औरंगाबाद : तुमची मुलं कशाशी खेळतायत, याच्याकडे नीट लक्ष ठेवा, हे आम्ही सांगतोय, कारण एक धक्कादायक बातमी आहे औरंगाबादमधून... झोका खेळताना गळफास लागल्यानं एका चौदा वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. 


काय झालं नेमकं?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

करण गुंजाळ असं या मुलाचं नाव आहे. ओरंगाबादमधल्या प्रकाशनगरच्या मुकुंदवाडी परिसरात ही घटना घडलीय. सोमवारी शाळेतून घरी आल्यानंतर करण झोका खेळण्यासाठी घराच्या वरच्या मजल्यावर गेला. झोका खेळत असताना अचानक त्याच्या गळ्याला झोक्याच्या दोरीचा फास लागला आणि तो बेशुद्ध पडला. 


काही वेळेनंतर त्याची बहीण त्याला बोलावण्यासाठी गेल्यानंतर हा प्रकार उघड झाला. करणला उपचारासाठी रुग्णालयात नेलं असता, त्याला मृत घोषित करण्यात आलं.