मुंबई : नकळत्या वयात आई-बापाचं छत्र जाणं म्हणजे अगदी पोरकंच होणं. या अशा दुःखाच्या प्रसंगी अवयवदानाचा निर्णय घेणं ही खूप धाडसाची बाब आहे. पुण्यातील 17 वर्षांच्या सुमितच्या निर्णयाचं सगळेजण कौतुक करत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आईच्या मेंदूत अचानक रक्तस्त्राव झाल्यामुळे तिला रूग्णालयात दाखल करण्यात आलं. पण काही काळाने आई मृत पावल्याचे डॉक्टरांनी घोषित केलं. 


काही वर्षांपूर्वी वडिलांचा आधार हरपला आता अचानक आईसोडून गेल्यामुळे काय करावं त्याला कळत नव्हतं. पण या दुःखाच्या प्रसंगी देखील अवयव दानाचा धाडसी निर्णय त्याने घेतला. 


एवढ्या लहान वयात त्याने खंबीर राहून हा निर्णय घेतल्यामुळे रूग्णालयातील उपस्थितांनी रांगेत उभे राहून त्याला सलाम केला. त्याच्या या निर्णयामुळे पाच रुग्णांना जीवदान मिळाले आहे.


केईएम रूग्णालयातील रूग्णाला लिव्हर, हृदय रूबी हॉल क्लिनिकला, एक किडनी वॉकखर्ड रूग्णालयाला (नाशिक), दुसरी किडनी कमांड हॉस्पिटलला आणि डोळ्यांचा कोर्णिया एचव्ही देसाई रूग्णालयातील रूग्णाला देण्यात आली.



गेल्या आठवड्यात 37 वर्षीय सुरेखा सळके यांना खराडी येथील कोलंबिया एशिया रूग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्या मेंदूत रक्तस्त्राव झाल्यामुळे बेशुद्ध पडल्या होत्या. उपचार सुरू असताना काहीच प्रतिसाद न दिल्यामुळे त्यांचा ब्रेन डेड झाला. 


या परिस्थितीत डॉक्टरांनी सुमीतला आणि त्याच्या बहिणीला अवयवदाने महत्व पटवून दिले. आणि दोघांनी परिस्थिती सांभाळत तो निर्णय घेतला. आई - वडिलांच छत्र हरपूनही दोघांनी खंबीर निर्णय घेतला.