MIMच्या प्रदेशाध्यक्षासह ११ जणांना अटक
एमआयएमच्या प्रदेशाध्यक्षासह ११ जणांना अटक करण्यात आली आहे. जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आलाय.
नांदेड : एमआयएमच्या प्रदेशाध्यक्षासह ११ जणांना अटक करण्यात आली आहे. जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आलाय.
नांदेडमध्ये निवडणुकीच्या रणधुमाळीत वादालाही सुरुवात झाली. रविवारी संध्याकाळी काँग्रेस आणि एमआयएमच्या कार्यकर्त्यामध्ये क्षुल्लक कारणावरुन हाणामारी झाली. यात काँग्रेसचे मोहम्मद नासीर यांना डोक्यावर गंभीर दुखापत झाली. एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष सय्यद मोईन आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी हॉकीस्टीकच्या साहाय्याने मारहाण केल्याचा आरोप नासीर यांनी केला.
याप्रकरणी जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष सय्यद मोईन आणि अन्य ११ जणांवर नांदेडच्या ईतवारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सय्यद मोईन यांना अटक करुन सोमवारी पोलीसांनी त्यांना न्यायायलायात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.