मुंबई : २०२० मधील देशव्यापी लॉकडाऊनच्या घोषणेला आज एक वर्ष पूर्ण होत असतानाच महाराष्ट्राच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. महाराष्ट्रातील १५ जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात वेगाने होणारा कोरोनाचा प्रसार लक्षात घेतला, राज्य सरकार हे पाऊल उचलण्याची शक्यता आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोण-कोणत्या जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन लागू शकतो?


1. मुंबई
२. ठाणे
३. पुणे
४. नागपूर
५. नाशिक
६. औरंगाबाद
७. अहमदनगर
८. जळगाव
९. जालना
१०. नांदेड
११. अमरावती
१२. बुलडाणा
१३. अकोला
१४. यवतमाळ
१५. वर्धा


या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात मिळत आहेत. जर राज्याचा विचार केला तर एकट्या मार्च महिन्यामध्ये आतापर्यंत ३ लाख ४३ हजार नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर १ हजार ३०० जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. 


त्यामुळे कुठेतरी ही रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी राज्य सरकार किंवा जिल्हा/महापालिका प्रशासन वरील १५ जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊनचं पाऊल उचलणार का? हे पाहावं लागेल. यातील नागपूर, बीडसह काही जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन आधीच लावण्यात आलेले आहे. 


मात्र मुंबईसारखी शहरं जिथे दररोज ३ हजाराहून अधिक नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ होते आहे, ठाणे जिल्ह्यातील शहरांमध्येही आधीचे रेकॉर्ड मोडून नव्या रुग्णांची भर पडते, त्यामुळे इथली रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी कठोरातले कठोर नियम लावण्याची गरज भासू लागली आहे.