नाशिक : जिममध्ये व्यायाम करतानाच एका कॉलेजवयीन मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. नाशिच्या सिडको परिसरातील ही घटना आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभियांत्रिकीचं शिक्षण घेत असलेला १७ वर्षांचा अजिंक्य लोळगे परिसरातल्या जीममध्ये गेला होता. 


तिथे व्यायाम करत असतानाच त्याला चक्कर आली आणि तो खाली पडला. त्याला तातडीनं रुग्णालयात नेलं गेलं. मात्र त्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता.