Maharashtra Politics News LIVE : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर आता 14 फेब्रुवारीला सुनावणी

Tue, 10 Jan 2023-11:41 am,

Maharashtra Political Crisis Supreme Court Hearing Today : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर आता महत्त्वाची महासुनावणी 14 फेब्रुवारी रोजी होणार आहे. (Maharashtra Politics) सुप्रीम कोर्टासह निवडणूक आयोगात ठाकरे आणि शिंदे (Uddhav Thackeray vs Eknath Shinde) गटाची अग्निपरीक्षा असणार आहे.

Maharashtra Political Crisis Hearing LIVE : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर आता 14 फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे. (Maharashtra Politics Crisis)  सुप्रीम कोर्टासह निवडणूक आयोगात ठाकरे आणि शिंदे (Shinde vs Thackeray) गटाची अग्निपरीक्षा असणार आहे. दरम्यान, पाचऐवजी सात न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर सुनावणी घेण्याची मागमी उद्धव ठाकरे गटाने केली आहे.

Latest Updates

  • महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर आता 14 फेब्रुवारीला सुनावणी

    Maharashtra Political News : महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षावर आता सुप्रीम कोर्टात पुढील सुनावणी ही 14 फेब्रुवारीला होणार आहे. शिवसेनेतली फूट, विधानसभा अध्यक्षांची निवड, राज्य सरकारवरचा विश्वासदर्शक ठराव, राज्यातल्या 16 आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा तसंच सत्तासंघर्षावर ठाकरे आणि शिंदे गटाकडूनही याचिका करण्यात आल्या आहेत. 

  • धनुष्यबाण चिन्ह ठाकरे गटाला की शिंदे गटाला मिळणार?

    Maharashtra Political News : राज्यातल्या सत्तासंघर्षावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. तर दुसरीकडे केंद्रीय निवडणूक आयोगासमोर धनुष्यबाण चिन्हाचा निर्णय होणार आहे. धनुष्यबाण चिन्ह ठाकरे गटाला की शिंदे गटाला मिळणार यावर आज सुनावणी होईल. केंद्रीय निवडणूक आयोगासमोर दुपारच्या सुमारास प्रत्यक्ष सुनावणी पार पडेल. ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटांनी कागदपत्रं सादर केली आहेत. पण त्यावर शंका घेणार अर्जही दोन्ही गटांनी दिलेत. या अर्जांवर सर्वात आधी सुनावणी होईल, त्यानंतर मग चिन्ह कोणाला मिळणार यावर सुनावणी पार पडेल. 

  • Maharashtra Political Crisis : सुनावणीकडे संपूर्ण देशाचे लक्ष 

    Maharashtra Political News :  केंद्रीय निवडणूक आयोगापुढेही थोड्याचवेळात सुनावणी सुरु होणार आहे. धनुष्यबाण कुणाचे?, यावर शिंदे आणि ठाकरे गटाकडून बाजू मांडली जाणार आहे. दोन्ही गटांकडून लाखो सदस्यांचे शपथपत्र निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयानेही धनुष्यबाणाबाबत निर्णय केंद्रीय निवडणूक आयोग घेईल, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे या सुनावणीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

    घटनापीठ आणि निवडणूक आयोगातील घटनाक्रम

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    11 डिसेंबर 2022 - सर्वोच्च न्यायालयात दोन्ही गटांतील युक्तीवाद केले. यावर आता पुढील सुनावणी 10 जानेवारी रोजी होणार.

    9 डिसेंबर 2022- दोन्ही गटांनी आपआपली कागदपत्रे सादर केली. यात ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाकडे 20 लाख सदस्याचे प्रतिज्ञापत्र देण्यात आले तर शिंदे गटाकडून 10.3 लाख प्राथमिक सदस्यांचे अर्ज आणि 1.8 लाख प्रतिज्ञापत्र  सादर केली.

    11 ऑक्टोबर  2022 - दोन्ही गटांना स्वतंत्र नाव आणि निवडणूक चिन्ह देण्यात आले. हे चिन्ह केवळ अंधेरी पोटनिवडणुकीसाठी देण्यात आले.

