर्यंत बेस्टच्या ४८ बसेसची तोडफोड... चार बस चालक काचा लागून जखमी 

  • रायगड : महाडमध्ये आंदोलनाला हिंसक वळण... ३ ते ४ दुकानांची तोडफोड... बंद दुकानांचे नुकसान केल्याने व्यापारी संतप्त... ५००  व्यापारी पोलीस ठाण्यात पोहचले... आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी

  • मुंबई : कांजुरमार्ग रेल्वे स्टेशनवर जमावाकडून स्टिलच्या खुर्च्या, ट्युबलाईट, वॉटर वेंडिग मशीनची तोडफोड 

     

  • परभणी : आरएसएसच्या कार्यालयावर दगडफेक... आंदोलकांचा कार्यालय पेटवून देण्याचा प्रयत्न... बस स्थानक परिसरातील घटना... पोलिसांचा सौम्य लाठीमार

  • मुंबई : गेल्या तीन तासांपासून ईस्टर्न एक्स्प्रेस हायवे ठप्पच

  • पुण्यातील या क्षणाची स्थिती

    - अपवाद वगळता संपूर्ण शहारात बंद

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    - शाळा, कॉलेजेस पूर्णपणे बंद

    - काही ठिकाणी व्यावसायिकांचा स्वत:हून प्रतिसाद, काही ठिकाणी जबरदस्तीने बंद

    - अनेक ठिकाणी बंदला हिंसक वळण

    - आतापर्यंत २० ते २२ गाड्या फोडल्या

    - ठिकठिकाणी आंदोलक रस्त्यावर 

    - ठिकठिकाणी मोर्चे, निदर्शने आणि ठिय्या 

    - उपनगरांत काही ठिकाणी तणावाचं वातावरण 

    - 'समस्त हिंदू आघाडी'च्या मिलिंद एकबोटेंच्या घरासमोर पोलीस बंदोबस्त 

    - अनेक ठिकाणी दगडफेक 

    - पीएमपील वाहतूक प्रभावीत 

    - मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त, परिस्थिती नियंत्रणात

  • पुणे : पुणे स्टेशन, कॅम्प, ताडीवाला रोड, फर्ग्युसन कॉलेज रोड परिसरात आंदोलनकर्ते रस्त्यावर

  • ठाणे : लोकमान्य बस डेपोजवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुतळा जाळण्यात आला 


    ठाण्यात आंदोलन

  • कोल्हापूर : आंदोलकांनी खाजगी गाड्या फोडल्या... खबरदारीचा उपाय म्हणून शहरातली इंटरनेट सेवा बंद

  • मुंबई : कुर्ल्यात आंदोलकांचा रेल रोकोचा प्रयत्न 


    दुपारी १.४० वाजता

  • पुणे : तासाभराच्या रास्ता रोकोनंतर पुण्यातील सिंहगड रोड, दांडेकर पुलावरील वाहतूक सुरळीत 

  • जालना :भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणाचा निषेध म्हणून परतूरमध्ये उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला

  • मुंबई : दादर, दहिसर, बोरिवली रेल्वे आंदोलन संपलं... वाहतूक पुन्हा सुरू   

  • नवी मुंबई : रबाळे स्टेशनवर आंदोलकांनी रेल्वे रोखली... ट्रान्स हार्बर रेल्वे लाईन ठप्प


    आंदोलक रेल्वे रुळावर

  • ठाणे : सिडको बस स्टॉपवर दोन टीएमटी बस फोडल्या

  • मुंबई : महाराष्ट्र बंद आंदोलनामुळे मुंबईत पश्चिम रेल्वे मार्गावरील एसी लोकलच्या फेऱ्या सुरक्षेच्या कारणामुळे दिवसभर रद्द करण्यात आल्या आहेत

  • मुंबई : रेल्वेची हार्बर लाईन वाशीपुढे बंद 

  • पुणे : पुण्यात दांडेकर पुलावरची वाहतूक बंद, एकबोटेंच्या घरावर आंदोलकांचा मोर्चा, तुरळक दगडफेकीत एका बसचं नुकसान 

