मुंबई : मागच्या ४८ तासामध्ये १५० पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. तर एका पोलिसाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यातल्या कोरोना झालेल्या पोलिसांची संख्या ४,६६६ वर पोहोचली आहे. तर आत्तापर्यंत ५७ पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लॉकडाऊनमध्ये गेल्या ३ महिन्यांपासून पोलीस ड्युटीवर आहेत. रस्त्यावर कर्तव्य निभावत असताना पोलिसांचा अनेकांशी संपर्क येतोय. त्यामुळे पोलिसांना कोरोना होण्याची संख्याही वाढताना दिसत आहे. 


कोरोना संकटाच्या काळात पोलीस गेल्या कित्येक दिवसांपासून सतत जनतेच्या सेवेसाठी दिवस-रात्र तैनात आहेत. पोलीस दलातही कोरोनाची लागण होण्याच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. कोरोनाविरुद्ध लढा देणाऱ्या या कोरोना योद्धांना लागण होण्याचं प्रमाण वाढत असल्याने मोठी चिंता व्यक्त करण्यात येत आहे. 


पोलिसांना कोरोनाची बाधा होत असल्याने त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पोलिसांना जर कोरोना संदर्भातील काही लक्षणे दिसून आली तर त्यांच्यावर तातडीने उपचार व्हावेत, याकरिता राज्यात सर्वत्र नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत.