मुंबई : Maharashtra budget 2022 : महाविकास आघाडी सरकाचा आज अर्थसंकल्प सादर करण्यात आला. यात अर्थमंत्री अजित पवार (Finance Minister Ajit Pawar) यांनी संगीत विद्यालयासाठी मोठी घोषणा केली. मुंबई विद्यापीठातील लता मंगेशकर संगीत विद्यालयासाठी (Lata Mangeshkar Sangeet Vidyalaya ) 100 कोटी रुपयांचा निधी जाहीर केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार हे राज्याचा सन 2022-2023 चा अर्थसंकल्प आज सादर केला. अर्थसंकल्यात अजित पवार यांनी मुंबई विद्यापीठातील भारतरत्न लता मंगेशकर संगीत विद्यालयासाठी 100 कोटी रुपयांचा निधी जाहीर केला आहे. लता मंगशेकर यांचे मुंबईत 6 फेब्रुवारी 2022 रोजी निधन झाले.


काल विधिमंडळात २०२१-२०२२ चा आर्थिक पाहणी अहवाल सादर करण्यात आला. तसेच  राज्यातल्या महापुरुषांच्या मूळ गावातील शाळांना 1 कोटीचा निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे अजित पवार यांनी जाहीर केले होते.


तसेच अर्थमंत्री अजित पवार यांनी आरोग्य सुविधाबाबत मोठी घोषणा केली आहे. त्यानुसार आरोग्य सेवा पुढील तीन वर्षात 11 हजार कोटी खर्च अपेक्षित आहे. तशी तरतूद करण्यात आली आहे. आता यापुढे किडनी स्टोन मोफत उपचार शासकीय रुग्णालयात केल जाणार आहे, असे अजित पवार यांनी जाहीर केले.


सर्व जिल्ह्यांच्या ठिकाणी महिला आणि नवजात शिशू रुग्णालय स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार हिंगोली, वर्धा, यवतमाळ, बुलढाणा, सांगली, सातारा, कोल्हापूर, सिंधूदुर्ग भंडारा, जळगाव, अहमदनगर, धुळे, सोलापूर, रत्नागिरी, औरंगाबाद आणि रायगड येथे प्रत्येकी 100 खाटांचे स्त्री रोग रुग्णालय स्थापन करण्यात येणार आहे.
अकोला आणि बीड येथे स्त्री रोग रुग्णालयाचे बांधकाम हाती घेण्यात येत आहे.