चित्रपटात काम देण्याच्या आमिषाने १०० मुलांची फसवणूक
दोन दिवसात प्रवासात गेलेल्या या भटकलेल्या तरुण तरुणींना खाण्यापुरते पैसेही नव्हते.
सोलापूर : चित्रपटात काम देतो या आमिषानं तब्बल १०० मुलांची फसवणूक करण्यात आलीये.. या सर्वांना हैदराबादच्या गोल्डन माईन प्रोडक्शन निर्मित चित्रपटात काम देण्याचं आमीष दाखवण्यात आलं.. यात मुंबई,राजस्थान आणि उत्तरप्रदेशातून आलेल्या १०० मुलांचा समावेश आहे. त्यांच्याकडील दीड लाख काढून घेऊन त्यांना सोलापुरात सोडून देण्यात आले. काहीच पैसे नसलेल्या त्यात भांबावलेल्या या तरुण तरुणींना कोणीही मदत केली नाही .. उलट त्यांच्यावर संशय घेत होते.. नवीन शहरात आल्याने ते दिशाहीन झाले होते. दोन दिवसात प्रवासात गेलेल्या या भटकलेल्या तरुण तरुणींना खाण्यापुरते पैसेही नव्हते.
पोलिसांची मदत
या तरुणांनी सोलापुरातलं फौजदार चावडी पोलीस स्टेशन गाठले , पोलिसांनी राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष संतोष पवार यांना पीडित तरुणांची माहिती दिली. त्यावर त्यांनी तत्परतेने या तरुणांना आधार दिला.. त्यांच्या जेवणाची व्यवस्था केली आणि त्यांना मुंबईची तिकिटे काढून दिली. विशेष म्हणजे दोन दिवस ही मुलं-मुली घराबाहेर असूनही त्यांच्या पालकांना याची कल्पना नव्हती.