Sidharth Kiara Wedding Live Updates : सिड-कियाराच्या लग्नासाठी सजला मंडप, पाहा PHOTO

Tue, 07 Feb 2023-5:36 pm,

Sidharth Kiara Wedding : सिद्धार्थ मल्होत्रा व कियारा अडवाणी आज जैसलमेरमध्ये लग्नगाठ बांधणार आहेत. तीन वर्षांच्या रिलेशनशिपनंतर ते आज कुटुंबीय व मित्रांच्या उपस्थित लग्नबंधनात अडकतील. त्यांच्या लग्नासाठी चाहतेदेखील उत्सुक आहेत.

Sidharth Malhotra-Kiara Advani Wedding : बॉलिवूडचे लव्हबर्ड सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी (Sidharth Malhotra-Kiara Advani ) आज जैसलमेरच्या सूर्यगढ पॅलेसमध्ये सात फेरे घेणार आहेत. या आलिशान महालात दोघेही नातेवाईक आणि जवळच्या लोकांच्या उपस्थितीत लग्नबंधनात अडकतील. या बिग फॅट वेडिंगसाठी सूर्यगढ पॅलेसवरील लक्झरी व्हिला बुक करण्यात आले आहे. 

Latest Updates

  • सिद्धार्थ कियाराचं अखेर लग्न लागलं आहे. सप्तपदी घेत दोघांनीही नवरा बायको म्हणून आयुष्यभर एकमेक्नासोबत राहण्याचं वचन घेतलं आहे. यावेळी कियारा  आणि सिद्धार्थने सिल्व्हर कलरचे आऊटफिट परिधान केले होते  

  • Sidharth Malhotra-Kiara Advani Wedding Live Updates: सिद्धार्थ आणि कियाराच्या लग्नाच्या विधींना सुरुवात झाली आहे. सूर्यगड पॅलेसमधून राजस्थानी लोकगीतही सुरू झाले.  

  • Sidharth Malhotra-Kiara Advani Wedding Live Updates: सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी आता काही तासांत लग्नबंधनात अडकणार आहे. त्यांच्या लग्नाचा मंडप आणि त्या ठिकाणाचा पहिला फोटो समोर आला असून याठिकाणी ते दोघेही सप्तपदी घेणार आहे.  

  • Sidharth Malhotra-Kiara Advani Wedding Live Updates:  कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्राचे संगीत मोठ्या धूमधडाक्यात पार पडले असून कियाराच्या कुटुंबाने तिच्यासाठी एक खास परफॉर्मन्स केला. कियाराच्या भावाने सिद्धार्थ-कियारासाठी एक खास गाणे बनवले आणि ते त्यांना समर्पित केले. संगीताची सुरुवात इंग्रजी गाण्यांनी झाली पण नंतर बॉलीवूड गाण्यांवर डान्स केला. 

  • Sidharth Malhotra-Kiara Advani Wedding Live Updates:  सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी आज सप्तपदी घेणार असून त्याआधी हळदी समारंभ होणार आहे. सिद्धार्थ-कियारा यांच्या हळदी समारंभाचा पहिला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहत्यांची उत्सुकता आणखीनच वाढली आहे.

  • Sidharth Malhotra-Kiara Advani Wedding Live Updates:  कियारा-सिद्धार्थची काल म्हणजेच 6 फेब्रुवारी 2023 च्या संध्याकाळी यांचे संगीत झाले. तर त्याआधी कियाराची मेहेंदी आणि चुडा सेरेमनी झाली. 

  • Sidharth Malhotra-Kiara Advani Wedding Live Updates: लग्नाआधीच कियाराचा लेहेंग्यातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये कियाराने बदामी रंगाचा लेहेंगा परिधान केल्याचं दिसत आहे. खड्यांच्या ज्वेलरीने कियाराने साज केला आहे. 

  • Sidharth Malhotra-Kiara Advani Wedding Live Updates: कियारा आडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्राच्या लग्नसोहळ्यात बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी उपस्थित राहणार आहेत. ईशा अंबानी, कबीर सिंह, शाहिद कपूर, मीरा राजपूत, करण जौहर, मनीष मल्होत्रा आणि जूही चावला असे अनेक सेलिब्रिटी या लग्नसोहळ्याला हजेरी लावणार आहेत. 

  • Sidharth Malhotra-Kiara Advani Wedding Live Updates: सिद्धार्थ-कियाराचा लग्नसोहळा शाही थाटात पार पडणार आहे. या कुटुंबीय, जवळचे मित्रमंडळी आणि बॉलिवूड सेलिब्रिटींच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा पार पडणार आहे. या लग्नाला 100 ते 150 मंडळी उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. 

     

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link