नितेश महाजन, झी मीडिया, जालना : 3 इडियट्स (3 Idiots) चित्रपटाचा क्लायमॅक्स क्वचितच कोणी विसरू शकेल. क्लायमॅक्समध्ये आमिर खान त्याच्या मित्रांसह महिलेची व्हॅक्यूम क्लिनरने प्रसूती करून घेतो. चित्रपटातील दृश्य कधी प्रत्यक्षात घडू शकते, असा विचार क्वचितच कोणी केला असेल. मात्र हा सिन  प्रत्यक्षात घडलाय. (17 doctors perform 2 hours form opreation 3 idiots vaccum clener delivery scene like at jalna maharashtra)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्रात थ्री ईडीयट चित्रपटासारखी व्हॅक्यूअम प्रसूती यशस्वीपणं पार पडली. या प्रसूतीसाठी तब्बल 17 डॉक्टरांनी योगदान दिलं.  तब्बल 2 तास हे ऑपरेशन चाललं.  प्रसुतीनंतर बाळ आणि बाळंतिणीची तब्येत उत्तम आहे, असा दावा डॉक्टरांनी केला आहे. 


ही हटके आणि तेवढीच थरारक प्रसुती जालन्यातील महिला आणि बाल रुग्णालयातील आहे. घनसावंगी तालुक्यातील राणी उंचेगाव येथील या महिलेची ही प्रसुती करण्यात आली. या महिलेला कायपोस्कोलिओ हा आजार आहे. त्यांचा पाठीचा मणका वाकडा असल्यानं नॉर्मल डिलिव्हरी शक्य नव्हती. त्यामुळे सीझर करणं आव्हान होतं. मात्र डॉक्टरांनी आपला अनुभव पणाला लावून ऑपरेशन सक्सेसफुल करुन दाखवलं. या व्हॅक्यूअम प्रसूतीची राज्यात एकच चर्चा सुरु आहे.