  • मुंबई : मुंबईत पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहतूक रोखली, मेट्रो, आणि लोकल वाहतुकीवरही परिणाम

  • नवी दिल्ली : भीमा-कोरेगाव प्रकरणाचे लोकसभेत पडसाद, भाजपशासित राज्यात हिंसाचार वाढला... काँग्रेसचा आरोप, तर काँग्रेसकडून समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न, भाजपचा पलटवार 

  • मुंबई : रेल्वेच्या तीनही मार्गावरील सेवा विस्कळीत

  • मुंबई : हाजी अलीकडून वरळी नाका दिशेला जाणाऱ्या उड्डाण पुलावरची वाहतूक बंद... वरळी नाका येथे मोर्चा दाखल झाल्यानं वाहतूक बंद

  • मुंबई : दहिसरमध्ये गाड्याची तोडफोड... दहिसर चेक नाका परिसरात वाहतूक सुरू करण्यात आली

  • मुंबई : दहिसरमध्ये गाड्याची तोडफोड... दहिसर चेक नाका परिसरात वाहतूक सुरू करण्यात आली

  • मुंबई : ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरून पवईच्या दिशेने जाणारी वाहतूक पोलिसांनी रोखली... पवईत तणावाचं वातावरण

  • पिंपरी चिंचवड : जुना मुंबई - पुणे महामार्ग पिंपरी आंबेडकर चौकात बंद... ग्रेड सेपरेटरमधून वाहतूक सुरू... आंबेडकर चौकात मोठ्या प्रमाणात आंदोलक जमा, तणावपूर्ण शांतता 

  • सांगली :  चौकात आंदोलक मोठ्या संख्येने जमा... मोठा पोलीस बंदोबस्त तैनात... सांगलीतील गाव परिसरात जाऊन भीम सैनिकांची घोषणाबाजी

  • सांगली : मारुती चौकातील संभाजी भिडे यांच्या फोस्टरवर आंदोलकांनी केली दगडफेक... मनपाच्या कर्मचाऱ्यांनी पोस्टर हटवले  

  • मुंबई : एलफिन्स्टन स्टेशनवरील रेल रोको नियंत्रणात... पोलिसांनी आंदोलकांना ट्रॅकवरून बाजूला केल्यानंतर पश्चिम रेल्वेवरील वाहतूक पूर्ववत

  • मुंबई : असल्फा ते घाटकोपर मार्गावर मेट्रो सेवा आंदोलकांनी पाडली बंद 

  • मुंबई : एलफिन्स्टन स्टेशनवर रेल रोको... चर्चगेटकडे जाणारी लोकल रोखून धरल्याने पश्चिम रेल्वे विस्कळीत 

  • मुंबई : हिंदमाता चौक येथे काही लोकांनी दगडफेक... दादर पूर्व भागात दुकानं बंद

  • मुंबई : घाटकोपच्या रमाबाई आंबेडकर नगरजवळ ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर वाहतूक रोखली

  • उस्मानाबाद : पुणे - हैदराबाद महामार्गावर उमरगा येथे आंदोलकांचा रास्ता रोको 

  • बारामती : भिमा  कोरगांवच्या घटनेच्या निषेधार्थ बारामती शहरात विराट मोर्चा... हजारो भिमसैनिक मोर्चात सहभागी पोलिसांचा चोख बंदोबस्त 

  • बारामती : भिमा  कोरगांवच्या घटनेच्या निषेधार्थ बारामती शहरात विराट मोर्चा... हजारो आंदोलक मोर्चात सहभागी पोलिसांचा चोख बंदोबस्त

  • मुंबई : मुंबईत येणारे दोन प्रमुख महामार्ग रोखले... ईस्टर्न आणि वेस्टर्न हायवेवर रास्ता रोको

