यवतमाळ जिल्ह्यात १३ शेतकऱ्यांना विषबाधा, ६ जण अतिदक्षता विभागात
किटकनाशकाची फवारणी करताना यवतमाळ जिल्ह्यात तब्बल १३ शेतकऱ्यांना विषबाधा झालीय. त्यापैकी ६ रुग्णांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. एक जुलैपासून यवतमाळ जिल्हा रुग्णालयात फवारणीबाधित शेतकरी उपचारासाठी दाखल होण्यास सुरुवात झाली आहे.
यवतमाळ : किटकनाशकाची फवारणी करताना यवतमाळ जिल्ह्यात तब्बल १३ शेतकऱ्यांना विषबाधा झालीय. त्यापैकी ६ रुग्णांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. एक जुलैपासून यवतमाळ जिल्हा रुग्णालयात फवारणीबाधित शेतकरी उपचारासाठी दाखल होण्यास सुरुवात झाली आहे.
किटकनाशकाची फवारणी करताना योग्य काळजी न घेतल्याने ही विषबाधा झाल्याचं उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगीतलंय. गेल्या वर्षी फवारणी दरम्यान विषबाधेमुळं २१ शेतमजुरांचा नाहक बळी गेला होता. त्यानंतर राज्य सरकारनं मोठ मोठ्या घोषणा केल्या. शेतकरी आणि शेतमजुरांना फवार णी साठी कीट देणार असल्याचं आश्वासन कृषी विभागानं दिल होतं. मात्र यंदा कृषी विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी शेतशिवारात दिसत नाहीत.