Budget Session 2023 LIVE : GDP वाढीचा दर पुढील वर्षासाठी 6.5 % राहण्याचा अंदाज

Sun, 12 Feb 2023-12:25 pm,

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सकाळी 11 वाजता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या लोकसभा आणि राज्यसभेच्या संयुक्त बैठकीला संबोधित करून सुरू होईल. केंद्रीय अर्थसंकल्पाच्या एक दिवस अगोदर आर्थिक सर्वेक्षण देखील संसदेत मांडले जाईल. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे पहिले सत्र 13 फेब्रुवारी रोजी संपेल तर दुसरे सत्र 13 मार्च ते 6 एप्रिल दरम्यान होणार आहे.

Parliament Budget Session 2023 Updates :  संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सकाळी 11 वाजता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांच्या लोकसभा आणि राज्यसभेच्या संयुक्त बैठकीला संबोधित करून सुरू होईल. केंद्रीय अर्थसंकल्पाच्या (Union Budget 2023) एक दिवस अगोदर आर्थिक सर्वेक्षण देखील संसदेत (Economic Survey) मांडले जाईल. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे पहिले सत्र 13 फेब्रुवारी रोजी संपेल तर दुसरे सत्र 13 मार्च ते 6 एप्रिल दरम्यान होणार आहे.

Latest Updates

  • लोकसभेत आर्थिक सर्वेक्षण सादर

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Parliament Budget Session 2023 : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत आर्थिक सर्वेक्षण सादर केले. आर्थिक पाहणी अहवालानुसार, देशाचा विकास दर 2023-24 मध्ये  6.5 टक्के असेल. यावर्षी विकास दर 7 टक्के असेल तर  2021-22 मध्ये विकास दर 8.5 टक्के इतका होता. भारत जगातील सर्वात वेगाने विकास होणारी अर्थव्यवस्था होत आहे. या अहवालानुसार आर्थिक विकास वैयक्तीक खर्च, कॉरपोरेट बॅलेंस शीट्स, छोट्या व्यावसाईकांमधील क्रेडिट ग्रोथ आणि प्रवासी मजूर पुन्हा शहरात परत आल्याने होईल, असे सीतारामन म्हणाल्या.

    महागाई कमी होण्याचा अंदाज

    RBIने या आर्थिक वर्षात महागाई 6.8 टक्के असेल असा अंदाज व्यक्त केला आहे. हा अंदाज आरबीआयच्या अप्पर टार्गेट लिमिटच्यावर आहे.

    कर्ज महागणार

    कर्ज घेणाऱ्यांसाठी वाईट बातमी आहे. कर्जावरील व्याज दिर्घ काळासाठी उच्च राहण्याची शक्यता आहे. महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी रेपो रेट वाढवला जाईल.

  • देशात वाहतुकीचे जाळे उभारले - राष्ट्रपती

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    - भारत जगातील तिसरी सर्वात मोठी विमान वाहतूक बाजारपेठ बनली आहे.
    - देशाचे विमान वाहतूक क्षेत्र झपाट्याने प्रगती करत आहे.
    - गेल्या 8 वर्षांत देशातील मेट्रोचे जाळे तीनपटीने वाढले आहे..
    - आज 27 शहरांमध्ये ट्रेनचे काम सुरु आहे.
    - देशभरातील 100 हून अधिक नवीन जलमार्ग देशातील वाहतूक क्षेत्राला नवसंजीवनी देण्यास मदत करतील.

  • 260 हून अधिक वैद्यकीय महाविद्यालये सुरु - राष्ट्रपती

    - वैद्यकीय विद्यार्थ्यांची संख्या दुप्पट झाली आहे.
    8 वर्षांत 300 हून अधिक विद्यापीठे निर्माण झाली. 5 हजारांहून अधिक महाविद्यालये उघडली.
    2004 ते 2014 दरम्यान 145 वैद्यकीय महाविद्यालये उघडण्यात आली.
    2014 ते 2022 पर्यंत 260 हून अधिक वैद्यकीय महाविद्यालये उघडण्यात आली आहेत.

  • देशात कायमस्वरूपी आणि पारदर्शक व्यवस्था - राष्ट्रपती

    - 2045 पर्यंत गौरवशाली देशाची निर्मिती - राष्ट्रपती
    - भारताकडे पाहण्याचा जगाचा दृष्टिकोन बदलला
    - अनेक योजनांशी शेतकरी जोडले 
    - किसान निधीकडून लहान शेतकऱ्यांना फायदा होतोय
    - गरिबांनी उपाशी झोपू नये, हा सरकारचा प्रयत्न 
    - भ्रष्टाचार हा लोकशाही आणि सामाजिक न्यायाचा सर्वात मोठा शत्रू असल्याचे सरकारचे सिद्ध केले 
    - गेल्या काही वर्षांत डिजिटल इंडियाच्या रुपाने देशाने कायमस्वरूपी आणि पारदर्शक व्यवस्था या सरकारने तयार केली 
    - सरकारच्या गेल्या काही वर्षांतील प्रयत्नांचा परिणाम म्हणून अनेक मूलभूत सुविधा 100 टक्के लोकसंख्येपर्यंत पोहोचल्या आहेत.