  • मुंबई : मुंबईहून ठाणे - नाशिककडे जाणारी आणि मुंबईकडे येणारी वाहतूक ठप्प आहे

  •  रत्नागिरी : रत्नागिरी - नागपूर मार्गदेखील बंद... महामार्गावर वाहतूक कोंडी 

  • रत्नागिरी : मुंबई - गोवा महामार्गावर बंद... पाली येथे आंदोलकांचा रास्ता रोको 

  • नंदुरबार : रनाळे गावाजवळ अज्ञातांची एसटी बसवर दगडफेक... बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान... खबरदारीचा उपाय म्हणून बस सेवा बंद 

  • मुंबई : घाटकोपर- अंधेरी लिंक रोडवर आंदोलक रस्त्यावर... जागृती नगर मेट्रो स्टेशन जवळ आंदोलकांचं ठिय्या आंदोलन

  • अमरावती : शहराच्या बडनेरा आणि जुन्या वस्तीत आज सकाळी आंदोलकांनी मोर्चा काढून सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली... बडनेरा रेल्वे स्टेशन बडनेरा बस स्थानक परिसरातील दुकानं बंद केली

  • लातूर : भीमा कोरेगाव प्रकरणी निलंगा तालुक्यातील केळगाव इथे कार्यकर्त्यांनी केला रास्ता रोको, रस्त्यावर टायर पेटवून केला रास्ता रोको

  • जालना : भीमा कोरेगाव प्रकरणाचा निषेध करण्यासाठी शहरात बंद... रस्त्यावर उतरून कार्यकर्त्यांकडून बंदचं आवाहन

  • बीड : बंदला संमिश्र प्रतिसाद... मुख्य रस्त्यावरील बाजारपेठ बंद... बीड औरंगाबाद महामार्गावर रांजनी येथे एका चार चाकी वाहनावर दगडफेक

  • सांगली : प्रमुख बाजारपेठा बंद... बंदच्या पार्श्वभूमीवर शाळांनाही सुट्टी...  एसटी बस सेवा बंद... मोठा पोलीस बंदोबस्त तैनात

  • नागपूर : दक्षिण नागपुरातील शताब्दी चौक परिसरात रस्त्यावर टायर जाळून 'रास्ता रोको'चा प्रयत्न... वाहतूक सुरळीत, पोलीस घटनास्थळी

  • मुंबई : कांदिवली - अकुर्ली, दिंडोशी - हनुमान नगर, चांदिवली - संघर्ष नगर, खैरानी रोड - साकीनाका, सहर कार्गो, मुलुंड चेक नाका, जिजामाता नगर या भागांतील 'बेस्ट' वाहतूक बंद

  • पुणे : इंदापूर तालुक्यातील गोतोंडी येथे बारामती-  इंदापूर राज्य महामार्गावर टायर पेटवून रास्ता रोको

  • मुंबई : महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातल्या एसटी सेवेवर मोठा परिणाम... खबरदारीचा उपाय म्हणून एसटी बस डेपोतच

  • मुंबई : महाराष्ट्र बंदला मुंबई, ठाण्यात संमिश्र प्रतिसाद... लोकल आणि बस सेवा सुरळीत

  • मुंबई : खबरदारीचा उपाय म्हणून नाशिक, पुणे,औरंगाबादमध्ये शाळांना सुटी... मुंबईसह राज्यातल्या ४० हजार स्कूल बसही बंद 

  • मुंबई : महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात पोलीस बंदोबस्तात वाढ, कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी सज्ज राहण्याचे आदेश 

  • मुंबई : पश्चिम रेल्वे मार्गावर रेल्वे १०-१५ मिनिटे उशिरानं 

  • मुंबई : गोरेगाव रेल्वे स्थानकावर सकाळी साडे आठ वाजल्याच्या सुमारास रेल रोकोचा प्रयत्न... जवळपास १५-२० मिनिटं रेल्वे थांबवण्यात आल्या 

  • कोल्हापूर : गोरगोटी-कोल्हापूर रस्ता बंद... शिळेवाडी फाटा इथं आंदोलकांचं रास्ता रोको 

  • ठाणे : रस्त्यावर रिक्षा आणि इतर वाहतूक सेवा कमी झाल्यानं बाहेर पडलेले नागरिक रस्त्यावर ताटकळले

