नाशिक : नाशिक रोड कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या वयोवृध्द तेरा कैद्यांची मुक्तता करण्यात आलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मध्यवर्ती कारागृह आणि सरकारी प्रतिनिधी कमिटीच्यावतीनं हा निर्णय घेण्यात आला. नाशिक रोड कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या ज्या वयोवृध्द कैद्यांना शिक्षा होऊन चौदा वर्ष झालेली आहेत. तसचं ज्या कैद्यांचे वय ६५ च्या पुढे आहे. 


अशा कैद्यांच्या संदर्भात न्यायनिवाडा करून तातडीने मुक्त करण्याच्या निर्णयाने वयोवृद्ध नागरिकांना त्यांच्या शेवटच्या काळात दिलासा मिळाला आहे. 


नुकताच खुल्या कारागृहात वयोवृध्द साधूने आत्महत्या केली होती. या पार्श्वभूमीवर कारागृह प्रशासनाने सरकारी योजनेची अंमलबजावणी फास्ट ट्रॅकवर केली आहे.