    8 ऑक्टोबर  2022 - निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन्ही नेत्यांना या प्रकरणी अंतिम निकाल येईपर्यंत शिवसेनेचे नाव आणि निवडणूक चिन्ह यांचा वापर न करण्याचे आदेश दिला.

    7 ऑक्टोबर  2022 - दोन्ही गटांनी शिवसेनेच्या चिन्हावर दावा करणारी कागदपत्र निवडणूक आयोगाला सादर केली. शिंदे यांच्या याचिकेवर आयोगाने उद्धव ठाकरे यांना नोटीस पाठवली. शनिवार दुपारपर्यंत उत्तर देण्याचे आदेश दिलेत.

    4 ऑक्टोबर  2022 - एकनाथ शिंदे गटाने केंद्रीय निवडणूक आयोगात याचिका दाखल केली. यात तात्काळ सुनावणी करावी, अशी मागणी केली. शिवसेनेचे निवडणूक चिन्ह 'धनुष्यबाण' आपल्याला मिळावे, अशी शिंदे गटाची मागणी.

    22 सप्टेंबर  2022 -  सर्वोच्च न्यायालयाकडून उद्धव ठाकरे यांना मोठा झटका. उद्धव ठाकरे गटाचा अर्ज फेटाळत न्यायालयाने खरी शिवसेना कोणाची, याचा निर्णय निवडणूक आयोग घेईल, असा निर्णय दिला.

    6 सप्टेंबर  2022 - सर्वोच्च न्यायालयाने या विषयाशी संबंधित सर्व प्रकरणांची एकत्रित सुनावणी करण्याचा निर्णय घेतला.

    25 ऑगस्ट 2022 - घटनापीठामध्ये सुनावणीला सुरुवात झाली. शिवसेना आणि शिंदे गटाच्यावतीने आपआपले दावे न्यायालयासमोर मांडण्यात आले.

  • Maharashtra Political News :  शिवसेना नेते (ठाकरे गट) खासदार संजय राऊत, अनिल देसाई आणि अनिल परब सुप्रीम कोर्टात दाखल. 

  • 'लोकशाहीत कोणते आदर्श निर्माण करणार आहेत हे या प्रकरणातून जगासमोर !'

    Maharashtra Political News : राज्यातल्या सत्तासंघर्षाबाबत आज सुप्रीम कोर्टात होत असलेल्या सुनावणीकडे राज्याचं लक्ष लागून राहिलेलं असतानाच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत  (Sanjay Raut) यांनी सूचक ट्वीट केलंय. मन मे हमेशा जीत की आस होनी चाहिये, नसीब बदले या ना बदले, वक्त जरूर बदलता है अशी कॅप्शन असलेला फोटो राऊतांनी ट्वीट केलाय. (Maharashtra Politics Crisis News) तर दुसरीकडे राऊत म्हणाले, कोणत्याही दबावाखाली स्वायत्त संस्था येऊ नये. या देशात न्याय व्यवस्था आहे की नाही हे या केस वरुन दिसून येईल. आम्ही सत्याच्या पलिकडे काहीच मागत नाही. लोकशाहीत कोणते आदर्श निर्माण करणार आहेत हे या प्रकरणातून जगासमोर जाणार आहे. घटनाबाह्य पद्धतीनं पक्ष फोडण्यात आला.

  • घटनाबाह्य सरकार एक दिवसही राहता कामा नये -  राऊत

    Maharashtra Political News : राज्यातलं घटनाबाह्य सरकार एक दिवसही राहता कामा नये, शिवसेनेचा कोर्टावर विश्वास आहे, न्याय मिळेल असं खासदार संजय राऊत  (Sanjay Raut) म्हणाले. मुख्यमंत्र्यांचा दिल्लीतल्या महाशक्तीवर विश्वास आहे. त्यामुळे ही लढाई कोर्ट विरुद्ध महाशक्ती अशी आहे अशी टीका राऊतांनी केलीय. 
     

