हेमंत चापुडे, पुणे : गेली दोन महिने ग्रीन झोनमध्ये असलेल्या पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्याची अखेर मुंबईकरांनी झोप उडवली आहे. आज एकाच दिवसात तब्बल पंधरा रुग्ण पॉझिटिव्ह आढळले असून हे सर्व रुग्ण मुंबई वरून आलेले आहेत. आज आलेल्या पॉझिटिव्ह रूग्णांमध्ये वडगाव काशिंबे येथील एकाच कुटुंबातील ७ जण पॉझिटिव्ह आले आहेत तर फदालेवाडी येथील ३, पेठ येथील २, शिनोली येथील एक, घोडेगाव येथील एक आणि एकलहरे येथील एक असे एकाच दिवसात तब्बल पंधरा रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकाच दिवसात १५ कोरोना रुग्ण आढळल्याने आंबेगाव तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा आता २४ वर पोहोचला आहे. त्यामुळे प्रशासनाने हा सर्व भाग कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करत परिसर सील केला आहे. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडणे टाळावे असे आवाहनही प्रशासनाकडून आता करण्यात आले आहे.