  • भारताला आत्मनिर्भर बनवणे आमचे उद्दिष्ट आहे - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू  

    - सर्वात जलद निर्णय घेणारे सरकार 
    - गरिबांना पक्की घरे दिली 
    - सरकारने जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० रद्द केले
    - जनऔषधी केंद्रांमध्ये स्वस्त औषधे उपलब्ध 
    - यापूर्वी टॅक्स रिफंडसाठी खूप प्रतीक्षा करावी लागत होती. आज, आयटीआर दाखल केल्यानंतर काही दिवसात परतावा मिळतो.
    - जन धन, आधार, मोबाईलपासून ते वन नेशन वन रेशन कार्डपर्यंत बनावट लाभार्थी काढून टाकण्यापर्यंत, सरकारने मोठी कायमस्वरूपी सुधारणा केली 

  • Parliament Budget Session 2023 LIVE : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाने (Parliament Budget Session) 2023 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली. संसदीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रपती मुर्मू यांनी संसदेच्या सभागृहाला संबोधित करत आहेत.

  • Parliament Budget Session 2023 Updates : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करत आहेत.

  • अर्थसंकल्पात यावर असणार भर

    Union Budget 2023 : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात होणार आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होईल. त्यानंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या देशाचा आर्थिक पाहणी अहवाल सभागृहाच्या पटलावर ठेवतील. यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात संसदेचं कामकाज 66 दिवस सुरु राहणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 1 फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या 2023-24 सालचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करतील. यंदा कोणतेही नवीन कर नाही असे अर्थमंत्र्यांनी संकेत दिलेत तर केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 8 वा वेतन आयोग लागू होण्याची करण्याची घोषणा होऊ शकते. 

  •  अर्थसंकल्पात सामान्यांच्या आशा-आकांक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न - मोदी

    Parliament Budget Session 2023 LIVE : आज एक महत्त्वाचा प्रसंग आहे, भारताचे विद्यमान राष्ट्रपती पहिल्यांदाच संसदेत संबोधित करणार आहेत. राष्ट्रपतींचे भाषण हे भारतीय संविधानाचा अभिमान आहे. भारताच्या संसदीय व्यवस्थेचा अभिमान आहे. विशेषत: आजचा दिवस म्हणजे महिलांचा सन्मान करण्याचा, जगण्याचा आहे. आपल्या देशाच्या अर्थमंत्रीही एक महिला आहेत. त्या उद्या देशासमोर अर्थसंकल्प मांडतील. भारतच नाही तर संपूर्ण जगाचं लक्ष या बजेटकडे आहे. भारताच्या आर्थिक स्थितीत भारताच्या अर्थसंकल्पात  सामान्य माणसाच्या आशा-आकांक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

  • Parliament Budget Session 2023 Updates : अर्थसंकल्पापूर्वी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर 'आप' बहिष्कार घालणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आम आदमी पक्षाने (AAP) अर्थसंकल्पापूर्वी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रपतींच्या भाषणावेळी पक्षाचे खासदार संसद भवनाबाहेर राहण्याची शक्यता आहे.

  • Parliament Budget Session 2023 : अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होण्यापूर्वी पंतप्रधान मोदी पत्रकारांशी संवाद साधणार आहेत.  सकाळी 10.30 वाजता ते प्रसारमाध्यमांशी बोलण्याची शक्यता आहे. 

  • Union Budget 2023 Updates :  संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीच्यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या पहिल्या अभिभाषणाने अधिवेशनाची सुरुवात होईल.संसदेत 35 प्रलंबित विधेयके आहेत. संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होण्यापूर्वी ही यादी पटलावर ठेवण्यात येणार आहे. सरकारी नोंदीनुसार, 26 विधेयके सध्या राज्यसभेत आणि 9 लोकसभेत मंजूर होण्यासाठी प्रलंबित आहेत.

  • Union Budget 2023 Updates : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू  दोन्ही सभागृहांना संबोधित करणार आहेत. आर्थिक सर्वेक्षण आज मांडले जाणार आहे. (Economic Survey india) केंद्रीय अर्थसंकल्पाच्या एक दिवस अगोदर आर्थिक सर्वेक्षण देखील संसदेत मांडले जाईल.

  • धुळे, नंदुरबारमध्ये 3 दिवसांपासून ढगाळ वातावरण 

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Dhule Crop Issue : धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून असलेल्या ढगाळ वातावरणाचा फटका रब्बी पिकांना बसलाय. हरभरा पिकावर मोठ्या प्रमाणात अळीचा प्रादुर्भाव झालाय. तर गहू आणि ज्वारी पिकावर वेगवेगळ्या किडींचा प्रादुर्भाव होतोय. त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांचं उत्पादन घटण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. 

    बातमी पाहा- धुळ्यात धुव्वाधार पाऊस! अवकाळीमुळं पिक शेतात आडवी 

     

  • Parliament Budget Session 2023 Updates :  संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सकाळी 11 वाजता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या लोकसभा आणि राज्यसभेच्या संयुक्त बैठकीला संबोधित करून सुरू होईल. केंद्रीय अर्थसंकल्पाच्या एक दिवस अगोदर आर्थिक सर्वेक्षण देखील संसदेत मांडले जाईल. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे पहिले सत्र 13 फेब्रुवारी रोजी संपेल तर दुसरा सत्र 13 मार्च ते 6 एप्रिल दरम्यान होणार आहे. त्याआधी  केंद्रीय अर्थसंकल्पाच्या एक दिवस अगोदर आर्थिक सर्वेक्षण देखील संसदेत मांडले जाईल. 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link