  • Maharashtra Politics News : महाराष्ट्राच्या राजकारणातली मोठी बातमी. (Maharashtra Politics News) महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज सुप्रीम कोर्टात  (Supreme Court) सुनावणी होत आहे. (Maharashtra Political News ) या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. गेल्या सहा महिन्यांपासून महाराष्ट्रातील 16 आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा आणि सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टात खटला सुरु आहे. शिवसेना ठाकरे गटातर्फे विविध याचिका करण्यात आल्या आहेत. या याचिकांवर आज सुनावणी होणार आहे.  (Dhanushban) ही सुनावणी 5 ऐवजी 7 न्यायाधीशांच्या घटनापीठापुढे करावी अशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मागणी आहे. महिनाभरानंतर हे प्रकरण सुप्रीम कोर्टात सुनावणीसाठी येणार आहे. सुप्रीम कोर्टाच्या आजच्या कामकाजात सकाळी साडेदहा वाजता त्यावर सुनावणी होणार आहे. ठाकरे गटाची 7 न्यायमूर्तींकडे प्रकरण सोपवण्याची मागणी मान्य होते का याची उत्सुकता आहे.

     

  • सत्तासंघर्षावर सुनावणी करणारे न्यायाधीश कोण आहेत ते पाहूया

    1. न्यायमूर्तीं धनंजय चंद्रचूड

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    2. न्यायमूर्तीं एम आर शाह

    3. न्यायमूर्तीं कृष्ण मुरारी

    4. न्यायमूर्तीं हिमाकोहली

    5. न्यायमूर्तीं पी नरसिंह 

    आसाममधील  रेबिया प्रकरणाचा दाखला

    सुप्रीम कोर्टात ठाकरे गटाची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी आसाममधील नबाम रेबिया प्रकरणाचा उल्लेख केला. 2016 मध्ये अरुणाचलमध्ये तत्कालीन राज्यपालांनी काँग्रेसचं सरकार बरखास्त करत राष्ट्रपती राजवट लावली. त्यानंतर सर्वोच्च न्यायालाने 13 जुलै 2016 मध्ये पुन्हा काँग्रेसचं सरकार स्थापन करण्याचे आदेश देत राज्यपालांचं कृत्य अवैध ठरवलं होतं. महाराष्ट्रातही राज्यपालांनी फ्लोअर टेस्ट घेण्याचे आदेश दिले होते. राज्याच्या सत्तासंघर्षात या प्रकरणाचा वारंवार उल्लेख करण्यात आला आहे. 

  • सात न्यायाधिशांच्या खंडपीठासमोर सुनावणी?

    राज्यातील सत्तासंघर्षावर पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाऐवजी सात न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर सुनावणी व्हावी, अशी मागणी ठाकरे गटाने (Thackeray Group) केली आहे. यावर देखील विचार केला जाणार आहे.

    आत्तापर्यंत कोणी किती कागदपत्र सादर केलीत?

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) 
    182 राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य
    प्रतिज्ञापत्र 3 लाख (जिल्हा प्रमुख ते गटप्रमुख)
    प्राथमिक सदस्य 20 लाख

    एकूण कागदपत्र 23 लाख 182

    बाळासाहेबांची शिवसेना
    खासदार 13
    आमदार 40
    संघटनात्मक प्रतिनिधी 711
    स्थानिक स्वराज्य संस्था प्रतिनिधी-2046
    प्राथमिक सदस्य 4,48,318
    शिवसेना राज्यप्रमुख 11
    एकूण 4 लाख 51 हजार 139

  • Maharashtra Politics News : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर आज 10 जानेवारीला सुप्रीम कोर्टात (Supreme Court) महत्त्वाची सुनावणी होत आहे. सुप्रीम कोर्टात 16 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात तर निवडणूक आयोगात धनुष्यबाण चिन्हं (Dhanushban Symbol) कोणाला मिळणार यावर पहिल्यांदाच केंद्रीय निवडणूक आयोगात (Central Election Commission) प्रत्यक्ष सुनावणी पार पडणार आहे. दोन्ही गटाने जी कागदपत्र सादर केली आहेत त्यावर शंका घेणाऱ्या अर्जांवर सुरुवातीला सुनावणी होणार आहे आणि नंतर मूळ प्रकरणावर सुनावणी घ्यावी अशी मागणी या अर्जात करण्यात आली आहे.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link