Mumbai Crime News : बॉलीवुड अभिनेता अक्षय कुमार याचा  'स्पेशल 26' हा चित्रपट चांगलाच गाजला होता. यात अक्षय कुमार आणि त्याच्या टोळीने नकली अधिकारी बनून व्यापाऱ्यांना लुटले. या चित्रपटाप्रमाणेच मुंबईतील बड्या व्यापाऱ्याच्या घरी 'स्पेशल 26' स्टाईल रेड पडली आहे. इन्कम टॅक्स अधिकारी असल्याची सांगत या टोळीने व्यापाऱ्याच्या घरावर धाड टाकत तब्बल 18 लाखांची रोकड लुटली. 


असा घातला व्यापाऱ्याला गंडा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इन्कम टॅक्स अधिकारी बनून व्यापाराच्या घरात धाड टाकणाऱ्या या टोळीला सायन पोलिसांनी गजाआड केले आहे. व्यावसायिकाचे  तब्बल 18 लाख रुपये घेऊन केला होता पोबारा. काही दिवसांपूर्वी इन्कम टॅक्सचे अधिकारी बनून सायन येथील पटवा नावाच्या व्यापाराच्या घरात घुसले होते. पटवा नावाच्या या व्यापारी कुटुंबाने बहिणीच्या लग्नासाठी आणलेली असलेली तब्बल 18 लाख रुपयांची रोकड या ''अधिकाऱ्यां'' समोर ठेवली. कागदपत्रे तपासण्याचा बनावट करत, पैश्यांचे फोटो काढले आणि काही दिवसातच तपास पूर्ण करू मात्र तोवर कॅश जप्त करत असल्याच त्यांनी सांगितल आणि 18 लाख रूपये घेऊन पसार झाले होते. 


असे सापडले आरोपी पोलिसांच्या जाळ्यात


चार दिवस उलटून देखील जेव्हा काहीच झालं नाही तेव्हा कुटुंबाने  चौकशी केली. हा सगळी बनावट असल्याच समोर येतात सायन पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी इमारतीतील तसेच परिसरातून सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आणि
आरोपींच्या ईनोवा कारच्या नंबर वरून एक एक करून आठ आरोपींना अटक केली. कुटुंबातील एकाच्या मित्राला घरातील लग्नाची तसेच घरात असलेल्या कॅशची  माहिती होती. त्यानेच आरोपींना टीप दिल्याच तपासत  निष्पन्न झालं. आरोपींना अटक करणाऱ्या मित्राला देखील पोलिसांनी अटक केली अशी माहिती पोलीस उपायुक्त प्रशांत कदम यांनी दिली.


कल्याणमध्ये वॉचमनचे हातपाय बांधून दरोडा टाकला 


कल्याणमध्ये महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका बिल्डरच्या कार्यालयावर दरोडा टाकण्यात आला होता. यावेळी दरोडेखोरांनी तिथल्या वॉचमनचे हातपाय बांधून हा दरोडा टाकला होता. याप्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.त्यानंतर सीसीटीव्ही आणि अन्य तांत्रिक माहितीच्या आधारे महात्मा फुले पोलिसांनी चार दरोडेखोरांना अटक केली. धक्कादायक म्हणजे या दरोड्यात ज्या वॉचमनचे हातपाय बांधून दरोडा टाकण्यात आला होता.तो बनाव होता. हा वॉचमनन देखील या दरोडेखोरांना सामील होता असं पोलीस तपासा समोर आलं. त्यामुळे या प्रकरणाबाबत कल्याण शहरात मोठी चर्चा सुरू आहे.