वाल्मिक जोशी, झी मीडिया


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Jalgaon Crime News: पारोळा तालुक्यातील एका गावात १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा प्रकार घडला आहे. तसंच, अत्याचारानंतर तिच्या डोक्यात दगड घालून गळा आवळत तिला ठार करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचंही उघडकीस आलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी नराधमाला अटक केले आहे. पीडीत मुलगी ही शौचालयासाठी जात असताना तिला अडवून तिच्यावर बलात्कार केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पीडितेच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून सदर आरोपी विरोधात पारोळा पोलीस स्टेशनला अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Jalgaon News)


पारोळा तालुक्यात एका गावात राहणारी १४ वर्षीय मुलगी काल सायंकाळी शौचालयाला जात असताना आरोपी बारक्या उर्फ अशोक मगा भिल याने तिला अडवून तिच्यावर जबरदस्ती करत अत्याचार केला. तिने विरोध केला असता आरोपीने तिचा दोरीने गळा आवळून आणि डोक्यावर दगडाने मारून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. मात्र सुदैवाने ती बचावली आहे. तिला उपचारांसाठी तिच्या भावाने धुळे येथील रुग्णालयात दाखल केले असून तिच्यावर उपचार सुरु आहेत. मात्र, या घटनेमुळं गावात एकच खळबळ उडाली आहे.


याप्रकरणी पीडितेच्या भावाने पारोळा पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यावरून आरोपी विरोधात ३०७,३७६(३), ३५४,३२३ व बालकांचे लैंगिक अत्याचार कायदा कलम ४,८,१०,१२ प्रमाणे पारोळा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज या आरोपीला कठोर शिक्षा व्हावी म्हणून गावकऱ्यांनी पारोळा पोलीस स्थानकावर ठिय्या आंदोलन केले.


नालासोपाऱ्यातही तरुणीवर अत्याचार


नालासोपाऱ्यातही पोलीस भरतीचे प्रशिक्षण देणाऱ्या पोलिसानेच तरुणीवर अत्याचार केल्याचे उघड झाले आहे. समाधान गावडे असं आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. समाधान गावडे हा त्याची मैत्रिण अनुजा शिंगाडे हिच्यासोबच पोलीस प्रशिक्षण केंद्र चालवत होता. हे दोघेही वसई लोहमार्ग पोलिसांत कार्यरत होते. दोघे मिळून नालासोपारा येथे विजयी भव नावाचे पोलीस भरती प्रशिक्षण केंद्र चालवीत होते. या पोलीस केंद्रात दाखल होणाऱ्या तरुणींना वारंवार फोन करणे त्यावर तरुणींना अश्लील मेसेज करणे, त्यांचा पाठलाग करणे, अश्लील व्हिडीओ कॉल करत होता. त्यांच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करायचा. विरोध केल्यानंतरही त्याचे कृत्य तसेच होते. त्यामुळं घाबरुन अनेक तरुणींनी पोलीस प्रशिक्षण केंद्रात जाणे सोडून दिले होते. दोन तरुणींनी या तरुणाविरोधात तक्रार दाखल केली आहे.