राज्यातील तीन वेगवगळ्या अपघातात २३ ठार १७ जण जखमी
पुणे - सातारा महामार्गावर खंडाळा येथे अपघातात १७ ठार, १३ जखमी
पुणे/पालघर : पुणे - सातारा महामार्गावर खंडाळा येथे अपघातात १८ ठार, १३ जखमी, अपघातात ठार झालेले सर्व कामगार, कर्नाटकमधून मजूर घेऊन आयरीश टेम्पो शिरवळ एमआयडीसीमध्ये चालला होता. खंबाटकी बोगदा ओलांडल्यावर आयरीश टेम्पो वळणावर पलटी झाला. या अपघात टेम्पोचा चक्काचूर झालाय. मृतांमध्ये महिलांची संख्या अधिक असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. तर दुसऱ्या एका अपघातात कारने रस्त्या शेजारील झाडाला दिलेल्या धडकेत मैसूरू येथील तीन युवक ठार झाल्याची घटना घडली आहे. तिसऱ्या अपघातात मुंबई - अहमदाबाद महमार्गावर लक्झरी बस आणि कंटेनरमध्ये झालेल्या अपघातात दोन जण ठार तर चौघेजण गंभीर जखमी झाले आहेत.
अपघातग्रस्त टेम्पो कर्नाटकहून मजूर घेऊन शिरवळ एमआयडीसीकडे चालला होता. खंबाटकी बोगदा ओलांडल्यानंतर एका नागमोडी वळणावर टेम्पो उलटल्याने हा अपघात झाला. त्यात १७ जण जागीच ठार झालेत. तर १३ जखमी झाले. काही जखमींची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पालघर अपघात दोन ठार
पालघर परिसरातील मुंबई - अहमदाबाद महमार्गावर लक्झरी बस आणि कंटेनरमध्ये झालेल्या भीषण अपघातात दोन जण ठार तर चौघेजण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये एक महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. जखमींवर कासा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
सद्गुरू ट्रॅव्हल्स कंपनीची लक्झरी बस गुजरातहुन मुंबईकडे येत असताना या बसला कंटेनरने पाठीमागून जोरदार धड़क दिल्यानं हा अपघात झाला आहे. महालक्ष्मी परिसरात हा अपघात झाला.
दुसऱ्या अपघातात तीन ठार
बेळगाव : भरधाव वेगाने जात असलेल्या आय २० कारने रस्त्या शेजारील झाडाला दिलेल्या धडकेत मैसूरू येथील तीन युवक ठार झाल्याची घटना घडली आहे.सोमवारी सायंकाळी सहाच्या दरम्यान हा अपघात घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गोव्याहून कित्तुर मार्गे सदर युवक आय-20 कार मधून बंगळुरू कडे जात होते कित्तुर जवळील देगुरहळळी गावा जवळ हा अपघात घडला आहे.