Samruddhi Highway Bus Accident : शुक्रवारी रात्री बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात 25 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. समृद्धी महामार्गावर (Samruddhi Highway) विदर्भ ट्रॅव्हल्स या खाजगी बसचा (Bus Accident) बुलडाणा जिल्ह्याच्या सिंदेखेड राजा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये वर्धा जिल्ह्यातील 14 प्रवासीदेखील प्रवास करत होते. या अपघातात 12 जणांचा मृत्यू झाल्याच बोललं जातं आहेय. तर दोघे जण गंभीर जखमी आहे. मृत प्रवाशांचे नातेवाईक आता बुलढाणा करता निघाले आहेत. या मृतांमध्ये वर्ध्यातल्या अवंती पोहेकर या तरुणीचा देखील यामध्ये समावेश आहे. 

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नोकरीच्या निमित्ताने अवंतिका पुण्याला चालली होती. अपघाताची माहिती मिळताच अवंतीची आई प्रणिता पोहेकर यांना दुःख अनावर झालं आहे. मला तिथे घेऊन चला असा टाहो त्यांनी फोडला आहे. अपघाताची माहिती प्रणिता पोहेकर यांच्या पायाखालची जमीनच सरकली. अंवतीच्या मृत्यूची प्रणिता यांना माहिती देण्यात आली नव्हती. प्रणिता पोहेकर यांची प्रकृती पाहून त्यांना याबाबत माहिती देण्यात आली नाही. मात्र अवंतीच्या मृत्यूची बातमी कळताच कुटुंबियांना त्यांचे दुःख आवरता आलेलं नाही.

प्रणिता पोहेकर यांची मुलगी अवंती ही पुण्यात नोकरीसाठी चालली होती. अवंतीने मॉडेलिंग क्षेत्रातही बरेच नाव कमावलं होतं. पतीच्या  मृत्यूनंतर पोहेकर यांनीच त्यांच्या दोन्ही मुलींचा सांभाळ केला होता. सध्या त्या मेघे विद्यापीठात काम करत आहेत. प्रणिता यांची प्रकृती बरी नसल्याने अवंतीने विदेशात जाणेही टाळलं होतं. अवंतीची बहीण देखील पुण्यातच नोकरी करत होती. त्यामुळे अवंतीने देखील नोकरीसाठी पुण्याला जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ती विदर्भ ट्रॅव्हल्सने वर्ध्याहून पुण्याकडे निघाली होती. मात्र बुलढाण्यातच भीषण अपघातात तिला मृत्यूनं गाठलं आहे.

विदर्भ ट्रॅव्हल्समध्ये बाभूळगावचा तरुण होरपळला

समृद्धी महामार्गावर विदर्भ ट्रॅव्हल्स मध्ये होरपळलेल्या प्रवाश्यांमध्ये यवतमाळच्या निखिल पाथे या 23 वर्षीय तरुणाचा समावेश आहे. तो बाभूळगाव तालुक्यातील गोंधळी गावाचा रविसासी आहे. रोजगाराच्या शोधासाठी तो पुण्यात जात होता. त्याच्या भावाने त्याला ट्रॅव्हल्स मध्ये बसवून रवाना केले मात्र हा निरोप शेवटचा निरोप ठरला.

"निखिल कामासाठी पुण्याला चालला होता. शुक्रवारी संध्याकाळी त्याला विदर्भ ट्रॅव्हल्समध्ये बसवून दिले होते. निखिल पदधवीदर असून तो काम मिळवण्यासाठी पुण्यात चालला होता. त्याला सकाळी पैसे पाठवायचे होते म्हणून फोन करत होतो मात्र मोबाईल बंद होता. त्यानंतर बाकीच्यांचे फोन आल्यानंतर निखिलचा मृत्यू झाल्याचे कळले," असे निखिल पाथेच्या भावाने सांगितले.