  • ठाणे : टीएमटी बसेसच्या चाकांमधून हवा काढण्याचा प्रयत्न... टीएमटी बंद ठेवण्याची मागणी

  • घाटकोपरमध्ये कडक बंदोबस्त 

  • पोलिसांचं नागरिकांना आवाहन

  • अमरावती : जिल्ह्यात पोलिसांचा कडक बंदोबस्त... शहरात महत्त्वाच्या चौकांत, नाक्यांवर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त... एसटीची वाहतूक सुरळीत प्रवाशांची संख्या मात्र कमी 

  • औरंगाबाद : खबरदारीचा उपाय म्हणून औरंगाबादमध्ये इंटरनेट सेवा रात्री १२ वाजल्यापासून बंद... आज रात्री १२ वाजेपर्यंत इंटरनेट बंद राहणार, पोलीस आयुक्तांचा आदेश

  • मुंबई : दादर फुल मार्केट, हॉटेल, टॅक्सी, बस सेवा सुरळीत सुरू... नेहमीच्या तुलनेने गर्दी मात्र कमी

  •  

     

  • ठाणे : ठाण्यात रेल रोकोचा अयशस्वी प्रयत्न... वाहतुकीवर परिणाम नाही


    ठाण्यात 'रेल रोको'चा प्रयत्न

  • मुंबई : तीनही मार्गांवरील रेल्वे सेवा सुरळीत सुरू

  • रायगड : एसटी सेवाही सुरळीत सुरू... परिस्थिती पाहून पुढील निर्णय घेणार  लांब पल्ल्याच्या गाड्या सुरक्षित मार्गापर्यंत धावणार - एसटी प्रशासन 

  • रायगड : मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक सुरळीत, शाळा सुरू... 

  • रायगड  : जिल्ह्याच्या काही भागात आज बंद... कर्जत खालापूर , गोरेगाव , माणगाव, उरण येथे बंद राहणार

     

  • नवी  मुंबई : काही खाजगी शाळांना  सुट्टी, मात्र महापालिका शाळा सुरु... बाजारपेठा बंद

  • सोलापूर : पोलिसांची फिरती गस्त आणि ठिकठिकाणी  बंदोबस्त तैनात... शहरात तणावपूर्ण शांतता 

  • सोलापूर : महाराष्ट्र बंदचा परिणाम सोलापुरातही... शहरातील प्रमुख बाजारपेठा अद्याप उघडल्याच नाहीत

  • औरंगाबाद : मध्यवर्ती बस स्थानक बंद... मंगळवारी झालेल्या २१ गाड्यांच्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर आज खबरदारीचा उपाय म्हणून एसटी सेवा बंद 

  • निफाड : मनमाड-लासलगाव जाणारी बस समाज कंटकांनी दगडफेक करून फोडली... चालक आणि वाहकांच्या सतर्कतेमुळे वाचले शाळेच्या विद्यार्थ्यांसह प्रवाशी सुरक्षित

  • निफाड : भीमा-कोरेगाव येथील घटनेचे पडसाद... लासलगाव बंदला हिंसक वळण

     

  • भीमा कोरेगाव : कोरेगाव दगडफेक प्रकरणाची सरकारकडून गंभीर दखल.. प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करणार मुख्यमंत्र्यांची महिती

  • मुंबई : महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात पोलीस बंदोबस्तात वाढ, कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी सज्ज राहण्याचे आदेश 

  • मुंबई : राज्यातील शाळा आणि कॉलेजेस आज सुरुच रहाणार शिक्षण अधिकाऱ्यांचा निर्णय... खबरदारीचा उपाय म्हणून स्कूल व्हॅन चालकांचा बंद... पुणे, औरंगाबादमध्ये काही शाळांना सुट्टी

  • मुंबई : लाल बावटा संघटनाही संपात सहभागी... मुंबईत आज डबेवाल्यांची सेवाही राहणार बंद 

  • मुंबई : महाराष्ट्र बंदला ठाणे आणि कोकणातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांचा पाठिंबा 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link